वसई-विरार शहराच्या सुनियोजित विकासांत वास्तुविशारद ( Architect ),अभियंते (engineer’s) यांची अभ्यासू भूमिका अत्यंत महत्त्वाची — महापौर अजीव पाटील
विरारच्या आई जीवदानी गडावर उभारली १५०० फूट उंचीची अद्भुत ‘ग्लास गॅलरी’ ; भक्तांना दिसणार सफाळे ते उत्तन परिसरातील अरबी समुद्राचं विहंगम दृश्य एकाच दृष्टिक्षेपात…
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.(भा.प्रा.से ) यांची नियुक्ती : पुणे शहराचे शिलेदार वसई विरार शहरात..
वसई पोलिसांनी काढलेला जमावबंदीचा आदेश मोडीत काढत वसईकर नागरिकांचा डीसीपी -झोन २ कार्यालयावर धडक मोर्चा
विरार मध्ये “शारदा हाईट्स” इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग ; 9 जणांची केली सुखरूप सुटका

वसईच्या संघर्षकन्या आम.स्नेहाताई दुबे- पंडित यांनी दिली मीरा भाईंदर- वसई-विरार पोलिस आयुक्तालयाला सन्मान भेट

 

भारतातील दुसरी मोठी कारवाई : महाराष्ट्र ते तेलंगणा, धागेदोरे देशाबाहेर…?

१२ हजार कोटींच्या ड्रग्स प्रकरणी पोलीस आयुक्त निकेत कौशिक व त्यांच्या गुन्हे शाखेच्या टीम ने केलेल्या ऐतिहासिक कारवाईचं कौतुक तथा महाराष्ट्र पोलिसांचे मनोबल उंचवण्यासाठी स्वतः आमदार स्नेहाताईनीं हीं भेट दिली व या भेटीत पोलीस आयुक्त कौशिक यांचे अभिनंदन केलं व चर्चा हीं केली तसेच  याप्रसंगी राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हीं त्यांनीं खूप कौतुक केलं आहे.

वसई :- आशिष राणे 
राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या मोठ्या ड्रग्स प्रकरणी अलीकडेच पोलिसांनी एका ड्रग्स पेडलर महिलेला अटक केली होती. चौकशी दरम्यान उघड झालेल्या माहितीनुसार पोलिसांनी थेट तेलंगणा राज्यातील कारखान्यावर छापा टाकून तब्बल १२ हजार कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले, या कारखान्यावर तत्काळ कारवाई करून तो बंद हीं करण्यात आला.

या ऐतिहासिक कारवाई बद्दल वसई विधानसभेच्या संघर्षकन्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी नुकतीच मीरा भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्तालय, मीरा रोड (पूर्व) येथे भेट देऊन पोलिस आयुक्त निकेत कौशिक व त्यांच्या पोलिस दलाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

या भेटीत आमदार स्नेहाताईंनी पोलिस दलाच्या धाडसपूर्ण पावलांचे कौतुक करताना ही कारवाई समाजहिताचे आणि भावी पिढ्यांच्या संरक्षणाचे मोठे कार्य असल्याचे सांगितले.

तसेच, वसई परिसरातील कायदा-सुव्यवस्था, वाढते अनधिकृत बांधकाम, तसेच बांगलादेशी नागरिकांचे प्रमाण यांसारख्या गंभीर प्रश्नांवरही सविस्तर चर्चा झाली. यावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे आमदार स्नेहाताईंनी अधोरेखित केले.

आणि वसईकरांचा पोलिस दलावरील विश्वास अधिक दृढ झाला….!

“या अभिनंदन भेटीद्वारे वसईकरांचा पोलिस दलावरील विश्वास अधिक दृढ झाला असून पोलिस प्रशासन यांचे संयुक्त प्रयत्न निश्चितच वसईकरांसाठी सुरक्षित आणि गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यात यशस्वी ठरतील असा ठाम विश्वास हीं जनते मध्ये या निमित्ताने निर्माण झालाय..”

आमदार स्नेहाताई दुबे पंडित 

वसई विधानसभा 

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!