डॉक्टर मित्र असावा ऐसा…डॉ. मालकम पेस्तनजी सारखा… नाबाद ६१.. “अभिष्टचिंतन” : “यथा मित्रम् तथा जीवन : यथा वैद्यम तथा निरामया”

 

वसईतील गोल्डन पार्क हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ.माल्कम पेस्तनजी यांचा दूरदर्शी दृष्टीकोन आणि आरोग्य क्षेत्रातील तीन दशकांहून अधिक असलेला दांडगा अनुभव आणि एम.जी.एम रुग्णालयां समवेत मुंबईतील नामांकित हॉस्पिटल मध्ये कार्यरत राहून सोबत भारत देश आणि डझनभर विदेशात आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रासंबंधी व त्यांच्या अत्याधुनिक स्पाईन सर्जरी बाबत दिले जाणारे मार्गदर्शन याउलट वसईतील गोल्डन पार्क रुग्णालयात उभारलेले अत्याधुनिक स्पाईन सर्जरीचे जागतिक स्तरावरील सेंटर्स असे निरनिराळे सेटअप उभारण्याचा पाठीशी असलेला अनुभव हीच ‘गोल्डन पार्क हॉस्पिटल तथा ट्रामा केअर सेंटर (‘एनएबीएच’) अशा विविध मान्यता मिळवण्यात डॉ पेस्टनजी हे यशस्वी झाले आहेत, सोबत रुग्ण असो किंवा व विविध क्षेत्रातील अन्य मित्र परिवार यांच्या कुटूंबाशी देखील आत्मिक भावनेने जोडलेला हा “नुसता हाडं जोडणारा डॉक्टर माणूस नव्हे तर हा नातेसंबंधा पलीकडील भावंबंध व जिव्हाळा जपणारा डॉक्टर मित्र असावा ऐसा हीच फॅमिली डॉक्टर मित्र असण्यामागची खरी वास्तव प्रेरणा आहे. आज १० ऑगस्ट २०२५ डॉ. मालकम पेस्तनजी यांच्या ६१ वा वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना उदंड आयुष्य लाभू दे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना सोबत त्यांच्या यां पुढील वैद्यकीय कार्यास mymarathi7.com चा मानाचा मुजरा….!

वसई : आशिष राणे यांच्याकडून…

वसईतील एक अवलिया डॉ. मालकम दारायस पेस्तनजी नाबाद .६१…अभिष्टचिंतन सर..!

आरोग्य म्हटलं की डॉक्टर हा शब्द चटकन ओठावर आलाच, व त्यात अत्यंत सामान्य रुग्ण व त्यांच्या आरोग्याची काळजी घेत रुग्ण व त्यांचातील नातेसंबंध अधिक दृढ करून आपल्या गोल्डन पार्क रुग्णालयाच्या माध्यमाने अविरत रुग्णसेवा करीत असलेले तथा एक कर्तृत्ववान नेतृत्वाचा आलेख वसई तालुक्याच्या नकाशावर मागील ३० वर्षे निर्माण करणारे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ.मालकम पेस्तनजी यांचे नाव डोळ्यासमोर येते.

आज त्यांचा ६१ वा वाढदिवस आनंदाने साजरा होत आहे, त्यानिमित्ताने Mymarathi7.Com ने त्यांच्या पैलूंचा घेतलेला हा वेध “!

