बहुजन विकास आघाडीचे जेष्ठ नेते तथा माजी महापौर नारायण मानकर यांनी अभ्यासिकेत असलेल्या समस्यांबाबत महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार याना १ डिसेंबर व त्यानंतर दोनवेळा तसेच विद्यार्थ्यांनी १२ मार्च रोजी पत्रव्यवहार केला होता व सुविधा मिळाव्यात अशी मागणी केली होती त्यानुसार त्वरित आयुक्त अनिलकुमार पवार यांनी निर्देश दिले
वसई :- आशिष राणे
विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या अभ्यासासाठी वसई पश्चिम अंबाडी रोड येथे अभ्यासिका केंद्र उभारण्यात आले आहे
विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या अभ्यासासाठी वसई पश्चिम अंबाडी रोड येथे अभ्यासिका केंद्र उभारण्यात आले आहे
मात्र याठिकाणी अनेक सुविधांची वानवा विद्यार्थ्यांना सतावत होती त्यामुळे बविआचे जेष्ठ नेते तथा माजी महापौर नारायण मानकर यांनी महापालिकेकडे विद्यार्थ्यांना सुविधा द्या अशी मागणी केली होती
त्याच्या पाठपुराव्याला यश आले असून, अभ्यासिका केंद्रात आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निर्देशानुसार नव्या सोयी सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

बहुजन विकास आघाडीचे जेष्ठ नेते तथा माजी महापौर नारायण मानकर यांनी अभ्यासिकेत असलेल्या समस्यांबाबत महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार याना १ डिसेंबर व त्यानंतर दोनवेळा तसेच विद्यार्थ्यांनी १२ मार्च रोजी पत्रव्यवहार केला होता व सुविधा मिळाव्यात अशी मागणी केली होती त्यानुसार त्वरित आयुक्त अनिलकुमार पवार यांनी निर्देश दिले व शहर अभियंता आपण प्रदिप पाचंगे , कार्यकारी अभियंता, प्रकाश साटम विद्युत विभाग अभियंता अमोल जाधव विद्युत आदींनी अभ्यासिकेतील समस्यांची पाहणी केली,
त्यानुसार विद्यार्थ्यांना वाय- फाय व इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून प्रसाधन गृह दुरुस्ती , अभ्यासिकेत मुलांसाठी व मुलींसाठी एकूण २० चार्जिंग पॉईंट मुलामुलीसांठी स्वतंत्र १२ एयरकंडीशनर व्यवस्था महापालिकेने केली. तर १५० विद्यार्थ्यांना बसण्यासाठी देखील सुविधा मिळणार असून त्याच्या फर्निचर काम सुरु केले आहे.
वसई विरार महापालिकेच्या अभ्यासिकेत UPSC, MPSC, Engineering, CA, LAW, NEET, JEE, MBBS, SET, NET, LLM अशा विविध प्रकारच्या अभ्यासक्रमासाठी ३५० ते ४०० विद्यार्थी दैनंदिन येत असतात.

यापैकी अनेक विद्यार्थी वरील अभ्यासक्रमात यशस्वी झालेले आहेत. व त्यांचा सत्कारदेखील झालेला असून, त्यामुळे महापालिकेच्या लौकीकात भर पडली आहे. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या महापालिकेने निकाली काढल्याने विद्यार्थी वर्गाला अभ्यास करताना सोईचे होणार आलस्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.वसई विरार शहर महापालिकेने समस्या सोडवून दिलेल्या सुविधांबद्दल आभार व येणाऱ्या विद्यार्थ्यांना अशाच सुविधा अविरतपणे मिळाव्यात अशी अपेक्षा प्रशासनाकडून असल्याचे माजी महापौर नारायण मानकर यांनी सांगितले.
![]()
