पर्यावरण रक्षणासाठी श्री जीवदानी देवी संस्थांनाचा पुढाकार : तालुक्यातील गृहनिर्माण सोसायट्यांना रोपवाटीकेतील वृक्षाचे वाटप करणार !

विरार :- संदिप पंडित

जागतिक पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड आणि त्याचे संगोपन महत्वाचे मानले जात आहे यासाठी आता श्री जीवदानी देवी मंदिर संस्थान यांनी पुढाकार घेतला असून ते वसई तालुक्यातील इच्छुक सहकारी गृहनिर्माण संस्थांना तसेच इच्छुक व्यक्तींना श्री जीवदानी देवी संस्थानाच्या रोपवाटिकेतील वृक्षाचे वाटप करणार आहे.


श्री जीवदानी देवी मंदिर संस्थान यांनी आपल्या रोपवाटिकेमध्ये निरनिराळ्या देशी वन प्रजातींची रोपे तयार केली आहेत. या रोपांचे तालुक्यातील गृहनिर्माण सोसायट्या तसेच इच्छुक व्यक्तींना विनामूल्य वाटप करण्यात येणार असल्याचे श्री जीवदानी देवी संस्थानाचे विद्यमान अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर आणि उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांनी जाहीर केले आहे.

ज्या कोणाला रोपे हवी असतील त्यांनी काही नियम पाळायचे आहेत. त्यात रोपे घेतेवेळी त्यांचे संरक्षण व जतन केले जाईल अशी हमीपत्र देणे बंधनकारक असणार असल्याचे ही सांगण्यात आले.
दरम्यान या सर्व गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना तसेच व्यक्तींना या निवेदनाद्वारे आवाहन करण्यात येत आहे की, सदर रोपांसाठी खाली दिलेल्या नंबर वर मागणी अर्जासह संपर्क साधावा.

रोपे वाटप कालावधी 1 जून पासून सुरू होणार !

रोपे वाटपाचा कालावधी दि 1 जून 2025 ते दि 31 जुलै 2025 राहणार आहे. संस्थानाने दिलेली झाडे जगविण्याची जबाबदारी हि गृहनिर्माण सोसायट्यांची असेल असे ही संस्थांना तर्फे सांगण्यात आले.
रोपे घेण्यासाठी 9209845921 व 8788902551

या नंबरवर संपर्क साधून पर्यावरण रक्षणाला हातभार लावण्याचे ही आवाहन श्री जीवदानी देवी मंदिराचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर व उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांनी केले आहे.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!