वसई-विरार शहराच्या सुनियोजित विकासांत वास्तुविशारद ( Architect ),अभियंते (engineer’s) यांची अभ्यासू भूमिका अत्यंत महत्त्वाची — महापौर अजीव पाटील
विरारच्या आई जीवदानी गडावर उभारली १५०० फूट उंचीची अद्भुत ‘ग्लास गॅलरी’ ; भक्तांना दिसणार सफाळे ते उत्तन परिसरातील अरबी समुद्राचं विहंगम दृश्य एकाच दृष्टिक्षेपात…
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.(भा.प्रा.से ) यांची नियुक्ती : पुणे शहराचे शिलेदार वसई विरार शहरात..
वसई पोलिसांनी काढलेला जमावबंदीचा आदेश मोडीत काढत वसईकर नागरिकांचा डीसीपी -झोन २ कार्यालयावर धडक मोर्चा
विरार मध्ये “शारदा हाईट्स” इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग ; 9 जणांची केली सुखरूप सुटका

वसईत “लेक वाचवा…लेक वाढवा” अभियानाला पुन्हा हरताळ : “जागतिक महिला दिनी” नवजात बालिकेला अक्षरशः रस्त्यावर फेकून अज्ञात पसार…

 

चिरडली कळी, वासनेचा बळी
न्यायाची प्रतीक्षा, कित्येक वर्षानी मिळते शिक्षा
लेक वाचवा.. तिला वाढवा, आणि शिकवा, फक्त कोऱ्या कागदांवर…
समाज व्यवस्थाच ठरतेय कधी कधी फोल…
कधी जागणार आपण : आजही रस्त्यावर ती मोकाट.. जनावरं…..!

लेक वाचवा’ (मुलगी वाचवा) हे महाराष्ट्रातील स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी आणि मुलींना समान हक्क देण्यासाठी चालवलेले एक प्रमुख सामाजिक अभियान आहे. २००४ पासून वर्षा देशपांडे यांनी या चळवळीची सुरुवात केली, ज्यात मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, आरोग्य सुविधेसह, सुरक्षितता वाढवणे आणि त्यांच्या जन्माचे स्वागत करण्याची मानसिकता रुजवणे हे मुख्य उद्दिष्ट यात आहे, यातील प्रमुख उद्धीष्ट व उद्देश असा कीं, समाजातील मुलींचे लिंग गुणोत्तर संतुलित करणे, स्त्रीभ्रूणहत्या रोखणे आणि मुला-मुलींमधील भेदभाव नष्ट करणे,
दुसरीकडे लेक वाचवा, हे अभियान केवळ मुलींचे प्राण वाचवण्यापुरते मर्यादित नसून, त्यांना सक्षम बनवण्यासाठी “लेक वाचवा, लेक शिकवा आणि ती लेक वाढवा” या त्रिसूत्रीवर आधारित आहे तरी ही समाजात या आणि अशा सामाजिक मानसिकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या हृदयद्रावक घटना घडत आहेत त्यामुळे “ती” आजही सुरक्षित नाही यावर प्रश्न चिन्ह कायम आहे.

वसई :- आशिष राणे..✍️.खास विशेष बातमीवृत…. ✅

जगभरात एकीकडे जागतिक महिला दिनाचे सन्मान व सत्कार समारंभ उत्साहात सुरु असतानाच, दुसरीकडे माणुसकीला काळिमा फासणारी एक हृदय पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना वसई पूर्वेला घडली आहे.

८ मार्च २०२६ रोजी रविवारी सकाळच्या सुमारास वसईत एका नवजात बालिकेला पिशवीत भरून वसई पूर्वेला वसंत नगरीच्या भर रस्त्याच्या कडेला टाकून कोणी तरी अज्ञाताने पलायन केले आहे.
दरम्यान जागतिक महिला दिनी घडलेल्या या विदारक घटनेमुळे समस्त नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या अधिक महितीनुसार, वसई पूर्वेला वसंत नगरीच्या मुख्य सिंग्नल जवळील रस्त्याच्या कडेला रविवारी सकाळी ७.३० सुमारास काही पादचाऱ्यांना एका नवजात बालिकेचा रडण्याचा आवाज ऐकू आला.

त्यांनी रस्त्याच्या कडेला पाहणी केली त्यावेळेस एका पिशवीत भरलेल्या नवजात बालकास कोणी अज्ञाताने चक्क रस्त्यात फेकून दिल्याचे चित्र दिसून आले, त्यावेळेस तात्काळ पादचाऱ्यांनी घटनेची माहिती माणिकपूर पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटना स्थळ गाठत त्वरित त्या पिशवीतील नवजात बालिकेला ताब्यात घेतलं.

