वसईतील भक्तजनांसाठी हा एक आध्यात्मिक आनंदाचा सोहळा ठरणार…. उत्तम कुमार यांचं वसईकरांना निमंत्रण..
“या पवित्र पुजां व विधीमुळे भक्तांना मन:शांती, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक समाधान लाभेल,”
वसई :- आशिष राणे
वसई (प.) ओम नगर परिसरात येत्या रविवार, 23 नोव्हेंबर 2025 रोजी भक्तिभावाने नटलेला एक भव्य धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री मुत्तप्पण वेल्लाटम महापूजा आणि श्री कालभैरव महापूजा या दोन महत्त्वपूर्ण पुजांचा लाभ मोठ्या भक्तांना मिळणार आहे.
हा दर्शनीय सोहळा ओमनगर मैदानात पार पडणार असून भक्तांसाठी विशेषरित्या दर्शनाची मोकळी व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी 3.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत दर्शनाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. विविध धार्मिक विधी, मंत्रोच्चार व आरतींनी संपूर्ण परिसर भक्तिमय होणार आहे.
या धार्मिक कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक उत्तम कुमार, 9323528197 (संयोजक – केरळ प्रकोष्ट, भाजपा महाराष्ट्र प्रदेश) यांनी संपूर्ण वसईकरांना आमंत्रण दिले आहे. “या पवित्र पुजांमुळे भक्तांना मन:शांती, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक समाधान लाभेल,” असेही त्यांनी सांगितले.
वसईतील भक्तजनांसाठी हा एक आध्यात्मिक आनंदाचा सोहळा ठरणार असून मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
![]()
