“पालघर जिल्हयातील सर्व तालुक्यांतील पाण्याखाली जाणाऱ्या पुलांची माहिती तहसिलदार यांच्याकडून प्राप्त झाल्याप्रमाणे पुराच्या पाण्यामुळे आठ तालुक्यातील एकूण ८५ पूल व रस्ते बुडू शकतात अशी सविस्तर माहिती समोर आली असली तरी देखील ग्रामीण भागातील पायाभूत सुविधेतील तफावत दूर करण्यासाठी धरती आबा अभियान राबविण्यात येत आहे अर्थात जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचे निर्देश पालकमंत्री नाईक यांनी दिले आहेत “!
पालघर :- ( जिल्हा प्रशासन )
पालघर जिल्हयातील अतिवृष्टीमुळे रस्त्यांवरील पुल पुराच्या पाण्याखाली जातात व त्यामुळे संपर्क तुटण्याच्या घटना घडत असल्यामुळे पुराच्या पाण्याखाली जाणारे पुल व रस्ते
तातडीने दुरुस्त करण्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्हयाचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिलेल्या सूचनेनुसार पालघर जिल्हयातील सर्व तालुक्यांतील पाण्याखाली जाणाऱ्या पुलांची माहिती तहसिलदार यांच्याकडून प्राप्त झाली आहे.
त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधेतील तफावत दूर करण्यासाठी धरती आबा अभियान राबविण्यात येत असून त्याबाबतचा पूर्ण प्रस्ताव जिल्हा परिषद,पालघर यांनी सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले होते.

त्याचप्रमाणे पालघर जिल्हयातील पुराच्या पाण्यामुळे बुडणाऱ्या पुलांची माहिती तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे.
पालघर- ४ वसई- ५ डहाणू-२४ , तलासरी-४ , वाडा- १८, विक्रमगड- १३ , जव्हार-१४ , मोखाडा-३ असे एकूण ८५ पुल व रस्ते आहेत.
त्यानुसार पूर-रेषेच्या पातळीनुसार पुल दुरुस्ती अथवा उंची वाढविणे किंवा आवश्यक उपाययोजना करण्याकामी नमूद पुलाचे अंदाजपत्रक १५ दिवसात सादर करण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर,जव्हार व कार्यकारी अभियंता (बांधकाम), जि.प.पालघर यांना देण्यात आलेले आहेत.
वरील सर्व प्रस्तावित कामांपैकी आदिवासी क्षेत्रातील कामे आदिवासी उपाय योजना मधून व बिगर आदिवासी क्षेत्रातील कामे ही जिल्हा नियोजन समिती व विभागाच्या इतर योजनेतून पुढील २ वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष भागडे यांनी कळविले आहे.
![]()
