विरार :- संदीप पंडित
वसई तालुका हा पुरातन संस्कृतीचा आणि धार्मिक संस्कृतीचा भाग राहिला आहे. याठिकाणी जशा भगवान परशुरामाच्या पाऊलखुणा आढळतात तशाच भगवान गौतम बुध्दाच्याही पाऊलखुणा आढळतात. पुरातन काळी सोपारा हे शहर अपरांतांची राजधानी होतो. याच ठिकाणातील नाग राजांनी व लोकांनी भगवान गौतम बुध्दांच्या उपदेशावरून या शहराचा विकास घडवून आणला होता. बुध्द, धम्म व संघ हे बौध्द धम्मांतील तीन रत्ने होत. ही तीन रत्नॅच मानंवात समानता आणू शकतील. सोपारा हे सुध्दा या तीन रत्नांशी बौध्द संस्कृतीमुळे कित्येक वर्षापासून निगडीत आहे.श्रावस्तीला भगवान बुध्दाचे शिष्यत्व पत्करून पुर्णाने सोपारा येथे पहिला बुध्द विहार बांधला कालातरांने हा बुध्द विहार आज विकासा पासून कोसोदूर असल्याचे निदर्शनास येत आहे.
प्राचीन सोपारा हे इ. स. पूर्वीच्या १६ व्या शतकापर्यंत अपरांतातील किवा कोकणातील एक सांस्कृतिक केंद्र व समृध्द असे शहर होते. पुराणातील मतानुसार प्राचीन भारतात अस्तित्वात असलेला या प्रदेशापैकी अपरांत हा एक प्रदेश होता. हल्लीचे सोपारा त्याकाळी सोपारक (शूर्पारक) या नावाने ओळखले जात होते व हेच बंदर अपरांताची राजधानी होते. उत्तर गुजराथ, काठेवाड, कच्छ आणि सिंध व महाराष्ट्र यांचा समावेश अपरांतामध्येख त्याकाळी केला जात होता.त्याकाळी राजधानी म्हणून गणले गेलेले हे शहर पश्चिमेकडे समुद्राने पुर्वेकडे सहयाद्रीने आणि दखखनच्या काही भांगानी वेढले गेलेले होते. सम्राट अशोकाच्या काळी इतिहासात हा अपरांत देश महाराष्ट्र या नावाने उदयास आला असा महत्वाचा उल्लेख महावंसो त सापडतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी थॉटस ऑन लिग्वीस्टीक स्टेटस या पुस्तकातही हेच मत प्रगट केले आहे.असे हे बोद्ध धर्मियांचे स्थान असलेला बोद्धस्तूप आज विकासाच्या प्रतीक्षेत आहे. या जागेचा विकास महापालिकेकडून करण्यासाठी महापालिकेने १० वर्षांपूर्वी प्रयत्न केले होते. परंतु पुरातत्व विभागाने परवानगी न दिल्याने हे काम अजूनही बाकी आहे. त्यावेळी तत्कालीन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी बोद्धस्तूपांच्या विकासासाठी पालिका लागेल तो निधी देईल असे सांगितले होते. तर माजी आमदार क्षितिज ठाकूर,तत्कालीन महापौर रुपेश जाधव,माजी महापौर नारायण मानकर आदींच्या शिष्टमंडळाने दिल्लीत पुरातत्वखात्याच्या अधिकाऱ्यां चीही भेट घेतली होती. त्यानंतर माजी नगरसेवक नरेश जाधव व हरीश गायकवाड यांनी हि पुरातत्व विभागाची भेट घेऊन या स्तूपाच्या विकासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. परंतु त्यालाही अजून यश आलेले नाही. त्यामुळे बोद्ध धर्मियांचे श्रद्धास्थान असलेला हा स्तूप आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. बौध्द धर्माचे प्रवर्तक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सोपा-याला अनेकवेळा भेटी दिल्याचा उल्लेख हि सापडतो. त्याच प्रमाणे आंतरराष्ट्रीय संख्य केंद्राचे सभासद मुंबईचे पहिले बौध्द धर्मिय महापौर आयु. पी. टी. बोराळे, सोपा-यास प्रथमच भेट देणारे सिलोनी बौध्दापैकी नोव्हेल पेरिस यांनी २३ मार्च १९६० रोजी सोपा-याची पहिलीच आंतरराष्ट्रीय यात्रा केली. याच यात्रेमध्ये पहिला आंतराष्ट्रीय दिप लावला गेला. यानंतर अनेक लोकांनी सोपा-याची यात्रा केली.असे आढळून येते.
