सुरक्षेची बोंबाबोंब : बांधकाम परवानगी तपासा…?
परिणामी आग जरी शॉर्टसर्किटने लागली असली तरी प्रत्यक्ष अग्निशमन व महावितरण कं.तपासणीचा अहवाल आल्यावरचं स्पष्ट कारण कळू शकेल. मात्र सुरक्षित उपाययोजना काय होती तर या इमारतीला रीतसर बांधकाम परवानगी आहे कां ? किती मजल्याची परवानगी आहे, फायर परवानगी आणि विशेष म्हणजे भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे कां ?असे नानाविध प्रश्न या जळीत घटनेनंतर उपस्थित होत आहेत
वसई :- आशिष राणे
वसई विरार मनपा विभागातील विरार पूर्व येथील शारदा हाईट्स या नवीन इमारतीच्या 8 व्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना रविवारी सकाळी 11 वाजता घडली.
या आगीच्या कचाट्यातून 9 रहिवाश्यांची सुखरूप सुटका करून त्यांना बाहेर काढण्यात वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

8 व्या मजल्या वरील 3 सदनिकांच्या दरवाज्यांच्या बाजूला डक मधील वायरिंग व त्यानंतर फर्निचर पॅनलला ही आग लागली होती. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे,किंबहुना शॉर्टसर्किट झाल्याने हीं आग लागल्याने त्याठिकाणी आगीच्या ज्वाळा व धुराचे लोण सर्वत्र पसरले, त्यामुळे तेथील सदनिकेतील रहिवासी घरातच अडकले होते.

या गंभीर घटनेची माहिती सोसायटीतील रहिवाशी यांनी महापलिका अग्निशमन दल व स्थानिक नगरसेवक प्रशांत राऊत यांनी दिली असता त्यांनी तात्काळ घटना स्थळ गाठले त्याठिकाणी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान पोचले आणि त्यांनी बचाव कार्य सुरु करत त्या इमारती मधील आगीवर सर्वप्रथम नियंत्रण मिळवलं आणि सदनिकेत अडकलेल्या 9 जणांना सुखरूप बाहेर काढलं.

सुरक्षितता म्हणून सुरुवातीलाचं इमांरतीमधील रहिवाशी भयभीत होऊन खालीमोकळ्या जागी जमा झाले होते, त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र त्या 8 व्या मजल्यावर असलेल्या तीन घराचे व सोसायटीच्या मालमत्तेचे नुकसान झालं आहे,
दरम्यान संतापजनक म्हणजे आग लागल्यावर सोसायटी मधील फायर यंत्रणा (वॉटर स्प्रिंगर ) मधून पाणी आलेच नाही, तर दोन वर्षांपूर्वीच नव्याने बांधलेल्या 12 मजली इमारतीत ही भीषण दुर्घटना घडल्याने त्या विकासकां विरोधात आता तीव्र संताप व्यक्त होत आहे.
त्यामुळे या घटनेची गंभीर दखल घेत वसई विरार महानगरपालिका या प्रकरणी विकासकावर कोणती कारवाई करते कां याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

माहिती मिळताच आम्ही टीम सोबत आलो, लेडर हीं मागवला, सर्वप्रथम आगीवर नियंत्रण मिळवलं,हीं आग 8 व्या मजल्यावरील फ्लॅट नं. 805,806 आणि 807 याच्या दरवाजे व त्याच्या बाजूला असलेल्या डक मधील वायरिंग ला लागल्याने वरील तिनही फ्लॅट मधील रहिवाशी घरात अडकले होते त्यांना सुखरूप बचावले आहे
विजय राणे
वसई विरार मनपा, अग्निशमन अधिकारी
✅पत्रकारांचं मत :- वसई विरार शहरात आगीच्या घटना वाढत आहेत.. अर्थात जुन्या इमारतीना आगी लागणं समजू शकतो.. मात्र नव्या टोलेजंग इमारतीला आगी लागतात व तेथील सुरक्षा म्हणून फायर यंत्रणा कार्यान्वित होतं नाही तर याला जबाबदार कोण? हे फार विचार करायला लावणारे आहे…
✅⚠️महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal वर संपर्क साधा !
Mymarathi7.com
![]()
