यंग हँड्स हि संस्था सफाळ्यातील…
तरुणांनी सामाजिक बांधिलकीचा उद्देश ठेऊन स्थापन केली असून ह्या संस्थे मार्फत दुर्गम भागात आरोग्य शिबिर,रक्तदान शिबिर,जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती,गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते.
विरार :- संदीप पंडित
यंग हँड्स, सफाळे आणि ढवळे हॉस्पिटल पालघर ह्या संस्थामार्फत अलीकडेच सोनावे येथील दुर्गम आदिवासी पाड्यात आरोग्य शिबिर घेण्यात आले.
ह्या आरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टर्सकडून मधुमेह,रक्तदाब,हिमोग्लोबीन पातळी रक्त गट,नेत्र तपासणी अशा विविध चाचण्या विनाशुल्क घेऊन गरजू रुग्णांना मोफत औषध वाटप करण्यात आले.ह्या सुविधेचा सुमारे १७५ रुग्णांनी लाभ घेतला.
याप्रसंगी संस्थेमार्फत ९५ रुग्णांना आयुष्मान कार्ड व आभा कार्ड काढून देण्यात आली तर ८० रुग्णांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले.
यंग हँड्स हि संस्था सफाळ्यातील तरुणांनी सामाजिक बांधिलकीचा उद्देश ठेऊन स्थापन केली असून ह्या संस्थे मार्फत दुर्गम भागात आरोग्य शिबिर,रक्तदान शिबिर,जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती,गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते.
भविष्यात संस्थेमार्फत गरीब विद्यार्थ्यांसाठी व्यापक स्वरूपात शैक्षणिक मदत करण्याचा संस्थेचे उद्दिष्ट असल्याचे यंग हँड्सचे अध्यक्ष करण शाह यांनी सांगितले.
![]()
