सोमवंशी क्षत्रिय समाज महामंडळचा हिरक महोत्सव उत्साहात साजरा…..
समाजाच्या विविध कार्यात काम करताना माणूस चुका करणारच मात्र चुका सुधारायच्या असतात…. हितेंद्र ठाकूर

वसईतील खुतोडी, मांडलई, मुळगाव, किरवली, उमेळे या पाच गावांनी मिळून स्थापन केलेल्या सोमवंशी क्षत्रिय समाज महामंडळाने रविवारी आपल्या कार्याची ६० वर्षे पूर्ण केली.एकार्थी हे महामंडळ जऱी वयाने ६० वर्षे वयाचं झालं असलं तरी खऱ्या अर्थाने ते तरुण झाल्याची आठवण माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी समाज बांधवाना करून दिली, काम करताना माणूस चुका करणारच मात्र चुका सुधारायच्या असतात मात्र वारंवार चूक करतो तो कार्यात म्हणजे च दुधात मीठ टाकण्याचं काम करतो हे योग्य नाही… त्यामुळे सर्वांनी समाजासाठी व त्याच्या उन्नती साठी एकत्रित काम करा…. तरच आपला समाज मोठा व प्रगत होईल….!
वसई:- आशिष राणे
दारिद्र्य आपल्या डोक्यात असतें ते कधी हीं खिश्यात नसते, मनांत प्रबळ जिद्द असेल तर आपण यशस्वी होऊ शकतो, समाज महामंडळ स्थापन करणे सोपे आहें मात्र ती टिकवणे आणि वाढवणे हा एक जिद्धी चा प्रवास आहें, या महामंडळाच्या माध्यमातून उभे असलेले समाज मंदिर आणि वसई विकास सहकाऱी बँक हीं महामंडळंची यशस्वी गाथा असल्याचे प्रतिपादन वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सोमवंशी क्षत्रिय समाज महामंडळाच्या हिरक महोत्सवी समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना केले,वसईच्या न्यू इंग्लिश स्कुलच्या मैदानात (दि.१) हिरक महोत्सवी सांगता समारंभ उत्साहात संपन्न झाला.

वसईतील खुतोडी, मांडलई, मुळगाव, किरवली, उमेळे या गावांनी मिळून स्थापन केलेल्या सोमवंशी क्षत्रिय समाज महामंडळाने रविवारी आपल्या कार्याची ६० वर्षे पूर्ण केली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार हितेंद्र ठाकूर होते तर विशेष अतिथी म्हणून आमदार श्रीमती मनिषाताई चौधरी, आमदार राजन नाईक ,सोमवंशी क्षत्रिय समाज महामंडळाचे अध्यक्ष नरेश राऊत, वसई विकास सहकारी बँकेचे चेअरमन आशय राऊत,समाज मंदिर ट्रस्टचे चेअरमन नितीन म्हात्रे,माजी महापौर प्रवीण शेट्टी, महामंडळाचे जेष्ठ नेते प्रभाकर घरत यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र राऊत यांनी केले, यावेळी महामंडळाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला. तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष जगदीश राऊत यांनी महामंडळाच्या स्थापने पासूनच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला,
अर्थात महामंडळाच्या माध्यमातून स्थापन झालेल्या समाजमंदिर ट्रस्ट आणि वसई विकास बँक उभारताना आलेल्या आठवणी सांगतानाच यापुढे डे केअर,हॉस्पिटल, शाळा आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असा तब्बल १० कोटी रुपयांच्या योजनेचा संकल्प जाहीर करतानाच महामंडळ चांगले नागरिक घडविण्याचा एक सुंदर प्रयत्न करत असल्याचेहीं जगदीश राऊत यांनी अभिमानाने सांगितले.
या कार्यक्रमात हिरक महोत्सवी वाटचालीचा आढावा घेणाऱ्या समग्र माहिती स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले,त्याच बरोबर महामंडळ स्थापने मध्ये योगदान देणाऱ्या जेष्ठाचा व दिवंगत कार्यकर्त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यकमाला नालासोपारा आमदार राजन नाईक यांनी शुभेच्छा देताना सांगितले कीं, महा महामंडळा च्या विकास योजना मध्ये सर्व तोपरी माझी मदत व सहकार्य कायम राहिल, तर दहिसरच्या आमदार मनीषाताई चौधरी यांनी सांगितले कीं, माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महामंडळाच्या ज्या काही योजना आणि उदिष्ट राबविण्यात येणार त्या सरकार दरबारी पूर्ण होण्यासाठी आम्ही सदोदित मदत करू असे आम.चौधरी यांनी आवर्जून स्पष्ट केलं.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद सावे आणि संदेश वर्तक यांनी केले तर आभार शेवटी हेमलता राऊत यांनी केले.या कार्यक्रमाला नागरिक, समाज बंधु भगिनी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला मंत्री अतुलजी सावे यांची अनुपस्थिती…
या सो.क्ष .समाज महामंडळाचे सुपुत्र अतुलजी सावे,( मंत्री गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण, महाराष्ट्र राज्य) कार्यक्रमास उपस्थित राहणार होते,मात्र स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादाचं निधन व त्यात अर्थसंकल्प तोंडावर आहें, त्यामुळे पक्षाने विप बजावला आहें, अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मंत्री अतुलजी सावे यांना महत्वाची जबाबदारी दिली आहें. त्यामुळे ते इच्छा असूनही उपस्थित राहू शकले नाही मात्र मी स्वतः व आमदार राजन नाईक आम्ही सभागृहाची परवानगी घेऊन या समाजाच्या हिरक महोत्सवाला आलो आहोत..
आमदार मनीषाताई चौधरी
दहिसर विधानसभा मतदारसंघ
![]()
