विरारच्या यशवंत नगरमध्ये पिकलबॉल खेळाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान विकसित : शारीरीक, मानसिक आरोग्यासाठी हा खेळ ठरणार वरदान

“पिकलबॉल हा सर्व वयोगटांसाठी, विशेषतः ज्येष्ठ नागरिकासाठी देखील एक आदर्श खेळ असून या खेळामुळे हृदयाचे आरोग्य, स्नायूंची ताकद, मानसिक तिक्ष्णता आणि सामाजिक बंध यांसारखे अनेक फायदे यामुळे हा खेळ सर्वांसाठी फायदेशीर च नाही तर शारीरिक व मानसिक दृष्टया ही आरोग्यासाठी वरदान ठरेल “

वसई
पिकलबॉल हा एक मजेदार, कमी प्रभावाचा खेळ आहे. जो सर्व वयोगटांसाठी शारीरिक, मानसिक आणि सामाजिक फायदे देतो.अशा या अनोख्या खेळाचे मैदान विरार येथील यशवंत नगरमध्ये नूकतेच विकसित करण्यात आले असून त्याचे उद्घाटन दि १० जून २०२५ रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर राजीव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या उद्घाटन प्रसंगी पिकलबॉल संघटनेचे अध्यक्ष सुधीर वालावलकर, माजी महापालिका आयुक्त कल्याण केळकर, माजी स्थायी समिती सभापती जितूभाई शाह, अजीव पाटील, डॉ. प्रवीण क्षीरसागर, तसेच अमेय क्लासिक क्लबच्या संचालिका ग्रीष्मा पाटील-पोटे आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

या संपूर्ण खेळाविषयी सांगताना उद्घाटक राजीव पाटील यांनी सविस्तर माहिती विषद केली की, पिकलबॉल हा सर्व वयोगटांसाठी, विशेषतः ज्येष्ठ नागरिकासाठी देखील एक आदर्श खेळ आहे. हृदयाचे आरोग्य, स्नायूंची ताकद, मानसिक तीक्ष्णता आणि सामाजिक बंध यांसारखे फायदे यामुळे हा खेळ सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

दरम्यान पिकलबॉल खेळताना जलद हालचाली आणि रॅलीमुळे हृदयाची गती वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो तर हा खेळ नियमित खेळल्याने रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा धोका ही कमी होतो.

एका आठवड्यातून ३ दिवस १ तास खेळणाऱ्या वृद्धांनी हृदयाचे आरोग्य सुधारते. पिकलबॉल खेळताना पाय, हात आणि पोटाचे स्नायू कार्यरत होतात. यामुळे स्नायूंची ताकद आणि लवचिकता वाढते,

विशेषतः वृद्धांसाठी, ज्यांना स्नायूंची कमतरता जाणवते. खेळातील जलद हालचाली संतुलन आणि समन्वय सुधारतात ज्यामुळे पडण्याचा धोका कमी होतो.

एकंदरीत टेनिसच्या तुलनेत पिकलबॉलचे कोर्ट लहान आहे आणि बॉल हलका आहे, ज्यामुळे सांध्यांवर कमी ताण येतो. सांधेदुखी किंवा संधिवात असलेल्या व्यक्तींसाठी हा खेळ आदर्श आहे.
तर पिकलबॉल खेळताना जलद निर्णय घ्यावे लागतात आणि हात-डोळ्यांचा समन्वय आवश्यक असतो, ज्यामुळे मेंदू तीक्ष्ण राहतो. यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि समस्या सोडवण्याची क्षमता सुधारते. वृद्धांसाठी हा खेळ डिमेंशियाचा धोका कमी करू शकतो.पिकलबॉल हा सामाजिक खेळ आहे, विशेषतः डबल्स खेळताना. यामुळे नवीन मित्र बनतात आणि एकटेपणा कमी होतो, जे वृद्धांसाठी महत्त्वाचे आहे.

खेळ ही सोपा व साधा आणि सर्व आर्थिक स्तरांतील लोकं खेळू शकतात !

पिकलबॉल खेळताना कॅलरी बर्न होतात (३० मिनिटांत सुमारे ४०% जास्त कॅलरी जळतात, चालण्याच्या तुलनेत). यामुळे वजन नियंत्रित राहते आणि एकूण फिटनेस सुधारतो. पिकलबॉलचे नियम सोपे आहेत आणि उपकरणे (पॅडल आणि बॉल) स्वस्त आहेत. (भारतात पॅडल ३०००–४००० रुपये आणि बॉल १००–२०० रुपये).

यामुळे सर्व आर्थिक स्तरांतील लोकं खेळू शकतात, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सुधीर वालावलकर यांनी दिली. यशवंत नगरमधील पिकलबॉल खेळाचे मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवण्यात आले असल्याचेही शेवटी वालावलकर यांनी यावेळी उपस्थिताना सांगितले.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!