वसई-विरार शहराच्या सुनियोजित विकासांत वास्तुविशारद ( Architect ),अभियंते (engineer’s) यांची अभ्यासू भूमिका अत्यंत महत्त्वाची — महापौर अजीव पाटील
विरारच्या आई जीवदानी गडावर उभारली १५०० फूट उंचीची अद्भुत ‘ग्लास गॅलरी’ ; भक्तांना दिसणार सफाळे ते उत्तन परिसरातील अरबी समुद्राचं विहंगम दृश्य एकाच दृष्टिक्षेपात…
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.(भा.प्रा.से ) यांची नियुक्ती : पुणे शहराचे शिलेदार वसई विरार शहरात..
वसई पोलिसांनी काढलेला जमावबंदीचा आदेश मोडीत काढत वसईकर नागरिकांचा डीसीपी -झोन २ कार्यालयावर धडक मोर्चा
विरार मध्ये “शारदा हाईट्स” इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग ; 9 जणांची केली सुखरूप सुटका

वसई विरार शहराच्या महापौर – उपमहापौर पदी कोणाची वर्णी लागणार ? नावं गुलदस्यांत…. बविआ- भाजपाकडून नामनिर्देशन अर्ज दाखल

 

कसा असेल बविआचा महापौर-उपमहापौर…?? काय बोलले होते..हितेश आप्पा…! होय… कार्यकर्त्यांच्या मनातीलच असेल महापौर..

तर सर्वाना एकत्रित, संघटित करून सर्व धर्म सम भाव जपणारा त्या सर्वाना लोकशाही मार्गाने एकत्रित पुढे नेणारा किंबहुना जनतेला समजून घेत त्यांची कामें करणारा आमचा महापौर असेल— मा आम. हितेंद्र ठाकूर

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर व उप महापौर पदासाठी बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी यां दोन्ही पक्षाकडून ३० जानेवारी रोजी पालिका मुख्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. येत्या ३ फेब्रुवारी रोजी पिठासीन अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली हीं निवडणूक संपन्न होत आहें

वसई :- आशिष राणे✍️

वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक -२०२६ या पंचवार्षिक निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष शहराचा प्रथम व द्वितीय नागरिक म्हणून महापौर व उपमहापौर या दोन्ही ही महत्त्वाच्या पदांवर कोणाची वर्णी लागणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहें.

शुक्रवारी सकाळी बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज नगर सचिव विश्वनाथ तळेकर यांच्याकडे दाखल करण्यात आले.
वसई विरार महानगरपालिकेची तिसरी पंचवार्षिक निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची ठरली होती या महापालिका निवडणुकीत ११५ जागांपैकी बहुजन विकास आघाडीने ७१ जागा मिळवत एक हाती सत्ता मिळवली यात काँग्रेस ची १ जागा आहें.
तर भाजपा महायुती मिळून ४४ जागा निवडून आणल्या यामध्ये १ जागा शिवसेना (शिंदे गट) कडे आहें.


दरम्यान मागील आठवड्यात पालघर जिल्हाधिकारी तथा पिठासिन अधिकारी म्हणून डॉ इंदुराणी जाखड यांनी महापौर व उप महापौर निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला होता, त्यानुसार पालिका मुख्यालय विरार येथील सभागृहात दि.३ फेब्रुवारी रोजी दुपारी महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदासाठी ही निवडणूक होणार आहे.
या निवडणुकीसाठी ३० जानेवारीला उमेदवारी अर्ज विरार स्थित महानगरपालिकेच्या मुख्यालयात सादर करण्यात आले,

त्याप्रसंगी बहुजन विकास आघाडी पक्षाकडून महापौर पदासाठी अजीव पाटील आणि प्रफुल साने यांनी तर भाजपा कडून महापौर पदासाठी दर्शना त्रिपाठी व निशाद चोरघे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले

तसेच उपमहापौर पदासाठी बहुजन विकास आघाडीकडून मार्शल लोपीस आणि कन्हैया उर्फ बेटा भोईर तर भाजपा कडून नारायण मांजरेकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.


अर्थात बविआ व भाजपा या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याने महापौर व उप महापौर निवडीची ही चुरस अधिकच रंगली आहे

माजी आम. हितेंद्र ठाकूर यांची चुप्पी कायम : पुन्हा एकदा दणक्याच्या तयारीत

बहुजन विकास आघाडीने या निवडणुकीत एक हाती सत्ता मिळवली असली तरी महापौर व उपमहापौर पदासाठी पक्षातून अनेक नगरसेवक इच्छुक होते यामध्ये महापौर पदासाठी ७ तर उपमहापौर पदासाठी १० जणांनी पक्षश्रेष्ठीकडे आपली इच्छा व्यक्त करीत लेखी अर्ज दाखल केले होते.

त्यानंतर गुरुवारी विरार च्या विवा महाविद्यालयात झालेल्या पक्षाच्या महत्वाच्या बैठकीत महापौर पदासाठी अनुक्रमे २ तर उपमहापौर पदासाठी २ अशा केवळ ४ उमेदवारांच्याच नावावर शिक्कामोर्तब करून हे अर्ज ३० जानेवारी रोजी महापालिकेच्या मुख्यालयात नगरसचिवांकडे सादर करण्यात आल्याची माहिती माजी महापौर नारायण मानकर यांनी दिली.

त्यामुळे अंतिम क्षणी या दोन्ही पदांवर नेमकी कोणाची वर्णी लागणार हे गुपित सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी नेहमीसारखे कायम ठेवले असून या धक्का तंत्रांमध्ये आतापर्यंत माजी आम. ठाकूर यांचाच वरचष्मा राहिला आहें. त्यामुळे खरं चित्र महापौर आणि उपमहापौरपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार? कोण अर्ज मागे घेणार हे मात्र कळण्यासाठी ३ फेब्रुवारीची वाट बघावी लागणार आहें.

काय म्हणाले होते माजी आमदार हितेंद्र ठाकूर कीं, महापौर आणि उपमहापौराचा चेहरा कोण आणि कसा असेल ?

सर्वांना लोकशाही मार्गाने एकत्रित पुढे नेणारा आणि सर्वांना एकत्रित करून जो जनतेची कामे करणारे आमचे दोन्हीही महापौर आणि उपमहापौर असतील असे मागील वेळीच माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले असलं तरी आता वेळ प्रत्यक्षात निवडीची आली आहें आणि आता बविआ चा महापौर व उपमहापौर निवडीच्या संदर्भामध्ये बबिआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली की

महापौर आणि उपमहापौर ठरवताना एकच निकष डोळ्यासमोर ठेवला जाणार आहे यात आमचा महापौर व उपमहापौर सर्व जाती धर्म व पंथांच्या लोकांना लोकशाही मार्गाने एकत्रितपणे संघटित कौशल्याने पुढे नेणारा आणि नगरसेवकांची कार्यकर्त्यांची तसेच ज्या उमेदवारांना या निवडणुकीत अपयश आले आहें अशा हीं सर्वांची कामे करणारा त्यांना समजून घेणारा असा हा आमचा महापौर आणि उपमहापौर असेल असेही हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.

तरीही आम्ही बविआ पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी आदी मंडळी एकत्रित बसून या निवडणुकीत या शहराचा प्रत्यक्ष महापौर आणि उपमहापौर पदाचे नेमके उमेदवार ठरवू आणि तसें अर्ज पालिकेत सादर करू असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले

 

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!