आई जीवदानी देवीच्या गाभ्याऱ्यातुन पुढे पर्यटकांना काय पाहायला मिळणार…?
या “ग्लास गॅलरी” तून उभे राहिल्यावर पर्यटकांना विरार पासून ते थेट उत्तनच्या खाडीपर्यंत आणि पलीकडे सफाळ्या पर्यंतचा निसर्गरम्य परिसर डोळ्यांत साठवता येईल. डोंगरदऱ्यांचे सौंदर्य आणि अथांग पसरलेले शहर यामुळे हे ठिकाण भविष्यात पालघर जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन केंद्र ठरणार आहे मुळात ते आहेच…
✅विरार स्थित आई जीवदानी मंदिर परिसर चित्रीकरण..☝️
वसई :-आशिष राणे
अवघ्या पालघर जिल्ह्यातील खास करून वसई-विरार शहर व ग्रामीण भागाचे आराध्य दैवत असलेल्या आई जिवदानी देवीच्या डोंगरावर पर्यटनाच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.
भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी गडावर आता एक भव्य ‘काचेची गॅलरी’ उभारण्यात आली असून, लवकरच ती सर्वसामान्य भक्त वर्गा साठी खुली होणार आहे.
खास आकर्षण म्हणजे समुद्रसपाटीपासून सुमारे १५०० फूट उंचीवर असलेल्या या गॅलरीतून पर्यटकांना निसर्गाचा अद्भुत नजारा अनुभवता येणार आहे.

महत्वाचे म्हणजे या गॅलरी मधून उजव्या बाजूला सफाळे ते डाव्या बाजूस भाईंदरचा उत्तन परिसराचा अथांग अरबी समुद्र पाहायला मिळत आहे. त्याच बरोबर पूर्ण विरार अर्नाळा परिसरही पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
विशेष बाब अशी कीं, या गॅलरीचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार असून या गॅलेरीमुळे देवदर्शना बरोबरच भाविकांना पर्यटनाचाही मोठा आनंद लुटता येणार आहे.

✅adv
ही गॅलरी ३० मीटर परिघाची असून त्यात बसवण्यात आलेल्या काचेची रुंदी 8 बाय 8 फूट आहे. या प्रकल्पासाठी वापरण्यात आलेली काच ईएसआरए (Essaar )या कंपनीतून मागवण्यात आली असून ती विशेष तंत्रज्ञानाने तयार करण्यात आली आहे.
या काचेची जाडी ३९ मिमी इतकी आहे.

एकाच वेळी एका काचेवर साधारण ५० लोक उभे राहू शकतात तर या ठिकाणी एकूण २०० पर्यटक एकाच वेळी या गॅलरीत फिरण्याचा आनंद घेऊ शकतात तसेच ही संपूर्ण गॅलरी सुमारे ३.५ टन वजनाचा भार पेलण्यास सक्षम आहे.

✅Adv
या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी एकूण ८४ लाख इतका खर्च करण्यात आला आहे. एप्रिल-मे २०२५ मध्ये काचांची ऑर्डर देण्यात आली होती. काचा तयार होऊन येताच फेब्रुवारी २०२६ पर्यंत गॅलरीचे काम पूर्ण करण्यात आले. सध्या तिथे सुरक्षा यंत्रणा आणि आकर्षक रोषणाईचे (लाइटिंग) काम युद्धपातळीवर सुरू आहे.

✅ वसई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदिप पंडित, खजिनदार अरुण सिहं, लोकसत्ताच्या प्रज्ञा..सकाळ चे संजोग यांनी भेट दिली असता अभियंता हेमंत महाजन यांनी याप्रसंगी या मंदिराच्या उपक्रमाची सविस्तर माहिती विषद केली.
ग्लास गॅलरीचे लोकार्पण लवकरच…
या गॅलरीचे लोकार्पण लवकरच मोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. डोंगरावरील दुर्गम भागात काचा पोहोचवणे कठीण असल्यामुळे यासाठी अत्याधुनिक क्रेनचा वापर हीं करण्यात आला. विशेष म्हणजे या क्रेन आई जीवदानी मंदिर संस्थानने तयार केल्या होत्या आणि त्यासाठी जवळपास ८ लाख रुपयांचा खर्च झाला होता. यात एकूण तीन क्रेनचा वापर असून श्री आई जीवदानी मंदिर संस्थानाने विशेषतः या कामासाठी तयार केलेली ‘स्पेशल पर्पज क्रेन’ गॅलरीच्या कामासाठी अतिशय उपयुक्त ठरली, अशी माहिती अभियंता हेमंत चंद्रकांत महाजन यांनी दिली.
तर येथील काचेच्या गॅलरी चा अनुभव घेण्यासाठी पुढील काळात मोठया संख्येने भक्तगणं गर्दी करणार हे निश्चित आहे..
============================== =====
जीवदानी देवीच्या दर्शनासाठी राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.त्यांना देवदर्शना बरोबरच पर्यटनाचा आनंद मिळावा या दृष्टीने हि गॅलरी बनविण्यात आली आहे.
परदेशात अश्या गॅलरी,काचेचचा ब्रिज आपल्याला बघायला मिळतो परंतु प्रत्येकालाच हे बघण्यासाठी परदेशात जाता येत नाही यासाठी अशा ग्लास गॅलरी याठिकाणी तयार केली आहे. या गॅलरीत उभे राहिल्यावर सफाळ्या पासून ते अगदी उत्तन पर्यंतच्या परिसराचा विलोभनीय देखावा बघायला मिळतो
त्याच बरोबर याठिकाणाहून संध्याकाळचा सूर्यास्त बघणे हि एक मोठी पर्वणी असणार आहे. या गॅलरीचे लोकार्पण लवकरच करण्यात येणार आहे.
पंकज ठाकूर,
उपाध्यक्ष ,जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट ,विरार
![]()
