“जिल्ह्यातील ८ तालुक्यातील १०४ जणांच्या झाल्या बदल्या ; पैकी वसई तालुक्यात १४ तलाठी ,२ सहाय्यक महसूल व ४ महसूल सहाय्यक अधिकारी वर्गाच्या मिळून २० जणांच्या झाल्या बदल्या “

वसई :- आशिष राणे
“जे -जे नसे ललाटी ते- ते लिखे तलाठी” आणि “सरकारी काम अन सहा महिने थांब” या दोन्ही प्रचलित म्हणीनुसार आजवर गतिमान महसूल प्रशासनाचा गाढा आजच्या डिजिटल युगात ही संथ गतीनं सुरू आहे,

या “जैसे थे” परिस्थितीमुळे अखेर राज्य शासनाने प्रांताधिकारी यांचेकडील तलाठी बदलीचे अधिकार दीड वर्षांपूर्वीच काढून घेतले आणि सर्वत्र या निर्णयाची अंमलबजावणी केली.
अखेर राज्य शासनाच्या या निर्णयामुळे तलाठ्यांच्या बदल्या आता जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यात होऊ शकतात त्यात मागील अनेक वर्षें झाली काही महसूल अधिकारी व सहायक ,तसेच मंडळ अधिकारी व तलाठी बाबू यांच्या बदल्या मुदत संपून देखील इतरत्र तालुक्यात झालेल्या नसल्याचं नवनियुक्त जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आले.
पालघर जिल्ह्यातील कर्मचारी अधिकारी वर्ग ,तलाठी व अन्य महसुल अधिकारी वर्गाच्या तक्रारी असताना ही काही महाभाग वर्षोनुवर्षे एकाच ठिकाणी एकाच खुर्चीवर ठाण मांडून बसले होते त्याच धर्तीवर पालघर जिल्हाधिकारी डॉ इंदुराणी जाखड यांनी दि ३१ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता पालघर जिल्ह्यातील एकूण १०४ महसूल कर्मचारी अधिकारी वर्गाच्या बदल्यांचे आदेश काढत त्या बजावलेल्या बदलीतील आदेशात स्वतः जिल्हाधिकारी यांनीच कर्मचारी अधिकारी वर्गास पदस्थापना दिल्याने प्रस्थापितांना आता मोठी धडकी भरली आहे
पालघर जिल्ह्यातील ८ तालुक्यातील १०४ जणांच्या बदल्या करत जिल्हाधिकारी यांनी सर्वांना जोर का झटका धिरे से लगे देत दे दणका दिला आहे.
यापैकी वसई तालुक्यात १४ तलाठी ,२ सहायक महसूल व ४ महसूल सहाय्यक अधिकारी वर्गाच्या मिळून अशा २० जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत
विशेष म्हणजे पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या १० मंडळ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या मात्र वसई तालुक्यातून एकाही मंडळ अधिकाऱ्याची बदली यात करण्यात आलेली नाही याचं कारण मात्र समजू शकलेल नाही.
दरम्यान दि ३१ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या लेखी आदेशानुसार जिल्ह्यामधील ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच एकूण ३८ तलाठ्यांची बदली केली आहे त्यापैकी १४ तलाठी हे वसई तालुक्यातील आहेत
तसेच जिल्ह्यात २७ महसूल सहाय्यक यांच्या बदल्या झाल्या त्यापैकी ४ महसूल सहाय्यक हे वसई तालुक्यातील आहेत अशा एकूण पालघर जिल्ह्यात १०४ ग्राम महसूल आणि अन्य कर्मचारी तलाठी मंडळ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दि ३१/०५/२०२५ रोजी पालघर जिल्हाधिकारी डॉ इंदूराणी जाखड यांच्या लेखी आदेशाने बजावण्यात आल्याने एकप्रकारे प्रस्थापितांना हा चांगलाच दणका मिळाला आहे
प्रांताधिकार्यांना असलेले तलाठी बदलीचे अधिकार शासनाने दीड वर्षांपूर्वीच रद्द केले !
ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी तात्या हे नाव उभ्या महाराष्ट्राला सुपरिचित असले तरी तलाठ्याचे केवळ एक किंवा दोन तालुक्यांपुरते मर्यादित असलेले कामाचे कार्यक्षेत्र आता संपूर्ण जिल्हा करण्यात आले आहे. यामुळेच प्रांताधिकार्यांना असलेले तलाठी बदलीचे अधिकार शासनाने दीड वर्षांपूर्वीच रद्द करून ते त्या त्या जिल्ह्यातील संबंधित जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
कुपंणच शेत खात होते ?
या अगोदर प्रातांधिकारी यांना असलेल्या अधिकारात बदलीसाठी घोडेबाजार व आर्थिक ऋणानुबंध जपले जायचे त्यात राजकीय – सामजिक संघ ,पक्ष ,संघटना यांच्या असंख्य तक्रारीकडे दुर्लक्ष करणे,मर्जीनुसार बदल्या व प्रतिनियुक्ती त्यात हवा तसा सजा देणे, सूचना,निवेदनाना केवळ आश्वासनाची मलमपट्टी असे प्रकार प्रत्येक तालूका स्तरावरील प्रांताधिकारी कार्यालयाकडून सर्रास होत असे अखेरीस शासनाकडे तक्रारी गेल्यावर विभागीय चौकशी लागायची व त्यात वर्षोनुवर्षे नंतर निकाल लागायचे अर्थात त्यात तलाठी मंडळ अधिकारी व अन्य महसूल अधिकारी कर्मचारी दोषी ही आढळून यायचे किंबहुना मुदतीत बदली किंवा एकाच ठिकाणी बस्तान ठोकण यात प्रांताधिकारी स्वतः केंद्र बिंदू होते त्यानुसार शासनाने ऑगस्ट २०२३ मध्ये हे अधिकार काढुन घेतले व ते थेट जिल्हाधिकारी यांना दिले.शेवटी जिल्हाधिकारी यांना ही दिलेल्या बदलीच्या अधिकारात पुढील काळात पारदर्शकता राहील का ? हा सुध्दा एक संशोधनाचा विषय ठरतोय.
