वसई-विरार शहराच्या सुनियोजित विकासांत वास्तुविशारद ( Architect ),अभियंते (engineer’s) यांची अभ्यासू भूमिका अत्यंत महत्त्वाची — महापौर अजीव पाटील
विरारच्या आई जीवदानी गडावर उभारली १५०० फूट उंचीची अद्भुत ‘ग्लास गॅलरी’ ; भक्तांना दिसणार सफाळे ते उत्तन परिसरातील अरबी समुद्राचं विहंगम दृश्य एकाच दृष्टिक्षेपात…
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.(भा.प्रा.से ) यांची नियुक्ती : पुणे शहराचे शिलेदार वसई विरार शहरात..
वसई पोलिसांनी काढलेला जमावबंदीचा आदेश मोडीत काढत वसईकर नागरिकांचा डीसीपी -झोन २ कार्यालयावर धडक मोर्चा
विरार मध्ये “शारदा हाईट्स” इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग ; 9 जणांची केली सुखरूप सुटका

एक धाव वीज सुरक्षेसाठी ! कल्याण परिमंडळात मॅरेथॉनद्वारे सुरक्षा सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ

 

दि २ जून रोजी सर्व उपविभागात वीज सुरक्षितता बाबतीत कार्यक्रम तर ३ व ४ जुन रोजी कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी व कुटुंब सद्स्य आणि शालेय विद्यार्थी यांच्यासाठी वीज सुरक्षा जनजागृती वर आधारीत  चित्रकला/निबंध स्पर्धा चे आयोजन !

कल्याण: –

महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘शुन्य अपघात महावितरण, शुन्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन १ ते ६ जून दरम्यान राज्यभरात वीज सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार कल्याण  परिमंडळात  रविवारी (०१ जून) सकाळी मॅरेथॉनच्या उत्साही वातावरणात सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. ‘आम्ही सुरक्षेचे शिल्पकार, शुन्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार’ हे ब्रिद घेऊन वीज सुरक्षेबाबत जनजागृती करत निघालेल्या कर्मचारी-अधिकाऱ्याच्या मॅरेथॉनचे नेतृत्व कल्याण  परिमंडळाचे  मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी केले.

महावितरणचा २० वा वर्धापन दिन येत्या ६ जूनला साजरा होत आहे. या निमित्ताने आयोजित वीज सुरक्षा सप्ताहात वीज सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

कल्याण परिमंडळात कार्यालयाच्या प्रांगणातून रविवारी सकाळी ८ वाजता कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या सहभागातून आयोजित मॅरेथॉनला सुरुवात झाली. वीज सुरक्षेबाबत फलक हाती घेत व घोषणा देत ही मॅरेथॉन प्रेम ऑटो चौकापर्यंत पोहचली. वीज सुरक्षेचा जागर करत ‘रन फॉर सेफ्टी’ हे घोषवाक्य घेऊन निघालेल्या मॅरेथॉनचा समारोप  परिमंडळात  कार्यालयाच्या प्रांगणात झाला.

या मॅरेथॉनमध्ये वाशी मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील, मुख्यालयातील वितरण विभागाचे अधीक्षक अभियंता नितीन काळे, कल्याण मंडळ दोनचे अधीक्षक अभियंता विजय फुंदे, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी अजित ईगतपुरीकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, कार्यकारी अभियंते कौमुदी परदेशी, देबाशिश दत्ता, मिलींद चौधरी, जगदिश बोडखे, मनिष ढाकरे, वरिष्ठ व्यवस्थापक योगेश अमृतकर यांच्यासह उपविभागीय, शाखा अभियंते, कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२ जून रोजी परिमंडळातील सर्वच उपविभागांमध्ये रहिवासी परिसरात वीज सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात येणार असून दि.३ व ४ जून रोजी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी आणि कुटूंबियांसाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी वीज सुरक्षा विषयी निबंध / चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती कल्याण विभागाचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!