सहकार पुरस्कार 2023-24 : सहकारी संस्थांसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी पुन्हा आता 18 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ !

 

 

पालघर जिल्ह्यातील सहकार विभागास गृहनिर्माण संस्थांचे प्रस्ताव नक्कीच अपेक्षित….!

वसई :- आशिष राणे
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील पात्र सहकारी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, त्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार कालमर्यादेत पुन्हा एकदा बदल करण्यात आले आहेत.

सहकार पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल करण्यासाठी सहकारी संस्थांना यापूर्वी 18 जुलैपर्यंत असलेली मुदत वाढवून ती दुसऱ्या वेळी 31 जुलै करण्यात आली होती, तर प्रतिसाद अल्प असल्याने आता तिसऱ्या वेळी ही मुदत 18 ऑगस्ट करण्यात आल्याची माहिती पालघर जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी यांनी दिली.
सहकार पुरस्कारासाठीच्या प्रस्ताव सादर करण्याच्या मुदतीत आता नव्याने 2 ऑगस्ट 2025 ते 18 ऑगस्ट 2025 या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

या कालावधीत पालघर जिल्ह्यातील ( सर्व 8 तालुके ) सर्व सहकारी संस्थांनी आपापल्या मुख्यालयाच्या तालुक्यातील उप/सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडे आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविताना शासनाने निश्चित केलेल्या कार्यपद्धती व निकषांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. सहकारी संस्थांनी त्यांच्याकडील आर्थिक स्थिती, सामाजिक उपक्रम, सभासद विकास, पारदर्शकता, प्रशासनिक कार्यक्षमता इत्यादी बाबींचा तपशील प्रस्तावामध्ये सादर करावा लागणार आहे.
तरी पालघर जिल्हयातील सर्व सहकारी संस्थांनी 18 ऑगस्ट 2025 या कालावधी पर्यंत प्रस्ताव तयार करुन त्यांचे मुख्यालय ज्या तालुक्यात आहे,अशा उप/सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचेकडे सादर करावेत, असे आवाहन शिरीष कुलकर्णी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,पालघर यांनी केले आहे.

पालघर जिल्ह्यात 8 तालुके आहेत पैकी आतापर्यंत खालीलप्रमाणे प्रस्ताव आले आहेत
नागरी बँक 1
विविध कार्यकारी संस्था 4
पतसंस्था 5
मत्स्यसंस्था 1
गृहनिर्माण संस्था 0
तरी ही सहकाराचा पालघर जिल्हा आणि त्यात वसई तालूका हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे असे असताना सहकार विभागास गृहनिर्माण संस्थांचे प्रस्ताव नक्कीच अपेक्षित आहेत
शिरीष कुलकर्णी
पालघर जिल्हा उपजिल्हानिबंधक

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!