वसईच्या पश्चिम भागात गिरीज स्थित वास्तव्यास असलेले फ्रॅंकलिन से्रेजो यांनी सहकार क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या कामाच्या उत्कृष्टतेमुळे आणि नेतृत्वगुणांमुळे ते या महत्वाच्या पदावर नियुक्त झाले असले तरी एकूणच त्यांच्या या निवडी बद्दल अवघ्या पालघर जिल्ह्यातील नागरिक, सहकार प्रेमी, तालुक्यातील सहकारी संस्थानी व पदाधिकारी यांनी त्यांचं कौतुक वा अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत, त्यामुळे महाराष्ट्र राज्या सोबत कोकण विभागात हीं पुन्हा वसई तालूक्याचं नाव सहकारात अग्रेसर राहण्यास मदतचं मिळेल..यांत अजिबात शंका नाही..
वसई :- आशिष राणे
कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ मर्यादित, अलिबाग संस्थेच्या उपाध्यक्ष पदी वसई स्थित गिरीज येथील फ्रॅंकलिन से्रेजो यांची एकमताने निवड करण्यात आल्याचे नियुक्ती पत्र संघाचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे यांनी जारी केलं आहें.
यां संदर्भात गिरीश तुळपुळे यांनी सांगितले कीं, सप्टेंबर 2025 मध्ये कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघाचे तत्कालीन उपाध्यक्ष यांनी आपल्या संचालक व उपाध्यक्ष अशा दोन्ही पदांचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या महत्वाच्या पदासाठी वाशी येथे मागील आठवड्यात एक बैठक संपन्न झाली.

Adv ✅
त्या बैठकीत उपस्थित संचालक मंडळाने एकमताने संचालक फ्रॅंकलिन से्रेजो यांच्या नावास पसंती दर्शवली. किंबहुना त्यांची नियुक्ती या उपाध्यक्ष पदी 2027 पर्यंत राहील, असे हीं स्पष्ट करत पुन्हा एकदा या निमित्ताने वसईकरांना सेरेजोच्या निमित्ताने सहकारात एक उत्तम काम करण्यासाठी संधी मिळाल्याचे अध्यक्ष तुळपुळे यांनी सांगितले.
कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघाच्या अगदी स्थापने पासूनच फ्रॅंकलिन से्रेजो हे मेहनती संचालक म्हणून कार्यरत आहेत, अर्थातच सन 2022 मध्ये झालेल्या चूरशिच्या निवडणूकित हीं से्रेजो हे चांगल्या मताधिक्याने पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातून संघावर निवडून गेले आहेत.

Adv ✅
मागील 30 दशकाहून अधिक काळ वसई तालुक्यातील शहरी असो किंवा ग्रामीण पूर्व – पश्चिम भागातील सहकारी पतसंस्था, सेवा संस्था असतील किंवा महाविद्यालय आदी संघ आणि सहकारी संस्थां बाबतच्या कामकाजात सहकार प्रेमी तथा तज्ञ् संचालक म्हणून फ्रॅंकलिन से्रेजो हे पालघर जिल्ह्यासहित वसई तालूक्याला सुपरिचित आहेत.
आधी संचालक व आता उपाध्यक्ष झालेले फ्रॅंकलिन से्रेजो यांच्या हीं कामाची पोचपावती असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही त्यानिमित्ताने सहकाराच्या वसई तालुक्याला एकप्रकारे न्याय मिळाला असल्याची वसईत जोरदार चर्चा आहें.
अर्थातच से्रेजो यांच्या आतापर्यंत केलेल्या कामाच्या उत्कृष्टतेमुळे आणि नेतृत्वगुणांमुळे ते या महत्वाच्या पदावर नियुक्त झाले असे जरी असले तरी एकूणच त्यांच्या यां निवडी बद्दल अवघ्या पालघर जिल्ह्यातील नागरिक व सहकार प्रेमी, तालुक्यातील सहकारी संस्थानी त्यांचं कौतुक वा अभिनंदन केलं आहें.

कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ, अलिबाग या संस्थेने माझी उपाध्यक्ष म्हणून निवड केली माझ्यावर विश्वास दाखवून खूप मोठी संधी मला उपलब्ध करून दिली आहें अर्थात त्याबद्दल अध्यक्ष तुळपुळे व अन्य सर्व संचालक मंडळाचे माझ्याकडून व वसई तालूक्याच्या वतीने मनापासून आभार तसेच मी सातत्याने संघाच्या उन्नती व वाढीसाठी प्रयत्नशील राहील सोबत तालुक्याचे हीं नाव राखील✅
फ्रॅंकलिन से्रेजो, वसई (गिरीज )
उपाध्यक्ष : -कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ, अलिबाग
![]()
