IPS Transfer : फडणवीस सरकारचा बदल्यांचा धूम धडाका सुरुच; 21 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे निघाले आदेश : पैकी तब्बल 13 जिल्ह्यांना मिळाले नवे पोलीस अधिक्षक !

 

मुंबई:- आशिष राणे

मागील महिन्यापासून देवेंद्र सरकारचा बदल्यांचा धूम धडाका सुरुच आहे आज ही गृह खात्याने आयपीएस दर्जाचे  21 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले असून यात विशेष म्हणजे  21  पैकी तब्बल 13 जिल्ह्यांना नवीन पोलिस अधीक्षक मिळाले आहेत त्यामुळे कायदा सुव्यवस्था व जिल्ह्याची परिस्थिती पाहता या बदल्या व बढत्या केल्याचं समजते

राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडून मागील आठवड्या पासूनच (भा पो से ) दर्जाचे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडका सुरुच आहे.
यापूर्वी 13 मे रोजी आठ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर 17 मे रोजी तब्बल 27 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या.
आता गृह विभागाने गुरुवारी (22 मे) आणखी 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यानुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांना नवे पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. तसेच उपायुक्त आणि समादेशक पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांचीही नवीन पदस्थापना करण्यात आली आहे.तसे आदेश आज दि 22 मे रोजी गृह विभागाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी काढले आहेत

प्रमुख बदल्या पुढीलप्रमाणे :

राकेश ओला – पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर ➝ पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई
सोमनाथ घार्गे – पोलीस अधीक्षक, रायगड ➝ पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर
आंचल दलाल – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे ➝ पोलीस अधीक्षक, रायगड
महेंद्र पंडित – पोलीस अधीक्षक, कोल्हापूर ➝ पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर
योगेश गुप्ता – पोलीस अधीक्षक, नागरी सुरक्षा, नांदेड ➝ पोलीस अधीक्षक, कोल्हापूर
बच्चन सिंग – पोलीस अधीक्षक, अकोला ➝ समादेशक, रा.रा. पो.बल, गट क्र. 4, नागपूर
अर्चित चांडक – पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर ➝ पोलीस अधीक्षक, अकोला
मंगेश शिंदे – आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई ➝ पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर
राजातिलक रोशन – सहायक पोलीस महासंचालक, मुंबई ➝ पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई
बाळासाहेब पाटील – पोलीस अधीक्षक, पालघर ➝ पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण
यतिन देशमुख – अप्पर पोलीस अधीक्षक, गडचिरोली ➝ पोलीस अधीक्षक, पालघर
सौरभ अग्रवाल – पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग ➝ गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
मोहन दहिकर – पोलीस उप आयुक्त, ठाणे ➝ पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग
विश्व पानसरे – पोलीस अधीक्षक, बुलढाणा ➝ समादेशक, रा.रा.पो.बल गट क्र. 9, अमरावती
निलेश तांबे – गुन्हे अन्वेषण, नागपूर ➝ पोलीस अधीक्षक, बुलढाणा
समीर शेख – पोलीस अधीक्षक, सातारा ➝ पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई
तुषार दोषी – पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे ➝ पोलीस अधीक्षक, सातारा
सोमय मुंडे – पोलीस अधीक्षक, लातूर ➝ पोलीस उप आयुक्त, संभाजीनगर परिमंडळ 1
जयंत मीणा – पोलीस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, पुणे ➝ पोलीस अधीक्षक, लातूर
नितीन बगाटे – उप आयुक्त, संभाजीनगर ➝ पोलीस अधीक्षक, रत्नागिरी
रितू खोकर – अप्पर पोलीस अधीक्षक, सांगली ➝ पोलीस अधीक्षक, धाराशिव

याशिवाय, संजय जाधव यांची बदलीही जाहीर करण्यात आली असून, त्यांच्या पदस्थापनेचा स्वतंत्र आदेश निघणार आहे.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!