वसई :- आशिष राणे
वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील वसई पूर्व पश्चिम भागास पाणीपुरवठा करणारी सूर्याची ८०० मी व्यासाची मुख्य जलवाहिनी शुक्रवार दि २३ मे २०२५ रोजी सकाळी ९ वा.च्या सुमारास वसंत नगरी व एव्हरशाईन रस्त्याच्या दरम्यान लिकेज झाली असून तिच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभाग नियंत्रकाने दिली आहे
दरम्यान महापालिका प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिवसभर हे दुरुस्ती चं काम सुरू राहणार असल्याने सूर्या धरणाची मुख्य जलवाहिनीतुन होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे अर्थात या एकुणच दुरुस्ती साठी साधारणपणे ८ ते १० तास लागण्याची शक्यता असून ही दुरुस्ती झाल्यानंतर देखील टप्याटप्याने पाणीपुरवठा वितरीत करून तो सुरळीत केला जाईल त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरावे व सहकार्य करावे असे ही आवाहन पाणीपुरवठा विभागाने केलं आहे
कुठले प्रभाग व विभाग बंद राहतील !
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती H(नवघर माणिकपूर),प्रभाग समिती I (वसई),प्रभाग समिती D(आचोळा संप चा विभाग),प्रभाग समिती G(वालीव न्यू परेरा नगर) भागांत पुढील दहा तास तरी पाणीपुरवठा बंद राहील याची नागरिकांनि नोंद घ्यावी.
![]()