डॉक्टर व रुग्ण यांच्यातील नातेसंबंधांना आजवर ज्यांनी वसई तालुक्यात मानवतेची किनार निर्माण करीत आपले सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून रुग्णसेवा जोपासत ज्यांनी रुग्णालय ,विविध उपक्रम ,आदी सेवा संस्थांच्या माध्यमातून रुग्णसेवा केली.याउलट रुग्ण सेवेसोबत समाजसेवा हि अत्यंत समर्पक भावनेने पार पाडली, तो दुसरा तिसरा कोणी नाही तर वसईतील एक अवलिया डॉक्टर मालकम पेस्तनजी म्हणजेच गोल्डन पार्क हॉस्पिटल आणि हे नाव आज वसईतील मोजक्याच डॉक्टरा मध्ये घेतले जाते.आपल्या शिस्तप्रिय अशा गोल्डन पार्क हॉस्पिटल व त्यांच्या सामाजिक विश्वस्त संस्थांनी आजवर रुग्णलाय असो वा इतर मेडिकल कॅम्प आदी विविध सेवा दिल्यानेच त्याचे प्रतीक म्हणून गोल्डन पार्क रुग्णालयाला मल्टीस्पेशालिटी सेवा म्हणून एनएचबीएच ची मान्यता मिळवली.आणि ही मान्यता मिळवणारे पालघर जिल्ह्यातले हे एकमेव रुग्णालय आहे.डॉक्टराविषयी जाणून घ्यायचे झाले तर डॉ.मालकम यांचा जन्म मुंबईत दि.१० ऑगस्ट १९६४ रोजी एका पारशी कुटुंबात झाला, पुढे जात आपण डॉक्टर होऊन केवळ व्यावसायिक नाही तर

समाजसेवेत हि जायचे ही भूमिका त्यांनी लहानपणीच आत्मसात केली होती.त्यावेळी माटुंग्याच्या डॉन बॉस्को शाळेतून पुढे जात आपले वैद्यकीय शिक्षण त्यांनी नायर चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये पूर्ण केले.मुंबईत तीन वर्षे प्रॅक्‍टिस केल्यानंतर त्यांनी थेट वसई गाठली आणि तिथे वसई रोड भागात आपले पाय रोवले व गोल्डन पार्क हॉस्पिटल नावाचे अद्ययावत असे रुग्णालय उभारले.पुढे पुढे त्याठिकाणी मुळातच एक ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून नावारूपाला येत आज वर त्यांनी आपल्या रुग्णालया सोबत वैद्यकीय सेवेची हि तब्बल ३० वर्षे त्यांनी वसईकरांना सेवा दिली आहे आणि यापुढे हि देत राहणार आहेत.कोणताही छोटा मोठा अपघात असो मात्र कुठल्याही परिस्थितीत त्या रुग्णांना प्रवेश देऊन त्याच्यावर तातडीने उपचार करण्यास त्यांनी कधी हि नकार दिला नाही मुळातच नकार हा शब्दच त्यांच्या डिक्शनरी मध्ये नाही.

वसईत राहून नातेसंबंध निर्माण केले ते कामी आले…

वसई तालुक्यात डॉ. पेस्तनजी यांनी अविरत सेवेबरोबरच सगळ्यांशी स्नेहाचे नातेसंबंध निर्माण केले असून या डॉक्टरांना तळागाळातल्या माणसापासून ते उच्चभ्रू म्हणून मग त्यात व्यावसायिक, राजकीय मंडळी नामवंत व्यक्ती, पत्रकार असो वसईकरांचा प्रत्येकाच्या घरात डॉक्टर व त्याच्या ” गोल्डन पार्क हॉस्पिटल” चे नाव आहे.

छोटा मोठा कुणीही असो नातेसंबंध सांभाळून बिलं कमी करणारा एकमेव डॉक्टर मालकम पेस्तनजी !

हे नातेसंबंध केवळ शक्य झाले ते डॉक्टरांच्या स्वभावामुळे खास सांगायचे झाले तर एखाद्या रुग्ण अथवा त्याच्या रुग्णालय बिलाच्या पैशांविषयीचा प्रश्न असो, साध्या गरजूंच्या रुग्णाच्या नातेवाईकांनी अथवा लोकप्रतिनिधींनी सांगितले कि,डॉक्टर जरा बिलं कमी करा आमची परिस्थिती नाही..तर बस त्याला सढळ हस्ते मदत करणारां डॉक्टरांचा हाच स्वभाव व मानवी दृष्टिकोन सतत डोळ्यासमोर ठेवत त्यांचे कार्य आज पुढे अविरत सुरू आहे.

डॉ. पेस्तनजी यांचा भावनिक विषयांस हात : “फॅमिली डॉक्टर” ही संकल्पना सर्वत्र रुजवणे आवश्यक!

