मंत्रालयाच्या दारातच “रॅपिडो बाईक”ला परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा “दे दणका “

 

“राज्य शासनाने नुकतेच  ई-बाईक धोरण जाहीर केले असले तरी त्यानुसार विविध अटी -शर्तीचे पालन करणाऱ्या व केवळ इलेक्ट्रिक बाइक असलेल्या संस्थांनाच यापुढे बाईक टॅक्सीची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व बाईक टॅक्सी या अजूनही अनधिकृतच आहेत.”

 

मुंबई : – राज्य शासनाने कोणत्याही बाईक ॲपला अद्यापि अधिकृत परवानगी दिलेली नसताना अवैधरित्या अँप द्वारे आरक्षण करून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या रॅपिडो बाईकला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रंगेहात पकडत दे दणका दिला आहे

शासनाने नुकतेच  ई-बाईक धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार विविध अटी -शर्तीचे पालन करणाऱ्या व केवळ इलेक्ट्रिक बाइक असलेल्या संस्थांना यापुढे बाईक टॅक्सीची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व बाईक टॅक्सी या अनधिकृतच आहेत.

या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला याबाबत विचारले असता, मुंबई अथवा इतर शहरांमध्ये कोणतीही अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप अस्तित्वात नाही. असे सरकारी उत्तर मिळाले.

 

आणि परिवहन मंत्र्यांनी केला “बाईक ॲप” चा भांडा-फोड !

तथापि, त्याची उलट तपासणी करण्याचे हेतूने परिवहन मंत्री सरनाईक यांनी रॅपिडो बाईक टॅक्सी ॲप वर स्वतः अनोळखी नावाने बाईक बुक केली पुढच्या दहा मिनिटांमध्ये सदर बाईक त्यांना घेऊन जाण्यासाठी मंत्रालयातील शहीद बाबू गेनू चौकामध्ये ही हजर झाली,अशाप्रकारे अनाधिकृतरित्या ” बाईक ॲप ” चालवणाऱ्या संस्थेचे भांडा -फोड स्वतः परिवहन मंत्र्यांनी केले.

पावसाळी अधिवेशन सुरू आहे ; अधिकाऱ्यांवरील कारवाई कडे सर्वांचे लक्ष ? 

आता, खुद्द  परिवहन मंत्री महोदयांनाच खोटी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वर नेमकी कुठली कारवाई होईल ? याचे मात्र राज्यातील जनतेला मोठे औत्सुक्य लागून राहिले आहे.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!