वसई :- आशिष राणे
वसई धर्मप्रांताचे बिशप थॉमस डिसोझा आणि फा. फ्रान्सिस डाबरे या दोघांचेही अधिकृत वापरातील फोन नंबर व व्हॉटसप खाते कोणी अज्ञात सायबर चोरांनी हॅक केल्याची माहिती वसई धर्मप्रांत बिशप हाऊसचे प्रसारमाध्यम प्रमुख फा. रेमंड रुमाव यांनी दिली आहे.
या संदर्भात दि.२२ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या आवाहन पत्रात म्हंटल्यानुसार वसईच्या बिशप हाऊसच्या अधिकृत ई -मेलद्वारे लोकांना तात्काळ खास आवाहन करण्यात आले आहे की, स्वतः बिशप व फा. डाबरे या दोघाचे ही मोबाईल फोन व व्हॉटसप दि.२१ जून रोजी पासून हॅक झाले आहेत,
यामध्ये बिशपांचा मोबाइल नं 9702090212 असा आहे तर दोन्ही फ़ोन व व्हॉटसप ही हॅक झाल्याचे कळताच सर्वप्रथम बिशप हाऊस यांच्या कार्यालयाने त्यांच्या अधिकृत ई मेल @vasaidiocese@gmail.com द्वारे त्यांनी स्पष्ट असे नमूद केलं आहे,वरील नमूद नंबरवरुन कोणतेही संदेश, कॉल किंवा संप्रेषण यापुढे बिशप हाऊस च्या अधिकृत ईमेल द्वारे पुढील सूचनेपर्यंत लोकांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे तसेच स्वतः बिशप थॉमस डिसोझा व फा. फ्रान्सिस डाबरे या दोघांच्या फोन नंबर वरून तसेच सोशल मीडिया खात्यावरून कोणतीही विचारणा अथवा माहिती आल्यास पैसे हस्तांतर करू नये असे आवाहन बिशप हाऊस चे प्रसारमाध्यम प्रमुख फा रेमंड रुमाव यांनी बिशपांच्या वतीनं केलं आहे
वसई धर्मप्रांताचे बिशप थॉमस डिसोझा यांनी जनतेस केलेलं आवाहन पत्र

या प्रकरणी बिशप हाऊस कार्यालयाकडून मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांलय अंतर्गत सायबर क्राईम विभागाकडे तक्रार नोंदविण्यात आली असून आम्ही मदतीसाठी पोलिसांच्या संपर्कात आहेत व त्यासोबत वसईच्या बिशप हाऊस कडून महत्त्वाचे असे अधिकृत आवाहन पत्र देखील लोकांच्या व प्रसारमाध्यमांसाठी प्रसिध्द करण्यात आले आहे
![]()
