महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम निरंतर सुरू आहे. कारवाईनंतर वीजचोरीच्या देयकाचा मुदतीत भरणा न करणाऱ्या १७ जणांविरूद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींकडील ५ लाख २९ हजार ८४० रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे.
महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील कोन शाखा कार्यालयांतर्गत १७ जणांकडे वीज चोऱ्या आढळून आल्या. एस ए डेव्हलर्पस-जमील शेख, जीमल शेख (रा.फालके कॉलनी),सलीम शेख, मिलींद बाबूलाल नरावडे शबाना शेख, अनिल पाटील, विजय म्हात्रे, (रा.सुनिल म्हात्रे कॉम्पलेक्स), आयशा शेख (रा.गॅलक कॉम्पलेक्स), राममुर्ती चिकवार,सलीम बागवान, खलील शेख, इरफान बागवान, (रा.मरियम ड्रिम), शाबीर खान(रा.कुलसुम मुजील), गुरुकृपा इंटरप्रायजेस (रा.गुरुकृपाबिल्डींग), रविंद्र वाघ (रा.शिवशक्ती आपार्टमेंट), कांताबाई पाटील (रा. जुनी ग्रामपंचायत रोड), सुनंदा पाटील (रा.पिंपळघर) या सर्वांनी मिळून ५ लाख २९ हजार ८४० रुपयांची २६ हजार ७२७ युनिटची वीजचोरी केली आहे.
टिटवाळा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गणेश पवार, सहायक अभियंता धनंजय पाटील, तंत्रज्ञ अनिल सोनकुसरे व अजय कुमरे आणि त्यांच्या टिमने ही कामगिरी केली असल्याची माहिती कल्याण विभागाचे जनसंपर्क अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
![]()