मधल्या काळात त्यांनी एका भावनिक विषयाला हात घातला तो म्हणजे “फॅमिली डॉक्टर” ही संकल्पना आता तुम्ही म्हणाल की एम.बी.बी.एस डॉक्टर हा फॅमिली डॉक्टर असतो मग सर्जन हा फॅमिली डॉक्टर कसा होऊ शकतो यावर ते म्हणतात कि, डॉक्टरांनी सगळी नाती जपली पाहिजेत, कौटुंबिक सलोखा आणि विश्वासार्हता यावरच फॅमिली डॉक्टर आणि त्यांचे नाते अवलंबून असते, मात्र आताच्या काळात ठराविक डॉक्टरच हि फॅमिली डॉक्टरची संकल्पना पार पाडत आहेत. त्यापैकी डॉक्टर म्हणतात बदलत्या काळात सर्वच भावनिक बंध हे कमी होत आहेत, हीच गोष्ट दुर्देवाने इतर डॉक्टरामध्ये सुद्धा आली आहे त्यामुळे डॉक्टराकडे बघण्याचा दृष्टिकोन हा विक्रेता आणि ग्राहक स्वरूप पाहात आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा फॅमिली डॉक्टर ही संकल्पना समाजात रुजवायला हवी असे डॉ.मालकम पोटतिडकीने सांगतात.डॉ.म्हणतात कि,आपण बरे होण्यासाठी डॉक्टर त्यांचे कौशल्य पणाला लावतात याच कौशल्याला आपण करुणेची जोड दिली पाहिजे, रुग्ण व त्यांचे नातेवाईक आणि डॉक्टरांच्या प्रति सधभावना जोपासली तर डॉक्टर रुग्ण यांच्यातील गैरसमजाचा पूर ओसरू लागेल.शेवटी डॉक्टर हा कोणीहि असो त्यामुळे रुग्णाच्या वैचारिक बैठकीची जाणीव समजून घेणे महत्त्वाचे असते,आणि हीच भावना क्षणोक्षणी डॉ.मालकम वैद्यकीय सेवा बजावताना जागृत ठेवत आल्याने त्यांच्या वैद्यकीय व्यवसायात त्यांना निर्विवाद यश मिळाले,शेवटी सांगायचे एकच कि, डॉ मालकम नावाच्या या अवलियाने हे नातेसंबंध, मैत्री, विश्वास ही नाती जपल्यानेच ते आज जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून नावारूपास आहेत.

डॉक्टर मित्र असावा ऐसा..डॉ.पेस्तनजी सारखा..

गेल्या दशकामध्ये रुग्ण-डॉक्टर संबंधात खूप मोठे बदल घडून आलेले दिसत आहेत. मुळात वैद्यकीय व्यवसाय हा व्यवहार असला तरी रूढार्थाने चालणा-या व्यवहारांच्या पलीकडचा असा तो भावनिक व्यवहार असतो.भावनांना फाटा न देता मनाच्या दोरीवर चालताना संतुलनासाठी व्यवहाराची काठी हातात धरून समतोल आयुष्य कसे जगायचे हे आपल्याला चाणक्य नीती शिकवते. त्याचप्रमाणे रुग्ण-डॉक्टर संबंधाचा भावनिक व्यवहार पार पाडून हवे ते पदरात कसे पाडून घ्यायचे, हे आपल्याला विविध रुग्णालय व तेथील डॉक्टरांच्या एकूणच कार्यावरून समजते अर्थात प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात असो..

एक जोड आवश्यक आहे ती एका विश्वासार्ह डॉक्टर मित्राची !

