खेलो मास्टर्स गेम्स असो.पालघर जिल्हा आयोजित जलतरण व बुद्धीबळ स्पर्धा विरार येथे संपन्न !

विरार येथे संपन्न झालेल्या या जलतरण स्पर्ध्येत ६ ते ७० वयोगटातील १७५ स्पर्धक सहभागी झाले होते, त्यात विशेष म्हणजे २ दिव्यांगांचाही समावेश होता तर बुद्धिबळ स्पर्ध्येत ६ ते ५० वयोगटात ५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता ,अर्थात हे खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धाचं यश आहे.

वसई :-
खेलो मास्टर्स गेम्स असो.पालघर जिल्हा आयोजित जलतरण व बुद्धीबळ स्पर्धा नुकत्याच विरारच्या अमेय क्लासिक क्लब येथे संपन्न झाल्या.
या जलतरण स्पर्ध्येत ६ ते ७० वयोगटातील १७५ स्पर्धक सहभागी झाले होते त्यात २ दिव्यांगांचाही समावेश होता तर बुद्धिबळ स्पर्ध्येत ६ ते ५० वयोगटात ५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.


या दोन्ही ही स्पर्धाचे खेलो मास्टर्स गेम्स पालघर जिल्हा अध्यक्ष तथा माजी महापौर राजीव पाटील, हेमंत बंधु,जितुभाई शहा , अजिव पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी असोशिएशनचे कमिटि मेंबर्स व सदस्य ह्यांनी एप्रिल महिन्यापासुनच स्पर्ध्येच्या तयारीला सुरुवात केली होती.

या जलतरण व बुद्धीबळ स्पर्धेसाठी मोलाचे मार्गदर्शन व सहभाग नोंदवला ते सर्वश्री केवल चौधरी, चंद्रकांत चाळके, शलाका मुंडक, मुळीक सर, दिपक आडे,गजानन सोनी यांनी या सर्व स्पर्धा पूर्ण करण्यासाठी विशेष मेहनत घेतली

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!