वसई-विरार शहराच्या सुनियोजित विकासांत वास्तुविशारद ( Architect ),अभियंते (engineer’s) यांची अभ्यासू भूमिका अत्यंत महत्त्वाची — महापौर अजीव पाटील
विरारच्या आई जीवदानी गडावर उभारली १५०० फूट उंचीची अद्भुत ‘ग्लास गॅलरी’ ; भक्तांना दिसणार सफाळे ते उत्तन परिसरातील अरबी समुद्राचं विहंगम दृश्य एकाच दृष्टिक्षेपात…
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.(भा.प्रा.से ) यांची नियुक्ती : पुणे शहराचे शिलेदार वसई विरार शहरात..
वसई पोलिसांनी काढलेला जमावबंदीचा आदेश मोडीत काढत वसईकर नागरिकांचा डीसीपी -झोन २ कार्यालयावर धडक मोर्चा
विरार मध्ये “शारदा हाईट्स” इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग ; 9 जणांची केली सुखरूप सुटका

लोक अदालतीतून वीज ग्राहकांची १ हजार १४९ प्रकरणे निकाली !

कल्याण/वसई/पालघर: दि. १३ मे २०२५

कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेले ग्राहक तसेच वीजबिलाबाबत वाद आणि वीज चोरीच्या दाखलपूर्व व प्रलंबित अशा १ हजार १४९ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यात आला. तालुका न्यायालय स्तरावर १० मे रोजी आयोजित लोक अदालतीत या ग्राहकांनी सहभाग नोंदवून ३ कोटी ३९ लाखांचा भरणा करून आपापली प्रकरणे सामोपचाराने मिटवली.

कल्याण मंडल एक अंतर्गत डोंबिवली, कल्याण पश्चिम व पूर्व विभागात १९६ ग्राहकांनी ७८ लाख ३६ हजार रुपयांचा भरणा करून आपल्या प्रकरणांचा निपटारा केला. तर कल्याण मंडल दोन अंतर्गत उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर, मुरबाड भागातील १ कोटी ८४ लाख रुपयांचा भरणा करणाऱ्या ४२७ ग्राहकांची प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली. वसई मंडलांतर्गत वसई, विरार, वाडा, सफाळे येथील ४६० ग्राहकांनी लोक अदालतीत सहभागी होत ७३ लाख ३७ हजार रुपयांचा भरणा केला.

तर पालघर मंडल कार्यालयांतर्गत पालघर, बोईसर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा येथील ६६ ग्राहकांनी ३ लाख ३३ हजार रुपये भरून आपली प्रकरणे निकाली काढली.

दरम्यान ही लोक अदालत यशस्वी होण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणासह मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा, अधीक्षक अभियंते कार्यकारी व उपविभागीय अभियंते, विधी विभागाने विशेष प्रयत्न केल्याची माहिती महावितरण कं.च्या कल्याण परिमंडळ विभागाचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!