शिक्षणाला वयाची अट नसते : 58 व्या वर्षी नांदगावचे अजित शरद राणे (LL.B) वकिलीची परीक्षा उत्तीर्ण..!

मेहनत जिद्द व चिकाटीच्या जोरावर….नांदगाव”चे सुपुत्र अजित शरद राणे यांनी संपादन केली विधी शाखेची ( एल एल.बी ) पदवी….


वय सोडा : अभ्यास व शिक्षणामुळे मनाची कवाडं खुली होतात…! हे पुन्हा सिद्ध झालं…
58 व्या वर्षी विधी शाखेची पदवी (LL.B) Bachelor Of Legislative Law पूर्ण करणे हा एक अत्यंत प्रेरणादायी आणि कायदेशीर दृष्ट्या शक्य असलेला निर्णय आहे, जसं की, प्रेमाला वयाची अट नाही तसं भारतात कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही हें सर्वश्रुत आहे.आपण आयुष्यभर स्वतःला विद्यार्थी समजलं आणि
सतत काहींना काही शिकत राहिल्यानं आपण वयाने कितीही वर्षाचे होऊ दया, वारंवार आपणास विद्यार्थी असल्याची प्रत्यक्षात खात्री होतचं राहते, किंबहुना इतरांना ही आपण अधिक हक्काने शिक्षणासाठी प्रवृत्त करण्यास ऊर्जा ही मिळते, आपण सर्वांनी हे समजलं पाहिजे की, अभ्यास व शिक्षणामुळे मनाची कवाडं खुली होतात, तर त्यात अधूनमधून नवनवीन विचारांची त्यामध्ये भर देखील पडते,
आधी विद्यार्थीदशा, नंतर नोकरीं त्यात कुटुंब, सामाजिक जाणीव या सर्वामधून शैक्षणिक इच्छेला काही प्रमाणात न्याय देता येईल का ? तर..या सर्वांवर एकूणच परिस्थिती विषयी त्यांनी व्यक्त होऊन याविषयी विधिज्ञ् अजित भाऊंशी केलेली ही..बातचीत…

पालघर / वसई :- आशिष राणे…शैक्षणिक विशेष..लेख ✍️

शिक्षण घेण्यासाठी वय किती झालं हें महत्वाचे नसते, महत्वाची असतें ती शिकण्याची तीव्र अशी प्रबळ इच्छा आणि अंगी अभ्यासू वृत्ती, जीं व्यक्ती नेहमी शिक्षणाची कास धरून आपलं घर, कुटूंब उद्योग- नोकरीं आणि खास करुन आपला समाज व सामाजिक जाणीव सांभाळून मेहनत घेते, तिच व्यक्ती आयुष्यात नवनवीन यश संपादन करीत असतें,

किंबहुना ही व्यक्ती कोणी दुसरी तिसऱी नाही तर तुमच्या आमच्या आजूबाजूची, आपल्या नात्यातीलचं आणि खास करुन “आम्ही नांदगावकर ” सारख्या बुहूतांशी अशा विविध सोशल मीडियावर अगदी तत्पर, सक्रिय आणि सकारात्मक विचारांची देवाणघेवाण करणारे नवोदित वकील अजित भाऊ ही आहे. , त्यांनी मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर आजच्या तरुणाईलाही लाजवेल असं आपलं कर्तृत्व या 58 व्या वयातही सिद्ध केलं आहे,


पालघर जिल्हातील बोईसर – नांदगाव या गावचे सुपुत्र अजित शरद राणे यांनी पालघर येथील सोनोपंत दांडेकर लॉ कॉलेज मधून नुकतीच (एल एल.बी ) विधी शाखेची पदवी संपादन करीत आता यापूढे विधिज्ञ् (वकील) अजित शरद राणे म्हणून आता ओळखले जाणार आहेत.

38 वर्षाचा औद्योगिक सेवेचा दांडगा अनुभव : पावती मिळाली 

सुरुवातीच्या काळात प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासोबत वयाच्या 20 व्या वर्षी पासून घराला हातभार म्हणून खाजगी नोकरींत रममाण होताना अजितभाऊ यांनी तब्बल 20 वर्षे औद्योगिक क्षेत्रात कामकाज केलं आणि त्यानंतर मागे वळून न पाहता उराशी असलेल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी प्रसिद्ध अशा बोईसरच्या कॅमलीन कंपनीत मुलाखत दिली आणि तें एच आर विभागात रुजू ही झाले, मागील 18 वर्षे त्यांनी एच.आर हेड म्हणून काम करत कॅमलीन कंपनीच्या विविध रंगात तें कधी मिसळून गेले तें अगदी सेवानिवृत्ती होईपर्यंत कळलं सुद्धा नाही आणि अखेर 18 वर्षाच्या प्रदीर्घ सेवाकाळा नंतर फेब्रुवारी 2026 मध्ये तें सन्मानपूर्वक कॅमलीन कंपनीतुन सेवानिवृत्त झाले,
आपल्या शांत, सौम्य, हसऱ्या स्वभावाचा गुणविशेष शैलीचा त्यांना नेहमीच सकारात्मक फायदा झाला, कुटुंब असो, नातेसंबंध असो मैत्री असो की सामाजिक भूमिका असो त्यांनी आपल्या आचार व विचारात नेहमीच समजून व समजवण्याची भूमिका साकारली, किंवा दैनंदिन आयुष्यात संयम बाळगणाऱ्या अजित भाऊ यांनी एच.आर हेड म्हणून आपल्या नोकरींला वेगळा आयाम व खऱ्या अर्थी न्याय दिला, हे ही तितकंच सत्य आहे.
त्यांच्या या 18 वर्षांच्या सेवा काळात त्यांनी विविध असे कामगार, औद्योगिक, पर्यावरण कायदे तसेच फॅक्ट्ऱी कायदा अशा विविध विषयात या पदवी संदर्भातले सखोल ज्ञान तसे पाहता आधीच आत्मसात केलं होतं, किंबहुना आता तें प्रत्यक्षात विधी विभागाच्या पदवीने मिळवले आहेच , त्याचा त्यांना यापुढे ही सेवेत निश्चितच फायदा होईल.