============================== =============
भगवान गौतम बुध्दाची सोपा-याला भेट
श्रावस्तीला भगवान बुध्दाचे शिष्यत्व पत्करून पूर्णाने सोपारा येथे पहिला बौध्द विहार भावाच्या व काही व्यापा-यांच्या मदतीने बांधला. या विहाराचे पवित्र उद्घाटन करण्यासाठी भगवान बुध्दांना पाचारण (आमंत्रित) करण्यात आले होते. सोपा-यातील स्तूपाला स्थानिक लोक बुरूड राजाचा किल्ला या नावाने ओळखत असत. हा स्तूप भगवान बुध्दाच्या भिक्षा पात्राच्या अवशेषांची चिरंतन स्मृती रहावी म्हणून बांधण्यात आला होता. इ.स. पूर्वी २४६ च्या सुमारास सम्राट अशोकाने बौध्द धर्माच्या सर्व भारतभर प्रसार करण्याचे ठरविले त्यासाठी त्याने योन किंवा यवन नावाच्या धर्मरक्षिताला अपरांत किंवा कोकण म्हणजेच सोपारा येथे पाठविले. धर्मरक्षिताने सोपारा हे शहर आपल्या धर्मप्रसाराचे मुख्य केंद्र बनविले. या ठिकाणाहूनच संबध पश्चिम भारतात त्याने बौध्द धर्माचा प्रसार केला.
============================== ======
सम्राट अशोकाचा पुत्र राजकुमार महेंद्र हा चार भिक्खु, एक सामनेर व एक उपासक यांच्यासह श्रीलंकेमध्ये सिंहली लोकांचे मत परिवर्तन करण्यासाठी आला. महेंद्राने भिक्खुणी साठी विहांराची स्थापना करण्याच्या उददेशाने भारताकडे दूत पाठवून श्रीलंकेला भेट देण्याविषयी आपली बहिण संघमित्रा थेरी हिस पाचारण केले. निमंत्रणाप्रमाणे संघमित्रा असंख्य थोर लोकासह बोधिगयेहून महाबोधि वृक्षांची फांदी घेवून सोपारा बंदरामार्गेच सिलोनला गेली असल्याचे आढळते.
============================== =======================
सम्राट अशोकाने आपल्या इच्छा व आज्ञा खडकावर कोरलेल्या आहेत. त्याचा आकडा एकदर १४ असावा. १८८२ साली पंडित भगवानलाल इंद्रजी याने सम्राट अशोकाच्या ८ व्या शिलालेखासंबंधी मत प्रतिपादन करतांना असे म्हणतात की अशोकाचे १४ शिलालेख किंवा आज्ञा हया सोपा-याच्या आसपासच कोरलेल्या असाव्यात. ८ वा शिलालेख सोपारा गावच्या पूर्वेकडील भातेला या तलावाजवळ पंडित भगवान भगवान लाल इंद्रजी याना मिळाला. ९ वा शिलालेख मुंबईच्या एसियाटिक सोसायटीचे ग्रंथपाल एन. ए. गोरे यांनी सोपारा जवळील भुईगाव या खेडेगावी जानेवारी १९५६ साली शोधून काढला. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम (मुंबई) येथे ते ठेवण्यात आलेले आहेत.
![]()