“यथा मित्रम् तथा जीवन:यथा वैद्यम तथा निरामया” असे म्हटले जाते की, तुम्हाला चांगले आयुष्य जगण्यासाठी सद्गुणी जोडीदार, संयमी शेजारी आणि एका चांगल्या जीवलग मित्राची गरज असते. यात आजच्या घडीला आणखी एक जोड आवश्यक आहे. ती म्हणजे एका विश्वासार्ह डॉक्टर मित्राची. आणि डॉ पेस्तनजीयात खूपच मदत करत आले आहेत. आपण कधीही संपर्क करू शकतो अशी आपल्या आयुष्यात पहिल्या दहा एक माणसांची यादी तयार असते. यात सर अग्रस्थानी आहेत.तर तुमच्या कडे अशा दहा माणसांमध्ये एखादा तरी डॉक्टर आहे का हे ही तपासून पाहा. तुम्हाला असे वाटेल की तुम्ही नेहमी ज्या फॅमिली डॉक्टरकडे जाता तोच तुमचा डॉक्टर-मित्र आहे. पण मी सांगतोय ती ‘डॉक्टर-मित्र’ची संकल्पना ही फॅमिली डॉक्टरपेक्षा थोडी वेगळी आहे. मला जो डॉक्टर-मित्र येथे अभिप्रेत आहे. तो नेहमी तुम्हाला तपासणारा किंवा अगदी तुमच्या गावात राहणारा असावा असेही नाही. तो तुम्हाला मित्रत्वाच्या भावनेतून वैद्यकीय सल्ला देणारा असा जवळचा स्नेही असला पाहिजे. कुटुंबावर किंवा तुमच्यावर मोठ्या वैद्यकीय मदतीची वेळ येईल तेव्हा हा डॉक्टर-मित्र तुमच्या मुख्य सल्लागाराची भूमिका पार पाडेल. मला माझ्या सिरीयस रुग्णांचे उपचार सुरू असताना अथवा दुसऱ्या गावाहून एडमिट असलेल्या बाळाला नेमके काय झाले आहे.याची चौकशी करणारे फोन येत असतात. फोन करणारे हे डॉक्टर रुग्णाचे कौटुंबिक मित्र असतात. रोज सुरू असलेल्या उपचारांबद्दल आपल्या यां फॅमिली डॉक्टर मित्राला स्वत: आपण माहिती देत असतो पण या कौटुंबिक मित्राकडून उपचार नीट सुरू असल्याचे रुग्णाच्या नातेवाइकांना कळले की ते आश्वस्थ ही होतात वा त्यांना आपल्या जवळच्या फॅमिली डॉक्टर वर ही वेगळा विश्वास निर्माण होतो.आपले उपचार करत असलेल्या डॉक्टरशी असा संवाद घडवून आणायचा असेल तर काही गोष्टी काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. कुठल्याही वैद्यकीय प्रसंगांच्या वेळी उपचार करणाऱ्या डॉक्टरचा त्रागा होतो. त्यामुळे आपल्या डॉक्टर मित्रांचे आपल्या डॉक्टरांशी बोलणे करून द्यायचे असेल तर आधी त्यांची परवानगी घ्या, वेळ घ्या व मगच असा संवाद घडवा .डॉक्टर मित्र असाच मिळत नाही.तर याची जाणीव सर अगदी ठेवत आले आहेत

सामान्य असो की राजकारणी : डॉक्टर मित्र दोघांनाही तितकाच आवश्यक !

