वसई महसूल खातच…. अधिकारी, कर्मचारी व खाजगी मदतनीसांमुळे होतंय बदनाम ?

हाच तो अप्पर तहसीलदार विनोद धोत्रे यांचा खासम खास लाचखोर मदतनीस अनिल चौबल ☝️यांस ACB च्या पथकाने रंगेहात पकडलं ✅
वसई तहसील कार्यालयाचा इतिहास पाहता, भ्रष्टाचारामुळे हे कार्यालय वारंवार चर्चेत राहिले आहे. मागील महिन्यातच वसईतील एका पत्रकार महाशयाने व खाजगी इसमाने वसई तहसीलदार अंतर्गत सेतू कार्यालयाच्या ठेकेदारांकडे 5 लाख रुपयांची खंडणी मागितली होती आणि त्या दोघांना रोख रक्कम घेताना खंडणी विरोधी पथकाने रंगेहात पकडलं होतं, यापूर्वीही अनेकदा एसीबीने या कार्यालयावर छापे टाकले आहेत. महसूल विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांवर आणि खाजगी मदतनीसावर लाचखोरीचे आरोप होण्याचे प्रमाण वाढले असून, वेळोवेळी झालेल्या कारवाईनंतरही भ्रष्टाचाराला अजूनही आळा बसलेला नाही. या सततच्या घटनांमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या ताज्या कारवाईनंतर फरार असलेल्या अपर तहसीलदार धोत्रे यांचा नेमका या प्रकरणात सहभाग किती आहे, याचा तपास देखील आता वसई पोलीस व एसीबी च पथक करत आहेत.
वसई :- आशिष राणे
भ्रष्टाचाराचे आगर असलेलं वसई तहसीलदार व त्यांचा अकृषिक विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला असून यांत वसईचे अप्पर तहसीलदार (अकृषीक ) विनोद बाळकृष्ण धोत्रे यांच्या कार्यालयातील खाजगी इसम अनिल प्रभाकर चौबल यांस अनधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी पीडित तक्रारदारांकडून तब्बल रु. 7 लाख रुपयांची लाच स्वीकारतानां ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सापळा रचून रंगेहात पकडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.
विशेष म्हणजे या प्रकरणात दस्तूरखुद्द स्वतः अप्पर तहसीलदार विनोद धोत्रे यांचा थेट सहभाग असल्याचेही आता समोर आले असून आपल्यावर कारवाई होणार या भीतीने अप्पर तहसीलदार धोत्रे चक्क फरार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तक्रारदार यांची वसई पूर्वेकडील गाव मौजे.देपिवली येथे जमीन आहे या जागेवरील अनधिकृत बांधकाम प्रशासनाकडून पाडले जाऊ नये आणि ही जागा अकृषिक करून द्यावी यासाठी सुरुवातीला तब्बल 40 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती, तर अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी झाली होती मात्र अखेर तडजोडी नंतर 7 लाख रुपये देण्याचे निश्चित झाले.
दरम्यान पीडित तक्रारदाराने या मागणीबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली असता तक्रारीची शहानिशा केल्यानंतरच एसीबीच्या पथकाने वसईत मंगळवारी सापळा रचला आणि 7 लाख रुपयांची रोख रक्कम स्वीकारताना अप्पर तहसीलदार कार्यालयाशी संबंधित खाजगी इसम अनिल चौबल याला एसीबीच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले
काय हीं नामुष्की : स्वतः वसईचे अपर तहसीलदार विनोद धोत्रे फरार..??

हेच ते ☝️वसई अप्पर तहसीलदार (अकृषिक ) विनोद बाळकृष्ण धोत्रे…वरील छायाचित्र त्यांच्याकडे ज्यावेळी वसई तहसीलदार पदाचा पदभार होता त्यावेळेस चे आहे ) ✅
या लाचखोरीच्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून अप्पर तहसीलदार विनोद बाळकृष्ण धोत्रे याचे नाव निष्पन्न झालं असून लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करताच अप्पर तहसीलदार विनोद धोत्रे त्यांच्या कार्यालयातून फरार झाले आहेत,
सापळा कारवाई वेळी अप्पर तहसीलदार धोत्रे वसई प्रांताधिकारी कार्यालयात : बड्या अधिकाऱ्यांकडून मध्यस्थीचे प्रयत्न ?

मात्र मंगळवारी ज्यावेळी एसीबी ने सापळा रचला होता त्यावेळेस अप्पर तहसीलदार विनोद धोत्रे हे वसईचे प्रांताधिकारी शेखर घाडगे यांच्या नालासोपारा येथील कार्यालयात उपस्थित होते.त्याठिकाणी या कारवाईची कुणकुण लागल्यावर प्रांत कार्यालयाच्या बड्या अधिकाऱ्यांकडून हीं धोत्रे यांना वाचवण्यासाठी मध्यस्थीचे प्रयत्न चालवले गेल्याची चर्चा ऐकावयास मिळाली मात्र नंतर काय झाले हे कळू शकलं नाही.
सध्या वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून वसई पोलीस व एसीबीचे पथक त्यांचा कसून शोध घेत आहेत
ही कारवाई ठाणे लाचलुचप प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे आणि अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रूपाली पोळ व त्यांच्या पथकाने केली आहे.
ACB ची प्रेसनोट ✅

✅⚠️महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal वर संपर्क साधा !
Mymarathi7.com
![]()
