वसई-विरार शहराच्या सुनियोजित विकासांत वास्तुविशारद ( Architect ),अभियंते (engineer’s) यांची अभ्यासू भूमिका अत्यंत महत्त्वाची — महापौर अजीव पाटील
विरारच्या आई जीवदानी गडावर उभारली १५०० फूट उंचीची अद्भुत ‘ग्लास गॅलरी’ ; भक्तांना दिसणार सफाळे ते उत्तन परिसरातील अरबी समुद्राचं विहंगम दृश्य एकाच दृष्टिक्षेपात…
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.(भा.प्रा.से ) यांची नियुक्ती : पुणे शहराचे शिलेदार वसई विरार शहरात..
वसई पोलिसांनी काढलेला जमावबंदीचा आदेश मोडीत काढत वसईकर नागरिकांचा डीसीपी -झोन २ कार्यालयावर धडक मोर्चा
विरार मध्ये “शारदा हाईट्स” इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग ; 9 जणांची केली सुखरूप सुटका

वसई तहसीलदार पदी दीपक गायकवाड यांची वर्णी : राज्य निवडणूक प्रक्रिया तथा आचारसंहिता संपताच स्वीकारतील पदभार

 

तत्कालीन रावसाहेब अविनाश कोष्टींची ” री “✅ नाही ओढली म्हणजे मिळवलं…

वसई तहसीलदार व प्रांताधिकारी कार्यालयाचा अनुभव.. पाठीशी पण…व्यवसायभिमुख कामांना प्राधान्य नं देता समाज व लोकांभिमुख कामाची मोठी आशा…!

Adv

नवे तहसीलदार दीपक गायकवाड हे यापूर्वी वसई तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार पदावर कार्यरत होते तर त्यानंतर ते काही काळ त्यांनी वसई उपविभागीय कार्यालयात हीं नायब तहसीलदार म्हणून कामकाज केलेले आहे.
त्यामुळे वसई तालुका महसूल यंत्रणे संबंधित त्यांना बऱ्यापैकी माहिती आहें अर्थात त्यामुळे नव्या तहसीलदारांना फार काही अडचणीचा सामना करावा लागणार नाही हे जरी सत्य असले तरी नव्या तहसीलदारांनी व्यवसायभिमुख कामांना प्राधान्य नं देता समाज हित जपत लोकांभिमुख कामाना प्राधान्य द्यावे अशी वसईकरांची इच्छा आहें यांत ते किती यशस्वी होतात ते येणारा काळचं ठरवेल.

वसई :- आशिष राणे✍️

महाराष्ट्र सरकारच्या महसूल आणि वन विभागाने प्रशासकीय कारणास्तव आणि सार्वजनिक सेवेच्या हितासाठी तहसीलदार संवर्गातील अधिकारी दीपक गायकवाड यांच्या बदलीचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या सह सचिव मनीषा जायभाये यांनी सोमवार दि.२२ डिसेंबर २०२५ रोजी जारी केले आहेत.

मात्र राज्यातील सर्वच महानगरपालिका यांच्या सार्वत्रिक निवडणुका-२०२५ जाहीर होऊन आचारसंहिता सुरु आहें.त्यातच दि. १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया आणि दि. १६ जानेवारी रोजी मतमोजणी असल्याने सध्या सर्व अधिकारी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यभर निवडणूक कर्तव्यावर कार्यरत असल्यामुळे नवनियुक्त तहसीलदार दीपक गायकवाड हे बदलीनंतर आपला रिक्त पदभार सार्वत्रिक निवडणूकिची आचारसंहिता संपल्यावर म्हणजेचं दि.१७ जानेवारी २०२६ रोजी नंतरच स्विकारतील अशी माहिती वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी दिली.

तत्कालीन वसई तहसिलदार अविनाश कोष्टी यांची दि.७ नोव्हेंबर २०२५ रोजी सेवाजेष्ठता सूची -२०२५ च्या शासन आदेशानुसार आधी उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली होती व चार दिवसांनी दि.११ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या बदलीचा आदेश आला. कोष्टी यांच्या बदलीनंतर ते मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात संजय गांधी योजना विभागाचे उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले कीं नाही ते माहित नाही. परंतु वसई तहसीलदार पद रिक्त झाल्यावर येथील पदभार सुरुवातीला नायब तहसीलदार राजाराम देवकाते यांच्याकडे सोपावला होता.

Adv

मात्र नागरिकांच्या तक्रारी व अप्पर तहसीलदार कार्यरत असताना नायब तहसीलदार यांना पदभार दिल्याच्या कारणाची चूक अवघ्या पाच दिवसांतच लक्षात आल्यावर पालघर जिल्हा प्रशासनाला खडबडुन जाग आली आणि अखेर देवकाते यांच्याकडील तात्पुरता पदभार काढून तो दि.२० नोव्हेंबर पासून अप्पर तहसीलदार (बिनशेती ) विनोद धोत्रे यांच्याकडे सोपवला आहें.

सध्यस्थितीत वसई तहसीलदार हे पद दीड महिन्यापासून रिक्त असून सद्यस्थितीत गायकवाड हे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात कुर्ला विभाग अंतर्गत संजय गांधी योजना विभागाचे तहसीलदार या पदावर असून यांचा हा आदेश महाराष्ट्र सरकारी कर्मचारी बदली कायदा, २००५ अंतर्गत आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या परवानगीने जारी करण्यात आला आहे.

तूर्तास नवनियुक्त तहसीलदार दीपक गायकवाड हे बृहन्मुंबई महापालिका निवडणूकीच्या कर्तव्यावर…
तूर्तास दीपक गायकवाड हे बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते नवीन पदभार स्वीकारतील.

किंबहुना सरकारने तसें लेखी निर्देश दिले आहेत की त्यांनी निर्धारित वेळेत पदभार स्वीकारावा; अन्यथा, अनुपस्थितीचा कालावधी देखील कामकाजाचे दिवस म्हणून गणला जाईल.असे जरी असले तरी त्यामुळे वसईकरांना अदयाप पुढील वीस दिवसाहून अधिक काळ नव्या वसई तहसीलदारांच्या आगमनाची मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहें.

कांय आहें नेमका महाराष्ट्र शासनाचा आदेश… ✅

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!