वसई-विरार शहराच्या सुनियोजित विकासांत वास्तुविशारद ( Architect ),अभियंते (engineer’s) यांची अभ्यासू भूमिका अत्यंत महत्त्वाची — महापौर अजीव पाटील
विरारच्या आई जीवदानी गडावर उभारली १५०० फूट उंचीची अद्भुत ‘ग्लास गॅलरी’ ; भक्तांना दिसणार सफाळे ते उत्तन परिसरातील अरबी समुद्राचं विहंगम दृश्य एकाच दृष्टिक्षेपात…
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.(भा.प्रा.से ) यांची नियुक्ती : पुणे शहराचे शिलेदार वसई विरार शहरात..
वसई पोलिसांनी काढलेला जमावबंदीचा आदेश मोडीत काढत वसईकर नागरिकांचा डीसीपी -झोन २ कार्यालयावर धडक मोर्चा
विरार मध्ये “शारदा हाईट्स” इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग ; 9 जणांची केली सुखरूप सुटका

वसई विरार शहर महानगरपालिकेत केवळ तीन दिवसांचा नगररचना उपसंचालक कार्यरत…!

महानगरपालिकेसाठी तीन दिवस : नागरिकांसाठी मात्र उरले बुधवार चे केवळ दोन तास….!
दोन्ही ठिकाणी एकच उपसंचालक कार्यरत असल्याने अनुक्रमे सोलापूर व वसई विरार शहर महानगरपालिकां पूर्णवेळ पदापासून आजही उपेक्षित राहिली आहे,
याबाबत राज्य सरकारचे नगरविकास खात्याने ठोस निर्णय घेण्याची मागणी होतं असली तरी उपसंचालक केवळ तीनच दिवस महापालिकेत कार्यरत राहात असल्याने याचा विपरीत परिणाम अधिकारी व नागरिकांच्या कामावर होतं आहे,
तर खास करून राजकीय शक्ती वापरून मनमर्जीने मनमानी करीत काम करणाऱ्या ठेका अभियंतासाठी मात्र हे तीन दिवस व नंतर आरामच आराम असे वातावरण अगदीच पोषक ठरत आल आहे.
दुसरीकडे सोलापूर महानगरपालिकेत उत्तम काम व नागरिकांशी चांगला सुसंवाद  असणाऱ्या  मनीष भिष्णूरकरांनी मात्र
वसई- विरार महानगरपालिकेत रुजू झाल्यापासून त्यांनी अगदी
“अबोला” धरलांय कां ? असे हीं चित्र नगररचना विभागात अनुभवायला मिळते आहे 
वसई :- आशिष राणे….✍️
सन २०२३  पासून सोलापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक मनीष भिष्णूरकर यांचे तेथील कामकाज पद्धती प्रभावी व नागरिकांशी देखील त्यांचा सुसंवाद उल्लेखनीय राहिला आहे.
मात्र असे असताना सोलापूर महानगरपालिकेतून झालेल्या बदली नंतर वसई विरार महानगरपालिकेत रुजू झालेल्या उपसंचालक मनीष भिष्णूरकर यांची कार्यपद्धती तितकीशी काही चांगली राहिलेली नाही अर्थात त्यांनी नगररचना विभागात आल्यापासून चक्क अबोला धरल्याची वास्तव परिस्थिती आहे.
तत्कालीन उपसंचालक वाय एस रेड्डी यांचे निलंबन झाल्यावर हे पद रिक्त होते त्यावेळेस पावसाळी अधिवेशनात वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी विधानसभेत हा प्रश्न तारांकित केला आणि सोबत सरकारच्या निर्देशानुसार  पालिका आयुक्त सूर्यवंशी यांनी सरकार दरबारी पत्रव्यवहार व पाठपुरावा  केल्यावर  ऑक्टोबर -२०२५ मध्ये राज्याच्या नगरविकास खात्याने  त्यांची बदली वसई विरार शहर महानगरपालिकेत नगररचना विभागाचे उपसंचालक म्हणून केली,
मात्र आज पाच महिने उलटले तरी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी मनीष भिष्णू्रकरांना अद्यापही तिथून कार्यमुक्त केलेलं नाही अशी स्पष्टॊक्ती स्वतः उपसंचालक भिष्णूरकर यांनी भेटीच्या वेळी बोलून दाखवली आहे.
त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर या उक्त म्हणी नुसार त्यांना वसई विरार ते सोलापूर ४४० किमी लांब असा खडतर प्रवास दर आठवड्याला दोन वेळा करावा लागत आहे.
वसई विरार महानगरपालिकेत 3 दिवस : पण भेट फक्त
