लोक अदालतीतून ०८ हजार वीज ग्राहकांच्या प्रलंबित‍ प्रकरणांचा निपटारा

महावितरण कंपंनीकडून थकीत रकमेतून तडजोड यशस्वी उपक्रम…

महावितरणच्या उपलब्ध सवलतीचा लाभ घेत संबंधित ग्राहकांनी ११ कोटी ९४ लाख रुपयांचा भरणा केला. वसई मंडळात ०४ हजार ३६९ प्रकरणांच्या निपटाऱ्यातून ०२ कोटी ११ लाख रुपयांची वसुली होऊ शकली. तर पालघर मंडळ  कार्यालयांतर्गत ०९ लाख रुपयांचा भरणा करणाऱ्या २२७ ग्राहकांची प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली.

कल्याण: दि. १ डिसेंबर २०२५

जिल्हा पातळीवर आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीतून कल्याण परिमंडळातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित तसेच वीजचोरीची दाखलपूर्व व प्रलंबित अशी ०८ हजार प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली. महावितरणच्या उपलब्ध सवलतीचा लाभ घेत संबंधित ग्राहकांनी ११ कोटी ९४ लाख रुपयांचा भरणा केला.

ADT

कल्याण परिमंडळातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या तसेच वीज चोरीची दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडवण्यासाठी एकुण ०२ लाख ३५ हजार वीज ग्राहकांना नोटीस पाठविण्यात आली होती. त्यापैकी सुमारे ०८ हजार ग्राहक उपस्थित होते.

महावितरण आणि वीज ग्राहक यांच्यात तडजोड होऊन ११.९४ कोटी रुपये इतका भरणा करण्यात आला. यात कल्याण मंडळ – एक मध्ये २८ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन १९ लाख रुपयांची वसुली झाली.

कल्याण मंडळ – दोन मध्ये २३८५ प्रकरणे सर्वाधिक ०८ कोटी ०६ लाख रुपयांच्या वसुलीने सामोपचाराने मिटवण्यात आली.

 Adv

वसई मंडळात ०४ हजार ३६९ प्रकरणांच्या निपटाऱ्यातून ०२ कोटी ११ लाख रुपयांची वसुली होऊ शकली. तर पालघर मंडळ कार्यालयांतर्गत ०९ लाख रुपयांचा भरणा करणाऱ्या २२७ ग्राहकांची प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली.

भांडुप परिमंडळातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या तसेच वीज चोरीची दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडवण्यासाठी एकुण १४ हजार ९७ वीज ग्राहकांना नोटीस पाठविण्यात आली होती.

महावितरण व वीज ग्राहक यांच्यात तडजोड होऊन ०१ कोटी ४० लाख रुपये इतका भरणा करण्यात आला असून यात ठाणे मंडळ मध्ये ६५ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ४.६२ लाख  रुपयांची वसुली झाली.

पेण मंडळात ०९ प्रकरणात तडजोड होऊन ६.६८ लाख रुपयांची वसुली झाली. तर, वाशी मंडळात ०१ हजार २५२ प्रकरणांच्या निपटाऱ्यातून सर्वाधिक ०१ कोटी २९ लाख रुपयांची वसुली झाली आहे.

ठाणे  आणि पालघर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने तसेच कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणि मिश्रा व भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता  संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, महावितरणच्या विधी विभागाने हीं लोक अदालत यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी कोकण प्रादेशिक कार्यालय, कल्याण यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटली आहें.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!