✅राव करील ते गाव कांय करील…या उक्त म्हणी नुसार..
✅रावसाहेब कोष्टी गेले, देवकाते गेले आणि आता विनोद धोत्रे आले… पुन्हा तीन दिवसांनी तालुक्याला मिळतील नवे तहसिलदार..??
✅आधी निवासी नायब तहसिलदारांवर जबाबदारी ; आता पुन्हा अप्पर तहसिलदारांकडे पदभार

वसई :- आशिष राणे….खास महसूली मिसळ वृत्त..
वसई तालुक्याचे कार्यसम्राट तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी अविनाश कोष्टी यांनी शनिवार दि. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने आपल्या वसई तहसिलदार पदाचा पदभार त्याच कार्यालयातील निवासी नायब तहसिलदार (महसूल) यांच्याकडे सोपवून ते मुंबईला रवाना झाले होते,
आता मात्र पुन्हा पालघर जिल्हा प्रशासनाने हा पदभार पाच दिवसांनंतर जाग आल्यावर अचानक निवासी (महसूल ) नायब तहसिलदार (RNT) राजाराम देवकाते यांच्याकडून काढून त्याच कार्यालयातील वसई (बिनशेती) अप्पर तहसिलदार विनोद धोत्रे यांच्याकडे सोपवला आहे,
हा नेमका घोळात- घोळ कांय आहे तोच काही समजेनासा झाला आहे. अक्षरशः पालघर जिल्हा प्रशासनाने इतक्या महत्वाच्या तहसिलदार पदभाराची कुठलीही गनिमा नं ठेवता पूर्ती “मामलेदार मिसळ करून ठेवली आहे.
या प्रकरणी पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड व निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भांगडे यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता तो मात्र झाला नाहीं.
दरम्यान प्रशासकीय आणि दैनंदिन कामकाज आणि नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आदीची विविध कामं व आदेश प्रलंबित राहू नयेत, त्यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातून सुरुवातीला तात्पुरता कार्यभार निवासी नायब तहसिलदार राजाराम देवकाते यांच्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश पारित झाले होते,
तर आता पुन्हा पाच दिवसांनी दुसऱ्या वेळी हा पदभार वसईचे (बिनशेती )अप्पर तहसिलदार यांच्याकडे गुरुवार दि.२० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी सोपवल्याचे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.त्यामुळे तहसिलदार यांच्या खुर्चीचां हा नेमका घोळ कांय आहे किंवा जिल्हा प्रशासनाने आपली चूक सुधारली आहे कां? हे मात्र अदयाप कळू शकलेलं नाहीं.
✅नव्या तहसीलदारांसाठी दोन -तीन दिवस किंवा तात्पुरता पदभार राहील दोन महिने ??
एकंदरीत विशेष सूत्रांच्या माहिती नुसार यदा- कदाचित येत्या दोन तीन दिवसात हीं नियुक्ती होऊ शकते, किंबहुना जर नव्या “वसई तहसिलदार” यांच्या नावाची घोषणा-नियुक्ती दोन चार दिवसात राज्याचे महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडून थेट झाली नाहीं तर पुढील दोन ते तीन महिने हीं नवी-नियुक्ती होऊ शकणार नांहीं,
आणि याचं कारणामुळे आणि पालघर जिल्हा प्रशासनास कुणकुण लागल्यानेच त्यांनी याठिकाणी आपली चूक सुधारून वसई महसूल स्थित नायब तहसीलदार यांच्याकडून हा पदभार काढून घेत तो आता अप्पर तहसिलदार विनोद धोत्रे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
✅दुसरीकडे वसईतून मुंबईला जायला कोष्टी यांना पाच दिवस कां लागले..??
अशी हीं चर्चा जोरदार सुरु आहे तर तहसिलदार कोष्टी यांनी बदलीनंतर ही काही फाईल व महसूली दावे, प्रकरणे जर निकाली काढली असतील तर अशा सर्व फाईली वा आदेशाची पुनः समिक्षा व्हावी,अशी ही वंदिता सध्या तालुक्यातील नागरिकांमध्ये आहे.
तरीही पारदर्शक व सक्षम कामकाज प्रणाली व्यवस्थेसाठी नव्या तहसिलदारांची तालुक्याला प्रतीक्षा राहील आता पाहू या, की महसूलमंत्री कुणाच्या गळ्यात “तहसिलदार वसई” या पदाची माळ टाकतात. हे पाहणे औत्सुक्याचे ठरेलं.
![]()
