अखेर वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नगररचना उपसंचालक पदी मनिष भिष्णूरकर यांची नियुक्ती..!

 

मिळाला रे बाबा एकदाचा…. न.. उ….!
सोलापूर मनपातील सहा.नगररचना उपसंचालक पदावर कार्यरत असलेले मनिष भिष्णूरकर यांची
पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्याच्या नगरविकास विभागाने वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नगररचना उपसंचालक पदी नियुक्ती केल्याने आता वसई विरार शहर महानगरपालिकेतील वादग्रस्त नगररचना विभागातील राखडलेली कामे उशिरा कां होईना मात्र कमी अधिक दिवसांच्या कालावधीत पूर्ववत होण्यास एकप्रकारे मदत मिळणार आहे.

वसई :- आशिष राणे

मागील पाच महिन्यांपासून वसई विरार शहर महानगरपालिकेतील नगररचना उपसंचालक पद रिक्त होते, अखेर दिवाळी च्या मुहूर्तावर कां होईना सोमवारी राज्याच्या नगरविकास विभागाने लेखी आदेश जारी करत मनिष भिष्णूरकर यांची नगररचना उपसंचालक पदी नियुक्ती केली आहे.
अलीकडेच एप्रिल – मे 2025 महिन्यात मआधी तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी व नंतर माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर विविध बांधकाम घोटाळ्या प्रकरणी सक्तवसुली संचनालयाने (ईडी) ने मोठी कारवाई केली होती.

या बड्या कारवाईनंतर दस्तूरखुद्द स्वतः माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांनी उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांना महानगरपालिकेच्या सेवेतून निलंबन केले होते. तेव्हा पासून पालिकेतील नगररचना उपसंचालक पद हे रिक्तचं होते. त्यामुळे पालिकेतील बांधकाम परवानग्यासह इतर अनेक प्रमुख अशी कामे बऱ्यापैकी रखडली होती.

दरम्यान रिक्त पद भरण्यासाठी सुरुवातीला वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुनः पावसाळी अधिवेशनात देखील हे पद भरण्यासाठी प्रश्न उपस्थित केले होते अर्थात त्यावेळी लवकरच हे रिक्त पद भरले जाईल असे शासनाने आमदारांना दिलेल्या उत्तरात आश्वासित केलं होत,

परिणामी त्यानंतर जुन-जुलै 2025 मध्ये माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांची ही बदली ठाणे येथे झाली होती किंबहुना त्या बदली नंतर ही पवार यांनी पदभार सोडला नसताना च्या पार्श्वभूमीवर अखेरच्या दिवशी सक्त वसुली संचालनालय यांनी धाडसत्र करत वाय. एस. रेड्डी व माजी आयुक्त पवार यांच्या निवास स्थानी धाडी टाकल्या त्या कारवाईत इडी ला कोट्यावधी चं घबाड सापडलं आणि शेवटी इडी ने रेड्डी व पवार यांच्या सहित अन्य दोघाना ताब्यात घेत दि.13 ऑगस्ट 2025 रोजी अटक केली.

एकूणच या सर्व कारवाईत ही नियुक्ती रखडली व त्यामध्ये शासनाने प्रथम माजी आयुक्त यांची जागा भरली व त्या जागी पर्यटन महामंडळ विभागाचे मनोजकुमार सूर्यवंशी यांची नियुक्ती केली, अर्थात आयुक्त सूर्यवंशी यांनी अगदी आढावा सभेतच नगररचना विभागासाठी नवीन अधिकारी नियुक्त करण्यासाठी महापालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी शासनस्तरावर पत्रव्यवहार केला.

अखेर पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्याच्या नगरविकास विभागाने वसई विरार शहर महानगर पालिकेच्या नगरचना उपसंचालक पदी मनिष भिष्णूरकर यांची नियुक्ती केली.

दि.20 ऑक्टोबर 2025 रोजी तसे आदेश शासनाच्या नगररचना विभागाचे सहसचिव सुबराव शिंदे यांनी काढले आहे. नवनियुक्त झालेले भिष्णूरकर हे यापूर्वी सोलापूर महापालिकेत कार्यरत होते.

आणि रखडलेली कामे मार्गी लागतील…

ईडीच्या कारवाई नंतर नगररचना विभागातील कामकाज बऱ्यापैकी थंडावले आहे. वसई-विरार शहर महानगरपालिका नगररचना विभागात अधिकारीच उपलब्ध नसल्याने नव्याने मंजुरीसाठी आलेल्या शेकडो फाईल्सवर निर्णय होत नव्हते तर दुसरीकडे महानगरपालिकेत विकास आराखडा मंजुरी, भोगवटा प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी अशी शेकडो कामेही रखडली आहेत.
आता नगररचना विभागात नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याने नागरिकांची रखडलेली कामे मार्गी लागतील असा विश्वास वसईकरांकडून व्यक्त केला जात आहे.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!