आ.राजन नाईक यांची सहकार राज्यमंत्र्यांकडे नवीन उपनिबंधक कार्यालयाची मागणी

वसई उपनिबंधक कार्यालयाचे विभाजन ; नालासोपारा – विरार येथे स्वतंत्र उपनिबंधक कार्यालय ;  सहकार राज्यमंत्र्यांची ग्वाही 
वसई :- 
वसई तालुक्याची लोकसंख्या जवळपास ३० लाखाच्या आसपास आहे, त्यानुसार या भागात जवळपास आठ हजार पेक्षा जास्त गृहनिर्माण संस्था, १५ पतपेढ्या, ३ नागरी सहकारी बँका, १९ सेवा संस्था व १ बाजार समिती कार्यरत आहेत.
परंतु वसई तालुक्यात आजमितीस एकमेव सहकारी संस्थाचे, उपनिबंधक कार्यालय असल्यामुळे, नागरिकांना विविध कामांसाठी किंवा तक्रारीचे निवारण करण्यासाठी वसई येथील उपनिबंधक कार्यालयात अनेकदा हेलपाटे मारावे लागतात, यामुळे नागरिकांचा वेळ व पैसे दोन्ही ही खर्च होत आहेत.
त्यामुळे नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी मंगळवार दि. १० जून २०२५ रोजी महाराष्ट्र सरकारचे सहकार राज्यमंत्री  पंकज भोयर यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भातील लेखी निवेदन देत नालासोपारा-विरार येथे वसई व्यतिरिक्त दुसरे स्वतंत्र उपनिबंधक कार्यालयाची मागणी केली आहे.
जेणेकरून नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत मिळेल म्हणून वसई येथील उपनिबंधक कार्यालयाचे विभाजन करून नालासोपारा अथवा विरार येथे एक नवीन उपनिबंधक कार्यालय सुरू करण्यात यावे असे आम नाईक यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे
आ. राजन नाईक यांच्या लेखी निवेदन वजा प्रत्यक्ष भेटीची सहकार राज्यमंत्री यांनी तत्काळ दखल घेत  त्यांनी त्वरित राज्याचे सहकार विभागाचे प्रधान सचिव यांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहे.
त्यामुळे आ. राजन नाईक यांनी सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांचे आभार मानत आशा व्यक्त केली आहे की, वसई तालुक्यातील नागरिकांना होणारी गैरसोय लवकरच दूर होईल.
तर या भेटी दरम्यान आ. राजन नाईक यांच्या सोबत भाजपच्या नवनियुक्त महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील व माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील आदी यावेळी दालनात उपस्थित होते, अशी माहिती माजी जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी माध्यमांना दिली आहे.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!