वसई :- आशिष राणे

वसई–विरार असोसिएशन ऑफ होमिओपॅथस(V.V.A.H.) तर्फे आयोजित केलेला “कर्करोग व्यवस्थापनातील होमिओपॅथिक दृष्टिकोन” या विषयावरील राष्ट्रीय सीएमई सेमिनार यशस्वीरीत्या पार पडला. या सेमिनारमध्ये देशभरातील 130 हून अधिक डॉक्टरांनी आपला सहभाग नोंदवला तर विशेषतः या सेमिनार मध्ये आंतरराष्ट्रीय डॉक्टरांचाही सहभाग होता.
दरम्यान रविवार दि.25 मे रोजी संपूर्ण दिवसाची ही शैक्षणिक परिषद ओप्युलेंट हॉल, दत्तानी मॉल, वसई (पश्चिम) येथे यशस्वीपणे पार पडली.
यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून जागतिक किर्तीचे होमिओपॅथिक कर्करोगतज्ज्ञ डॉ. ए.यू. रामकृष्णन (M.B.B.S., MF Hom – London, Ph.D – USA, DHM – Germany, FRSH – UK, HMD – UK) यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या तब्बल 40 वर्षांच्या व्यापक अनुभवातून कर्करोगाच्या होमिओपॅथिक उपचारांवरील प्रभावी प्रोटोकॉल, थेट केसेस व चिकित्सकीय दृष्टिकोन उपस्थित डॉक्टरापूढे अभ्यासपूर्ण सादर केला.
विशेष म्हणजे या सेमिनारच्या आयोजनासाठी प्रमुख फार्मास्युटिकल कंपन्यांचे प्रायोजकत्व लाभल्याने हा सेमिनार हायब्रिड स्वरूपात आयोजित करण्यात आला म्हणजेच डॉक्टरांनी प्रत्यक्ष सभागृहात ही उपस्थित राहून किंवा काहींनी झूमद्वारे थेट सहभागी होण्याचा पर्याय ते यांसाठी निवडू शकले.
या सेमिनारमध्ये वसई–विरार असो.ऑफ होमिओपॅथ्सचे अध्यक्ष डॉ. अजय पेडणेकर म्हणाले,की “हा कार्यक्रम केवळ शैक्षणिक नव्हता, तर तो संपूर्ण भारतातील होमिओपॅथिक वैद्यकिय तज्ज्ञांना एकत्र आणण्याचा एक सकारात्मक व प्रामाणिक प्रयत्न होता जेणेकरून ते कर्करोगासारख्या गुंतागुंतीच्या आजारांमध्ये अधिक समजूतदार आणि प्रभावी उपचार यापुढे करू शकतील,
आणि हा सेमिनार एक शैक्षणिक दृष्टीने मैलाचा दगड ठरला !
अर्थात देशभरात व आंतरराष्ट्रीय स्तरावरील १३० हुन अधिक डॉक्टर या सेमिनारसाठी वसईत उपस्थित राहतात आणि हा सेमिनार यशस्वी करतात हे जरी उत्तम व मार्गदर्शक ठरलं असलं तरी हा कर्करोग व्यवस्थापनांतील होमिओपॅथिक दृष्टिकोन” या प्रभावी विषयावरचा हा सेमिनार कुठंतरी एक शैक्षणिक दृष्टीने मैलाचा दगड ठरला आहे.” अशी प्रतिक्रिया उपस्थित डॉक्टरांनी दिली आहे
![]()
