वसई-विरार शहराच्या सुनियोजित विकासांत वास्तुविशारद ( Architect ),अभियंते (engineer’s) यांची अभ्यासू भूमिका अत्यंत महत्त्वाची — महापौर अजीव पाटील
विरारच्या आई जीवदानी गडावर उभारली १५०० फूट उंचीची अद्भुत ‘ग्लास गॅलरी’ ; भक्तांना दिसणार सफाळे ते उत्तन परिसरातील अरबी समुद्राचं विहंगम दृश्य एकाच दृष्टिक्षेपात…
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.(भा.प्रा.से ) यांची नियुक्ती : पुणे शहराचे शिलेदार वसई विरार शहरात..
वसई पोलिसांनी काढलेला जमावबंदीचा आदेश मोडीत काढत वसईकर नागरिकांचा डीसीपी -झोन २ कार्यालयावर धडक मोर्चा
विरार मध्ये “शारदा हाईट्स” इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग ; 9 जणांची केली सुखरूप सुटका

नवरात्रोत्सवात विरार येथील जीवदानी मंदिरावर तिसऱ्या डोळ्याची राहणार करडी नजर…!

सोमवार दि. २२ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवात विरार येथील जीवदानी मंदिरावर सुरक्षेच्या दृष्टीने CCTV अर्थात तिसऱ्या डोळ्याची करडी नजर राहणार असून या संदर्भात मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे
अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी मंदिर व अन्य भागात भाविकांच्या मोठ्या गर्दी होण्याच्या पार्श्वभूमीवर नुकताच बंदोबस्ताचा आढावा घेतला आहे,….!
विरार :- विशेष बातमीदार
पालघर जिल्ह्यातील विरार स्थित भाविकांच्या श्रद्धेचे स्थान म्हणून जीवदानी मंदिर ओळखले जाते, येत्या सोमवर दि.२२ सप्टेंबर २०२५ रोजी पासून शारदीय नवरात्रोत्सव सुरु होत असून येथील जीवधन गडावर मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे..
या मंदिरावर १६० सिसिटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून तिसऱ्या डोळ्याची सतत नजर असणार आहे.
त्याचबरोबर कोणताही घातपात  होऊ नये म्हणून शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त देखील याठिकाणी तैनात असणार आहे.
याबाबत मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी जीवदानी मंदिर संदर्भात सुरक्षा म्हणून बंदोबस्ता बाबतचा आढावा घेतला.
त्याच बरोबर नवरात्रोत्सवात गडावर भावीकांची मोठी गर्दी होणार असल्याचीही  माहिती जीवदानी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर आणि उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांनी दिली आहे.
दरम्यान भाविकांची गर्दी लक्षात घेऊन यावेळी वाहतुकीच्या मार्गात हि बदल करण्यात येणार आहे असेही पोलीस व मंदिर प्रशासना तर्फे सांगण्यात आले आहे.
विरारच्या जीवदानी देवीच्या दर्शनासाठी राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून भाविक गर्दी करत असतात. यात गुजरात,ठाणे पालघर, भाईंदर,मुंबई  राजस्थान, कोकण येथून मोठ्या प्रमाणत भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात..
ATS कडून हीं घेतला गेला सुरक्षेचा आढावा…
या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने जीवदानी मंदिर सुरक्षेचा आढावा ATS ने सुद्धा घेतला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी सुरक्षा कवच हि उभारण्यात आले आहे. नऊ दिवस मंदिरात होणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांच्या जोडीला  विवा महाविद्यालयाचे २०० NCC विद्यार्थी देखील हजर असणार आहेत. तर मंदिर ट्रस्टचे एकूण १०० गार्ड त्यांना मदत करणार आहेत. त्याचबरोबर मंदिरात आणि मंदिराच्या खाली हत्यार बंद पोलिसांची तुकडी तैनात असणार आहे.
आणि भाविकासाठी फेनिक्युलरची चाचणी हि झाली यशस्वी…!
जीवदानी मंदिरात जण्यासाठी असलेल्या फेनिक्युलरची  चाचणी हि यशस्वी झाली आहे. नवरात्राचे ९ दिवस येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गडावर ५० हजाराच्या आसपास भाविकांची गर्दी होणार आहे. नवरात्रोत्सवात येणाऱ्या रविवारी हाच गर्दीचा आकडा लाखां पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे प्रदीप तेंडोलकर आणि पंकज ठाकूर यांनी सांगितले.
=====================================
आई जीवदानी देवींची विधिवत होणार पूजा महाभिषेक…!
सोमवार दि.२२ तारखेला सकाळी श्री जीवदानी मातेला महाभिषेक ,वस्त्रालंकार,शृंगार, व नवचंडी अशा विविध धार्मिक ग्रंथाच वाचन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दर दिवशी वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम हीं आयोजित करण्यात येणार आहेत.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!