वसई-विरार शहराच्या सुनियोजित विकासांत वास्तुविशारद ( Architect ),अभियंते (engineer’s) यांची अभ्यासू भूमिका अत्यंत महत्त्वाची — महापौर अजीव पाटील
विरारच्या आई जीवदानी गडावर उभारली १५०० फूट उंचीची अद्भुत ‘ग्लास गॅलरी’ ; भक्तांना दिसणार सफाळे ते उत्तन परिसरातील अरबी समुद्राचं विहंगम दृश्य एकाच दृष्टिक्षेपात…
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.(भा.प्रा.से ) यांची नियुक्ती : पुणे शहराचे शिलेदार वसई विरार शहरात..
वसई पोलिसांनी काढलेला जमावबंदीचा आदेश मोडीत काढत वसईकर नागरिकांचा डीसीपी -झोन २ कार्यालयावर धडक मोर्चा
विरार मध्ये “शारदा हाईट्स” इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग ; 9 जणांची केली सुखरूप सुटका

वसईच्या सर्वांगीण विकासासाठी वसईच्या संघर्षकन्या आमदार स्नेहा ताई दुबे-पंडित यांची ठोस पाऊले : रस्ते, रेल्वे ओव्हरब्रिज, उड्डाणंपूल लवकरच विकसित होणार..!

वसई विधानसभा क्षेत्रातील विविध रस्ते व त्यांचे काँक्रिटीकरण, शहरातील वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून उड्डाणंपुल, रेल्वे ओव्हरब्रिज आदी सर्व कामे एकत्रित करून शासनाकडे पाठविण्या संदर्भात नुकतेच नियोजन करण्यात आले असून या एकूणच बैठकीमुळे वसई शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला मात्र नवी गती मिळाल्याने यापुढील कालावधीत वसईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वसई :- आशिष राणे
वसई तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी वसई विधानसभा क्षेत्राच्या संघर्षकन्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनीं शासन स्तरावर बैठकीच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण महत्वाची अशी ठोस पाऊले उचलली आहेत
या संदर्भात गुरुवार दि. 25 सप्टेंबर 2025 रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात एमएमआरडीए (MMRDA) कडे प्रस्तावित केलेल्या विविध कामांसंदर्भात एक महत्वाची बैठक घेण्यात आली.


या बैठकीत प्रामुख्याने वसईतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याबाबत विशेष चर्चा करण्यात आली यामध्ये उदाहरणं म्हणून,बाफाने फाटा ते उमेळा फाटा, वसई फाटा ते वसई गाव,तसेच सातिवली फाटा ते रेंज ऑफिस आणि तिवरी फाटा ते वामन ढाबा पर्यंतच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याबाबत निर्णय घेण्यात आले.

गोखीवरे, एवरशाईन आणि माणिकपूर नाका उड्डाणपुलांचे प्रस्ताव आठवडाभरातचं !
दरम्यान या कामांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर मात करून कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी सकारात्मक चर्चा होऊन, येत्या आठवड्यात प्रस्ताव अंतिम करून एमएमआरडीए कडे पाठविण्याचा कृती कार्यक्रम देखील आखण्यात आला.तसेच, गोखिवरे रेंज ऑफिस वरील उड्डाणपूल, एव्हरशाईन ते वसंत नगरी उड्डाणपूल, तसेच माणिकपूर नाक्यावरील उड्डाणपूल यांच्या डिझाईन व अलाइनमेंट संदर्भातही सविस्तर चर्चा झाली. या तिन्ही उड्डाणपुलांचे प्रस्ताव देखील या आठवड्याभरात तयार करण्यात येणार आहेत.
याशिवाय, 4 ROB रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामांसंदर्भात चर्चा झाली, ज्यामध्ये वसई विधानसभेतील उमेळमान-नायगाव येथील आरो ब्रिजचाही समावेश आहे.


ही सर्व कामे एकत्रित करून शासनाकडे पाठविण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले असून या बैठकीमुळे वसई शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला मात्र नवी गती मिळाली असून वसईकरांना यापुढील कालावधीत मोठा दिलासा मिळणार आहे.


या बैठकीला वसईच्या आम.आमदार स्नेहा ताई दुबे पंडित स्वतः जातीने उपस्थित होत्या तर त्यांच्या समवेत एमएमआरडीए चे मुख्य अभियंता प्रकाश भामरे,एमएमआरडीए चे कार्यकारी अभियंता शेवाळे, वसई विरार शहर महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रदीप पाचंगे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजय यादव, कुलकर्णी आदी अभियंते व अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!