
वसईच्या ग्रामीण भागातील खोचिवडे गावांत करोनाचा पहिला बळी ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा अडीच वर्षाच्या विश्रांती नंतर शिरकाव केलेल्या करोनाला पळवुन लावण्यासाठी वसईकरांनी आरोग्याच्या दृष्टीने खूप काळजी घ्यावी !
वसई :- आशिष राणे
सिंगापूर, थायलंड अशा विविध आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेल्या देशानंतर भारतात ही करोना व्यवस्थित हळूहळू आपले पाय रोवत असून आता मुंबई, ठाणे पाठोपाठ वसई विरार शहरात व आता वसईच्या ग्रामीण भागात ही करोनाचा शिरकाव झाला असून शुक्रवारी वसईच्या नायगाव खोचिवडे गावात राहणाऱ्या एका ४२ वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याची बाब समोर आली असून या व्यक्तीवर माहीम येथील रहेजा रुग्णालयात निमोनिया या आजारावर उपचार सुरू होते.
मुंबई-ठाणे नंतर आता वसई विरार भागात देखील करोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. मागील चार दिवसांपूर्वीच वसई विरार महापालिका आयुक्त प्रशासनाने करोनाच्या बाबतीत दक्षता म्हणून महापालिका आरोग्य विभाग सज्ज असल्याचे प्रसिद्ध पत्रकाद्वारे घोषित केले होते
त्या अनुषंगाने आता वसई विरार शहरात ही करोना रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका कार्यक्षेत्रातील एव्हर शाईन भागात एक रुग्ण आढळून आला होता. मात्र त्या रुग्णाची करोनाची सौम्य लक्षणे असल्याने त्यातून तो बरा झाला होता.
त्यापाठोपाठ आता वसई ग्रामीण मध्ये मोडणाऱ्या नायगाव खोचिवडे येथील एका ४२ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.
शुक्रवारी सकाळी तातडीने त्यास माहीम येथील रहेजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शुक्रवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दगावलेला रुग्ण वसईच्या ग्रामीण भागांतला !
वसई विरार मधील करोनाचा आजारामुळे पहिला रुग्ण दगावला आहे. हा रुग्ण वसई ग्रामीण मध्ये येत आहे.या रुग्णावर माहीम येथे उपचार सुरू होते. त्याची करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असल्याचे वसई तालुका वैद्यकीय अधिकारी ऋग्वेद दुधाट यांनी सांगितले आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातही विशेष लक्ष केंद्रित करून त्याठिकाणी उपाययोजना केल्या जाणार आहेत नागरिकांनी सुद्धा करोनाच्या संदर्भात कशीही लक्षणे आढळून आल्यास तातडीने करोना चाचणी करून घ्या असे ही आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
अडीच वर्षाने पुन्हा करोनाची पुनरावृत्ती ?
अचानकपणे अडीच वर्षाने पुन्हा एकदा करोना ने शिरकाव केला व बघता बघता एक बळी ही घेतला हे फार दुःखद व दुर्देवी असून वसईच्या नायगाव गावात या कुटुंबातील सदस्य वर आलेल्या या आघाताने व घटनेनंतर शोककळा जरी पसरली असली तरी तेवढीच गावांत खूप भीती ही पसरली आहे
![]()
