“अत्याधुनिक आणि मोबाईलच्या स्क्रीनवर गुरफटून गेलेल्या समाज वातावरणात पुस्तक वाचन संस्कृती जपली पाहिजे “!

वसई :- आशिष राणे
समाजातील तरुणाईला शैक्षणिक व व्यावसायिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी पाठ्यपुस्तकी ज्ञानासह जागतिक विविध क्षेत्रातील ज्ञानअत्यंत गरजेचे आहे.
यामुळे वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी अर्नाळा आरमार प्रतिष्ठान च्या संकल्पनेतून ग्रंथालय उभारण्यात आल्याची माहिती प्रथमेश बावकर यांनी दिली
दरम्यान या उपक्रमाला स्थानिक पातळीवर उदंड प्रतिसाद मिळत आहे.अत्याधुनिक आणि मोबाईलच्या स्क्रीनवर गुरफटून गेलेल्या समाज वातावरणात पुस्तक वाचन संस्कृती जपली पाहिजे.
या संकल्पनेला शाबासकी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात २५ वर्षे विविध सामाजिक वाटेवर वाटचाल करणाऱ्या जनसेवा फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष विजय वैती यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवरील शेकडो पुस्तके आरमार प्रतिष्ठान ग्रंथालयाला भेट देण्यात आली.
या प्रसंगी आरमार प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रथमेश बावकर, सचिव भागेश बावकर, खजिनदार सिताराम घरत, सदस्य समीर अत्तार व अभय पुजारी आदी उपस्थित होते.
या एकूणच उपक्रमाबाबत अर्नाळा वासियांनी जनसेवा फाऊंडेशनचे आभार मानले आहेत.
![]()
