वसईतील महावितरण कं.च्या उपव्यवस्थापकास ३० हजारांची लाच घेताना रंगेहात केली अटक

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई
घाबरु नकोस २ लाख रुपयांचे बिल ६० हजार करून देतो ! पण मला ३० हजार रुपये दे !

वसई :- आशिष राणे

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अर्थात महावितरणच्या वसई उपविभाग अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात उपव्यवस्थापक (वित्त व लेखा ) विभागात कार्यरत असलेला कलपेश जयवंत पाटील (वय ५३) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवार दि ९ जून रोजी संध्याकाळी उशिरा ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कार्यालयातच सापळा रचून रंगेहात अटक केली आहे.

काल दि ९ जून च्या रात्रीपासून ही कारवाई व झाडाझडती सुरू होती अखेर मंगळवारी या प्रकरणी ठाणे युनिट च्या अधिकाऱ्यानी लाचखोर आरोपी विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचे एका कंपनीच्या नावे असलेल विद्युत मीटर २०१० सालापासून (पीडी) बंद करण्यात आले होते
दरम्यान आजपर्यंत त्या मीटरच्या वापराबाबत महावितरण कं.कडून तक्रारदारास एकूण रु. २.०६.९२० इतकी थकीत वीज बिलाची रक्कम आकारण्यात येत होती, ही थकीत बिलांची रक्कम कमी करण्याच्या मोबदल्यात कल्पेश पाटील या
लेखा विभाग अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे सुरुवातीला ३५ हजार रुपयांची लाच मागितली असता या संदर्भात रितसर लेखी तक्रार एसीबी ठाणे यांच्याकडे करण्यात आली होती,

तक्रार दाखल होताच ठाणे एसीबीच्या पथकाने या तक्रारीची शहानिशा म्हणून पडताळणी केली असता त्या तक्रारीत सांगितल्या नुसार बिलाची प्रत्यक्षात थकीत रक्कम रु २,०६,९२० /- होती मात्र लाचखोर पाटील याने बिल कमी करून देतो आणि दोन लाख भरायला येईल त्याऐवजी ६० हजार रुपये करून देतो मात्र त्याच्या मोबदल्यात व अन्य उर्वरित सवलतीसाठी मला ३० हजार स्वतःसाठी लाच म्हणून मागितल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.

परिणामी महावितरण च्या या लाचखोर कल्पेश पाटील यांने तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने महावितरण कं च्या वसई पूर्वेला असलेल्या कार्यालयात च सापळा रचला व सोमवारी संध्याकाळी उशिरा लाचखोर कल्पेश पाटील यास रंगेहात हात पकडले व त्यास ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.

याप्रकरणी मंगळवारी सकाळी वसईतल्या माणिकपूर पोलीस ठाण्यात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या फिर्यादिवरून लाचखोर कलपेश पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास वसई कोर्टात ही दाखल करण्यात आले.

दिवसाढवळ्या प्रत्यक्ष अधीक्षक अभियंता यांच्याच कार्यालयात हा खुलेआम लाचखोरीचा प्रकार घडतोय म्हणजेच या प्रकाराला स्वतः वरिष्ठ अधिकारी व अन्य संबंधित अधिकारी वर्गाचे पाठबळ आहे का असा ही प्रश्न आता या लाचखोरीच्या प्रकरणामुळे निर्माण झाला आहे

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!