बुधवारी..दिली जाते..?
वसई विरार शहर महानगरपालिकेत केवळ बुधवारी दुपारी 3 ते 5 यां वेळेतच त्यांची भेटीची वेळ नागरिकांसाठी निश्चित करण्यात आली आहे,
किंबहुना या वेळेत मात्र नागरिकांना भेटायचे सोडून उपसंचालक हे त्यांच्या अभियंते, अधिकारी आणि खास करून शहरातील वास्तुविशारद व त्यांच्या संबंधित काम असणाऱ्या वर्गास घेऊन बसत असल्याचं चित्र नगररचना विभागात अनुभवयास मिळत आहे,
त्यामुळे याठिकाणी नेहमीच कर्मचारी -सुरक्षा रक्षक मिळून त्याठिकाणी भेटायला येणारे  नागरिक, माहिती अधिकार कार्यकर्ते, पत्रकार व अन्य मंडळी यांच्याशी वाद -विवादाची स्थिती उद्भवत असते.
आधीच तीन दिवस महापालिकेत असणारे उपसंचालक हे नागरिकांना केवळ बुधवारी फक्त दोन तास जेमतेम वेळ देत असल्याने व सुसंवाद ही कमी होत असल्याने एकूणच शांत स्वभावाचे मौनी उपसंचालक यांनी मात्र आल्या दिवसापासून अबोला धरला आहे का ? आणि दुसरीकडे वसई विरार महापालिकेत तीन दिवसांचा नगररचना उपसंचालक कार्यरत आहे का ? असा संतप्त सवाल नागरिकांनी  वसई विधानसभेच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांच्यासह पालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी व महापौर अजीव पाटील यांना विचारला आहे.
परिणामी दोन्ही ही महानगरपालिकेला पूर्णवेळ नगररचना उपसंचालक मिळत नाही ही मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या महायुती सरकारच्या गतिमान प्रशासनासाठी विचार करणारी बाब  आहे,
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या नगरविकास खात्याने सोलापूर महानगर पालिकेत नव्याने हे पद भरावे व तेथील बदली झालेले उपसंचालक मनीष भिष्णूरकर यांना सोलापूर आयुक्ता मार्फत कार्यमुक्त करण्याचे आदेश निर्गमित करावे,
जेणेकरून वसई विरार महानगरपालिकेला तीन दिवसांचा उपसंचालक नव्हे तर पूर्णवेळ निवासी उपसंचालक मिळेल अशी मागणी जोर धरते आहे.
या संदर्भात पालिकेचे विरोधी पक्ष नेते मनोज पाटील यांना हीं दोन वेळा दूरध्वनी केला मात्र ते प्रतिकिया दयायचे सोडून अन्य दुसऱ्या दूरध्वनी वर सातत्याने अधून मधून व्यस्त राहिले अर्थात त्यांना प्रश्न विचारला मात्र त्यांना विषयांचे गांभीर्य व त्यास अनुसरून उलट स्वतः हुन दूरध्वनी करून माध्यमास उत्तर दयावे असे क्षणीक हीं वाटले नसावे यावरून त्यांची पालिके विषयीची आत्मीयता लक्षात आली.
आमदार स्नेहा ताई दुबे -पंडित ☝️
वसई विरार महानगरपालिकेत उपसंचालक हे तीन दिवसचं असतात अर्थात ते पूर्ण वेळ मिळावे हा महत्वाचा विषय मी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सरांकडे सविस्तर मांडते आहे, आणि त्यासाठी कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक संयुक्त बैठक देखील व्हावी यासाठी मी स्वतः आग्रही आहे, लवकरच आपण हीं बैठक घेत आहोत ,जेणेकरून वसई विरार महापालिकेचा नगररचना विभाग व त्यासंबंधी प्रश्न,अडचणी व नागरिकांच्या व शहर नियोजना बाबतच्या अन्य प्रश्नाची उकल होण्यास मदत मिळेल..!
आमदार स्नेहाताई दुबे- पंडित 
वसई विधानसभा ( सदस्य ) 
=======================================
होय, उपसंचालक तीन दिवस पालिकेत असतात हे खरं आहे, काही प्रश्न समस्या आहेत तर या संदर्भात आम्ही उपसंचालकां सोबत लवकरच बैठक लावू” ..!
अजीव यशवंत पाटील 
महापौर, वसई विरार शहर महानगरपालिका 
मुख्य कार्यालय, विरार (पश्चिम )

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!