वसई :- आशिष राणे
मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात मोठा बदल करण्यात आला असून मीरा रोड येथे दोन दिवसापूर्वी मराठीच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असताना सध्याचे पोलीस आयुक्त मधुकर पांडये यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
बदली नंतर गृह विभागाने त्यांची नियुक्ती अप्पर पोलीस महासंचालक पदावर केली आहे.तर त्यांच्या जागी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक निकेत कौशिक हे मीरा भाईंदर वसई विरार शहराचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश बुधवार दि 9 जुलै 2025 रोजी दुपारी गृह विभागाचे सह सचिव व्यंकटेश माधव भट यांनी काढले .
दरम्यान मीरारोडमध्ये मराठीच्या मुद्द्यावरुन दुकानदाराला झालेल्या मारहाणीवरुन व्यापाऱ्यांनी सुरुवातीला मराठी भाषिकांविरुद्ध मोर्चा काढला होता. त्यानंतर मंगळवारी मराठी भाषिकांकडून मीरा रोडमध्ये मोर्चाची हाक देण्यात आली. या मोर्चात मनसे, उद्धवसेना, मराठी एकीकरण समितीसह विविध मराठी भाषिक संघटना रस्त्यावर उतरणार होत्या. मात्र या मोर्चाला पोलीस आयुक्त कार्यालयाकडून सपशेल परवानगी नाकारण्यात आली.
त्यातच दुसरी घोडचूक म्हणजे राज्यात हिंदी मराठी वादाचा विषयांचं ताजा असतांना किंबहुना दुसरीकडे याच विषयाचं गांभीर्य लक्षात न घेता त्याआधीच मोर्चाला परवानगी नाकारत मराठी कार्यकर्त्यांच्या व मनसेच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या धरपकडीचे आदेश देण्यात आले. त्यामुळे मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. रात्रीपासून या परिसरात पोलिसांनी आंदोलकांच्या विरोधात कारवाई करत अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली होती.
त्यामुळे हा संघर्ष अधिक वाढला.याच्या निषेध म्हणून वसईच्या पूर्व भागाच्या वालीव गावात पूर्ण बंद पाळण्यात आला मात्र तरीही पोलीस प्रशासन मोर्चा न काढू देण्यावर ठाम राहिलं होतं.
परिणामी या सर्व विरोधाला झुगारून मराठी माणसांनी मोठ्या संख्येने मोर्चाला हजेरी लावली आणि मोर्चाला अखेर विकमी संख्येने सुरूवात झाली. दुसरीकडे पोलिसांनी मोर्चाला परवानगी का नाकारली? असा सवाल करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट तक्रार ही केली होती,
एकूणच मीरा भाईंदर मध्ये दोन दिवसापूर्वी निघालेला मराठी माणसांचा मोर्चा अडवला, परवानगी नाकारली, आणि पुन्हा ती दिली हे सर्व प्रकरण चांगलंच आयुक्त पांडये यांना भोवलं खरं तर मुख्यमंत्री देखील या प्रकरणी नाराज व संतप्त झाले आणि त्यानंतर आता त्याचे पडसाद पाहता चक्क पोलीस आयुक्त मधुकर पांडये यांची गृह विभागाकडून उचलबांगडी करण्यात आली आहे
कोण आहेत वरिष्ठ आयपीएस अधिकारी निकेत कौशिक ?

मिरा-भाईंदरचे नवे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी यापूर्वी मुंबईत सहपोलीस आयुक्त (आर्थिक गुन्हे), अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) असे महत्त्वाचे पदभार सांभाळले आहेत. याशिवाय दहशतवाद विरोधी पथकातही त्यांनी काम केले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात त्यांची दोन वेळा नियुक्ती झाली होती. त्याशिवाय मुंबई लोहमार्ग आयुक्तपदाची जबाबदारीही निकेत कौशिक यांनी व्यवस्थित सांभाळली आहे.
विशेष म्हणजे कौशिक यांना इंग्रजी, मराठी, हिंदी भाषे सहित तब्बल आठ विविध भाषा ते बोलतात. मूळचे हरियाणा येथील रहिवासी असलेले कौशिक यांना राष्ट्रपती पदकाने देखील यापूर्वी सन्मानीत करण्यात आले आहे.
![]()
