वसई-विरार शहराच्या सुनियोजित विकासांत वास्तुविशारद ( Architect ),अभियंते (engineer’s) यांची अभ्यासू भूमिका अत्यंत महत्त्वाची — महापौर अजीव पाटील
विरारच्या आई जीवदानी गडावर उभारली १५०० फूट उंचीची अद्भुत ‘ग्लास गॅलरी’ ; भक्तांना दिसणार सफाळे ते उत्तन परिसरातील अरबी समुद्राचं विहंगम दृश्य एकाच दृष्टिक्षेपात…
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.(भा.प्रा.से ) यांची नियुक्ती : पुणे शहराचे शिलेदार वसई विरार शहरात..
वसई पोलिसांनी काढलेला जमावबंदीचा आदेश मोडीत काढत वसईकर नागरिकांचा डीसीपी -झोन २ कार्यालयावर धडक मोर्चा
विरार मध्ये “शारदा हाईट्स” इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग ; 9 जणांची केली सुखरूप सुटका

विरार मध्ये स्लॅब कोसळून महिलेचा मृत्यू, ११ दिवसातील तिसरी दुर्घटना

एका इमारतीच्या घरातील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे.(file photo)

वसई : –
विरार शहरात एका इमारतीच्या घरातील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. अलफिया अब्बास मनासवाला (५४) असे या मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.
गुरूवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली आहे तर स्लॅब कोसळण्याची ही वसई विरार शहरातील मागील ११ दिवसांतील तिसरी घटना आहे. या तीन दुर्घटनेत आतापर्यंत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,विरार पश्चिमेच्या एमबी इस्टेट येथे मर्चेन अपार्टमेंट नावाची इमारत आहे. या इमारतीच्या सी विंग मधील दुसर्‍या मजल्यावरील ११ नंबरच्या सदनिकेत मध्ये मनासवाला कुटुंबिय राहतात. हुसेन मनासलावाला हे पत्नी आणि मुलांसह बेडरूममध्ये झोपले होते तर त्यांचे आई वडिल हॉलमध्ये झोपले होते. मध्यरात्री अचानक घरातील स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत त्यांची आई जखमी झाली. त्यांना उपचारासाठी विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी दुपारी उपचार सुरू असताना अलफिया मनासवाला यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

धक्कादायक : महापालिका क्षेत्रात ११ दिवसांत स्लॅब कोसळण्याच्या ३ घटना !

वसई विरार शहरात स्लॅब कोसळण्याची ही मागील ११ दिवसातील तिसरी घटना आहे. सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने जीर्ण झालेल्या व धोकादायक अवस्थेत असलेल्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्लॅब कोसळून झालेल्या आतापर्यंतच्या दुर्घटना!

१) २१ मे २०२५ नालासोपारा- आचोळे येथील सिमरन साई या ४ मजली इमारतीच्या ४०४ नं खोलीचा स्लॅब कोसळळा. या खोलीत अडलेल्या एका महिलेसह १४ वर्षीय मुलाची अग्निशमन दलाने सुटका केली होती

२) २६ मे २०२५ विरार- गोपचर पाडा येथील पूजा अपार्टमेंट ३३५ नं सदनिकेचा स्लॅब कोसळला होता. यात लक्ष्मी सिंग (२७) महिलेचा मृत्यू.

३) ३० मे २०२५विरार- एमबी इस्टेट येथील मर्चेन इमारतीमधील ११ नं खोलीचा स्लॅब कोसळून अलफिया अब्बास मनासवाला या महिलेचा मृत्यू झाला होता.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!