वसई उपविभागीय कार्यालय व तहसीलदार वसई कार्यालयातील पवार व शिंदे यांना पालघर जिल्हाधिकारी डॉ इंदुराणी जाखड यांचा जोरदार दे धक्का !
तर जिल्ह्यात एकूण २७ सहाय्यक महसुल अधिकारी पैकी वसई तालुक्यातून केवळ २ सहाय्यक महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या वाडा व पालघर तालुक्यात झालेल्या आहेत हे दोघेही मागील बरीच वर्षे एकाच कार्यालयात ठाण मांडून होते तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील दोघेही मातब्बर सहाय्यक महसूल अधिकारी असलेल्या विनोद पवार व नितीन शिंदे यांना या आदेशानुसार जिल्हाधिकारी पालघर यांनी जोरदार दे धक्का दिला आहे.
विनंती बदल्यांचे अधिकार विभागीय आयुक्तांना—
महसुलमंत्र्यांना असलेले विनंती बदलीचे अधिकार आता विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत.
यात अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लघु-टंकलेखक,महसूल सहाय्यक, वाहन चालक, तलाठी या गट क कर्मचाऱ्यांच्या कलम चार (४) दोन व कलम चार (५) नुसार बदल्यांचे महसूल मंत्र्यांचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत.
तलाठी नावे- कार्यरत तालूका – बदलीनंतरचं ठिकाण
१) अमित राबड चिखलडोंगरी, वसई
(एक वर्ष मुदतवाढ वैद्यकीय कारण)
२) संतोष शिर्सेकर ( शिरसाड,वसई , महागाव, पालघर)
३) मयुरेश भोईर (दिवाणमान,वसई पाली : वाडा)
४) विजयकुमार मिंड (वडवली ,वसई , लालोंडे पालघर)
५) अक्षता गायकर (बिलालपाडा ,वसई नरपड, डहाणू )
६) सुषमा दासरवार (गोखिवरे,वसई,चटाळे ; पालघर )
७) संदेश पाटील (जुचंद्र,वसई, शिरगाव :पालघर)
८) अनंता बरफ (शिरगाव ,वसई..तवा डहाणू )
९) निवृत्ती बांगर ( कामण, वसई सेवानिवृत्त होत असल्याने दि ३०/६/२०२५ पर्यंत मुदतवाढ )
१०) सिताराम राठोड ( कौलार बुद्रुक,वसई ; तणाशी ; डहाणू )
११) सुधाकर जाधव ( बोळीज ,वसई जामशेत; डहाणू )
१२) विशाल शिंदे ( आचोळे ,वसई .गंजाड ; डहाणू) १३) दिनेश पाटील ( सांडोर ,वसई माहीम ; पालघर )
१४) हेमंत मुळांणे (निर्मळ, वसई ,सरावली ;पालघर )
सहाय्यक महसूल अधिकारी
१) नितीन संभाजी शिंदे (वसई तहसील मधून पालघर उपविभागीय कार्यालय)
२) विनोद देविदास पवार ( वसई उपविभागीय कार्यालयातुन ता.वाडा तहसील कार्यालय )
महसूल सहाय्यक
१) निकेश उबाळे ( वसई तहसील मधून वसई उपविभागीय कार्यालय )
२) दिपाली ठेंगरे ( वसई तहसील मधून डहाणू सूर्या प्रकल्प )
३) रुपेश चौधरी (वसई तहसील येथून पालघर तहसीलदार कार्यालय)
४) जयश्री कोळी ( वसई तहसील मधून पालघर जिल्हाधिकारी कार्यालय )
वसई तालुक्यातुन एकही मंडळ अधिकाऱ्याची बदली नाही ?
पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या ७ तालुक्यातील १० मंडळ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या मात्र वसई तालुक्यातून एकाही मंडळ अधिकाऱ्याची बदली करण्यात आलेली नाही.
पालघर जिल्ह्यातील तालुका निहाय विविध महसुल पदे बदल्यांची आकडेवारी दर्शविणारा तक्ता !
तलाठी एकूण बदल्या -३८
वसई – १४ पालघर- ८ तलासरी -१ डहाणू – ७
वाडा – ५ जव्हार – ० विक्रमगड – २ मोखाडा- १
मंडळ अधिकारी एकूण बदल्या – १०
वसई – ० पालघर- १ तलासरी -२ डहाणू – २
वाडा – १ जव्हार – १ विक्रमगड – २ मोखाडा- १
महसूल अधिकारी एकूण बदल्या – २७
वसई – ४ पालघर- १० तलासरी – २ डहाणू – ४
वाडा – २ जव्हार – ३ विक्रमगड -२ मोखाडा- ०
सहा. महसूल अधिकारी एकूण बदल्या – २९
वसई – २ पालघर- १० तलासरी – १ डहाणू – ७
वाडा – २ जव्हार – ६ विक्रमगड – ० मोखाडा- १
सर्व विभागाचे महसूल कर्मचारी अधिकारी वर्गाच्या तालुक्यातील तालुका निहाय १०४ बदल्यांची आकडेवारी !
पालघर- २९ वसई – २० डहाणू – २० वाडा – १० जव्हार – १० विक्रमगड – ६ तलासरी – ६ मोखाडा- ३
![]()