आणि या बालिकेला वसई गावातील पालिकेच्या सर डी.एम. पेटीट रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी हे नवजात शिशु स्त्री जातीचं बालिका असल्याचे स्पष्ट केलं, विशेष म्हणजे हे बाळ साधारण १५ ते २० दिवसांपूर्वीचं जन्माला आल्याचे हीं सांगताना त्याची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती दिली.

मात्र त्यानंतर बालिकेच्या पुढील प्रशासकीय सोपस्कार,प्रक्रिया अधिक सुरक्षा व दक्षते साठी त्यास उमराळे येथील बालकल्याण समिती कडे सुपूर्द करण्यात आले.

या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी तेथील आजूबाजूला स्थानिक नागरिक व पादचाऱ्यांकडे विचारपूरस केली मात्र कुठलीही ठोस माहिती मिळाली नसून अखेर या घटनेची गंभीर दखल घेत माणिकपूर पोलीसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला आहे.

महिला दिनी… हे काय घडलं ?? त्या मातेचं हृदय जरा हीं कळवळलं कां नाही ?

विशेष म्हणजें आज सर्वत्र आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होत असताना कोणी तरी माता अथवा कोणीही अज्ञात या निष्पाप बालिकेला पिशवीत टाकून चक्क उघड्यावर रस्त्यावर फेकून निघून जाते, सध्यस्थितीत प्रशासनाने या नवजात बालिकेच्या संगोपनाची जबाबदारी घेतली असली तरी, हीं घटना मनं सुन्न करणारी आहे,

अर्थात हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेने मात्र समाजाच्या सर्व स्तरातून, स्थानिक नागरिकां मधून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

बालिका असो की नारी : ती,आजही सुरक्षित नाही…

ऐतिहासिक वसई नगरी किंबहुना आपला सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा जपणाऱ्या वसईच्या मातीत महिला दिनी घडलेल्या या दुःखद घटनेने तुमच्या माझ्या नव्हे तर समाजाच्या मानसिकतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे

अर्थात केंद्र व राज्य सरकारच्या “लेक वाचवा आणि लेक वाढवा” या अभियानाचा नारा केवळ राज्यात नव्हे तर संबंध भारत देशात दिला जात असताना अशा हृदयद्रावक व मेंदू सुन्न करणाऱ्या घटना आजहीं डिजिटल व एआय सारख्या युगाच्या प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या समाजात घडणं हीं अत्यंत गंभीर व लज्जास्पद बाब असल्याचे परखड मतं वसईतील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहेत.


माता नं तू वैरीण ! चक्क उघड्यावर बाळाला तू फेकून गेलीस..! पण देव तारी त्याला कोण मारी…!

आपल्या तान्हूल्या लेकरांसाठी साऱ्या जगाशी लढणारी ती जननी (आई )असतें, पण कलियुग काय असतें त्याची हळूहळू आता परिस्थितीनुसार जणू प्रचिती यायला लागली आहे.

समाज म्हणून आपण स्त्रीचा सन्मान, सुरक्षितता आणि समानतेसाठी नेमकं काय केलंय याचा हिशोब अजुन तरी न जुळणारा आहे. मात्र तरीही अशा नवजात भ्रूण, त्यांची हत्या, असो किंवा त्या नवजात बालक -बालिकेला जन्म दिल्यावर सपशेल रस्त्यावर फेकून देणं आणि यांत प्रामुख्याने महिलाच पुढे असतात, हे कसलं लक्षण आहे, त्यामुळे या अशा घटनांना आळा बसणं खूप आवश्यक आहे,

अर्थात महिले बाबतची चुकीची अत्याचाराची घटना कुठलीही असो ते चूकच आहे,मात्र समाजाची मानसिकता बदलल्या शिवाय स्त्री सन्मानाचे खरे स्वप्न पूर्ण होणार नाही,

त्यामुळे एकां बाजूला स्त्री -पुरुष सन्मानाचा उत्सव आणि तिच्या संघर्षाची जाणीव दोघांना असणं तितकंच महत्वाचं आहे, एकूणच स्त्री -पुरुष समान आहेतच हे आपण सर्वानी जाणले पाहिजे.तरच अशा समाजाचं मनं सुन्न करणाऱ्या घटनांना आपण भविष्यात थोडया फार प्रमाणाने तरी किमान थांववू शकू…?.

*****

 

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!