तो जोडावा लागतो, जोपासावा लागतो. मित्र म्हटले की सगळे संदर्भ बदलतात. त्याच्याशी प्रेमपूर्वक संवाद साधणे, कौटुंबिक संबंध जोडणे हे कौशल्य आहे. मग यात त्याच्या वाढदिवसाला आवर्जून त्याला शुभेच्छा देणे, त्याला व्यवसायाच्या माध्यमातून गरज भासल्यास ती करणे अशा अनेक गोष्टी असू शकतात. मी डॉक्टर पेस्टनजी यांचं बारीक निरीक्षण केले आहे की, वसई असो की बाहेरील जिल्हातील राजकीय किंवा सामाजिक व्यक्ती असो अनेक मोठ्या व्यक्तींनीही असा डॉ. मालकम सारखा चांगला डॉक्टर-मित्र जोपासला आहे. याचे माझ्या बघण्यातील सर्वोत्तम उदाहरण भरपूर आहेत मुद्दाम मी नावे घेणार नाही म्हणजेच डॉ मालकम त्या कुटुंबाचे फक्त फॅमिली डॉक्टरच नव्हे, तर त्यांचे कौटुंबिक-डॉक्टर-मित्र आहेत. आज वसईतील आजी माजी आमदार खासदार, मंत्री, महापौर,सभापती, नगरसेवक,काही पत्रकार जेष्ठ संपादक, वकील, बिल्डर, उद्योजक अगदी सोशल वर्कर आदी मान्यवर मंडळी वैद्यकीय उपचारात डॉ. पेस्तनजी यांचा एक किंवा दुहेरी सल्ला अगदी आवर्जून घेतात काही खुलेआम घेतात काही गुपचूप घेतात मात्र काहींनी राजकीय चातुर्यापेक्षा त्यांनी डॉक्टर मालकम सारख्या मित्राशी जोपासलेला जिव्हाळा शिकण्यासारखा आहे. बघा ना काही ठराविक एवढ्या मोठ्या राजकारणी माणसांना जर मालकम सारख्या डॉक्टर-मित्राची आवश्यकता वाटत असेल तर ती आपल्यालाही नक्कीच आहे.प्रत्येक डॉक्टरच्या आयुष्यात अशा काही व्यक्ती येतात ज्यांचा त्याच्यावर आपोआप हक्क निर्माण होतो. आपल्या वागण्यातून हा हक्क आपण आपल्या डॉक्टर मित्राच्या आयुष्यात निर्माण करू शकतो. आपल्याला वाटेल की डॉक्टर व्यस्त असतात वा त्यांना अशा मित्रांची गरज नसते; पण डॉक्टरही अशा प्रेमळ नात्यांची बेटं शोधत असतात. असे अनेक ‘डॉक्टर-मित्र’ तुमच्या आमच्या सभोवती आहेत. किंबहुना शोधा म्हणजे जरूर सापडेल !

डॉ पेस्तनजीचं सर्व कुटुंब रंगलंय वैद्यकीय व्यवसायात !

डॉ मालकम यांच्या यां सर्व यशात त्यांनी जरी त्यांच्या गोल्डन पार्क रुग्णालय व तेथील सर्व डॉक्टर, स्टाफ व अन्य कर्मचारी वर्गांच्या सहकार्या मुळेचं मी हे यश मिळवू शकलो हे जरी सत्य असले तरी खऱ्या अर्थी त्यांची पत्नी डॉ. लीना पेस्तनजी यां ही त्यांच्या प्रत्येक कार्यात खांद्याला खांदा देऊन आज जगभर त्यांच्या समवेत विविध मार्गदर्शन शिबीर ( सेमिनार ) साठी त्यांना सहकार्य करत आहेत मग त्यात डॉक्टरांच्या गैरहजेरीत डॉ जहागीर पेस्तनजी हे रुग्णालय बघत आहेत तर छोटी मुलगी डॉ. फराह पेस्तनजी ही नवी मुंबईत उचभू मेडिकल कॉलेज मध्ये उच्च वैद्यकीय शिक्षण घेत आहे तिच्या सोबत डॉ जहागीर यांची पत्नी देखील परदेशात उच्च वैद्यकीय शिक्षण घेत आहे त्यामुळे हे पेस्तनजी कुटुंबच अवघ यां वैद्यकीय व्यवसायात रंगलंय असे म्हणता येईल आणि तूर्तास डॉ.पेस्तनजी पत्नी लीना पेस्तनजीव डॉ जहागीर हे तिघे ही सध्या आपले कार्य उत्तम रित्या करीत आहेत,एकूणच डॉ.पेस्तनजी यांनी आजवर समाजातील सर्व घटकांच्या लोकांची,गरजूंची सेवा वसईकरांच्या सदैव स्मरणात राहणारी अशीच आहे हा माणुसकीचा दृष्टिकोन समोर ठेवत त्यांना अभिष्टचिंतन करीत त्यांना आजच्या ६१ व्या वाढदिवसा दिनी mymarathi7.com तर्फे लाख लाख शुभेच्छा देत आहोत .”खरोखरच वैद्यकीय शिक्षण म्हणजे खोऱ्याने पैसा ओढण्याचा परवाना असे समजणार्‍या डॉक्टर्स व काही हॉस्पिटल प्रशासनानी डॉ. मालकम पेस्तनजी यांच्या सारख्या सेवाभावी अवलिया कडून जरूर शिकण्यासारखे आहे, हेच खरे !

 

 

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!