राजकीय कमी मात्र सामाजिक… क्षेत्रात – सोशल… म्हणून नेहमी सक्रिय…
दरम्यान च्या काळात अजितभाऊ हें नोकरीं करत असताना त्यानी आपल्या (ब्राह्मण) समाजाचं कार्य असो किंवा गावातील अन्य सामाजिक व्यवस्था, मदत सहकार्य अशा जाणीवतें मधून निर्माण झालेली नात्यांची कास कधीही सोडली नाही, तर त्यांनी “ती वीण अजूनही कशी घट्ट राहिल व होईल” त्यासाठी तें आजही सोशल मीडियाच्या खास करुन “आम्ही नांदगावकर” असो किंवा अन्य विविध माध्यमातून तें 24/7 सक्रिय असतात हे कौतुकास्पद आहे.
सामाजिक जाणीवते मधून हळूहळू त्यावेळेस मागे वळून बघताना नांदगाव गावात तें राजकीय दृष्टीने म्हणजे शिवसेना पक्षातून नांदगाव ग्रामपंचायतची निवडणूक लढवली, सदस्य म्हणून तें सन 1997 तें 2002 या कालावधीत सरपंच पद ही त्यानीं सन्मामाने भूषवलं मात्र तसं पाहता तें राजकारणात फारसे रमले नाहीत, मात्र त्यांच्या पुढे उदरनिर्वाह,कुटूंब आणि नोकरीं सांभाळून शिक्षण ही घेणं तितकंच गरजेचे वाटलं आणि तें आज बघता बघता कायदे अभ्यासक म्हणून वकील ही झाले असो…
किंबहुना अजित भाऊंनी केवळ राजकीय होणं जास्त पसंत न करता त्यांनी सामाजिक जाणीव यावर अधिक भर दिला आणि चक्क त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, कला, औद्योगिक अशा विविध विषयात ही पदाधिकारी सदस्य म्हणून कामकाज करत आजही तें सक्रिय राहिले आहेत हे विशेष व उल्लेखनीय आहे..त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..!

अजित भाऊंचा आत्तापर्यंतच्या सामाजिक वाटचालीचा हा...आलेख
1. कोकण मराठी साहित्य परिषद, बोईसर शाखेचा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत,

2. ITI वाणगाव तसेच पालघर येथील मॅनेजमेंट कमिटी मेंबर

3. टीमा (Tarapur Industrial Manufacturers Association ) चा मॅनेजमेंट कमिटी मेंबर

4. दांडेकर कॉलेज, पालघर येथील माजी विद्यार्थी संघाचा उपाध्यक्ष तसेच डेवलपमेंट कमिटी मेंबर

5. आजवर 56 वेळा रक्तदान करून समाजात एक आदर्श घालून दिलेला आहे

6. अपंग मित्र पुरस्काराने सन्मानित.

7. अखिल गोवर्धन ब्राह्मण संघाचे उपाध्यक्ष
================================
काय म्हणाले अजित भाऊ :मनं की बात

“विधी शाखेचा पाच वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पहिल्यांदाच पालघर येथील सोनोपंत दांडेकर लॉ कॉलेज मध्ये आल्यामुळे माझ्यासहित अनेक विद्यार्थी ज्यांना नोकरी सांभाळून शिक्षण करायची इच्छा होती त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी होती.
अर्थात वयाच्या 58 व्या वर्षी आणखी एक पदवी प्राप्त केल्याचा मला नक्कीच आनंद तर आहेच पण अभिमान देखील जास्त आहे. खूप चांगला प्रवास होता.
दांडेकर कॉलेजने ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे एकूणच व्यवस्थापन, तसेच आम्हाला पाच वर्ष अविरतपणे शिकविणारे आणि यशस्वी करणारे सर्व शिक्षकवर्ग आणि इतर शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक मॅडम, सर्वांचेच जाहीर आभार, तसेच वकिलीची पदवी मिळविलेल्या सर्व यशस्वी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे देखील मी हार्दिक अभिनंदन करतो,”
तसेच यापुढे इतक्यावर नं थांबता…नुसतं एल एल बी पदवीधर म्हणून न राहता यापुढे एल एल. एम ( Master of Law’s ) परीक्षा देण्याचा ही मानस असल्याचे अजित भाऊंनी #मायमराठी7.कॉम शी बोलताना स्पष्ट केले.
================================

✅⚠️महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal : @Mymarathi7.कॉम वर संपर्क साधावा.

======================================

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!