“पालघर जिल्ह्यातील सूर्या धरणात वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा तर वसई तालुक्यातील उसगाव धरणांत ३७ दिवस आणि पेल्हार धरणामध्ये केवळ ४४ दिवसांचा पाणीसाठा शिल्लक” !
वसई :- आशिष राणे,वसई
वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील सुर्या धामणी धरणांत वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा जरी आज असला तरी मात्र वसई तालुक्यातील उसगाव (३७ दिवस ) व पेल्हार (४४ दिवस ) या दोन धरणांमधील पाणीसाठा मे महिन्याच्या शेवटी आता जेमतेम काही दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा त्यात शिल्लक आहे
तर पालघर जिल्ह्यातील सूर्या धामणी या मुख्य धरणातील पाणीसाठा हा मात्र मुबलक असल्याने तो बऱ्यापैकी वर्षभर पुरेल त्यामुळे सध्या तरी वसई विरारच्या नागरिकांना पाण्याचं अजिबात नो टेन्शन असल्याचे पाणीपुरवठ्याच्या आकडेवारीवरून दिसते आहे.
दरम्यान पालघर मधील सुर्या धामणी धरणांत आता ३४.५३ टक्के व वर्षभर पुरेल इतका पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती वसई विरार पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे
वसई-विरार शहराला सुर्या धामणी प्रकल्पातुन १०० एमएलडी, सूर्या टप्पा -३ मधून १०० एम एल डी तसेच वसई तालुक्यातील उसगाव धरण २० एम एल डी व पेल्हार धरणातून १० एम एल डी म्हणजेच वसई विरार शहराला एकूण २३० एम एल डी पाणी हे प्रतिदिन मिळत आहे.
परंतु आता कडक उन्हाळा व त्यात अवकाळी संपून आता जून महिना उगवत असून पाण्याची मागणी वाढली तर आहेच मात्र त्यामुळे पाण्याची पातळी देखील खालावत चालली आहे
किंबहुना यावेळी एप्रिल व मे महिन्यात अवकाळी पावसामुळे थोडा फार दिलासा मिळाला असला तरी शेती व अन्य मालमत्ताचे खूपच नुकसान झाले,त्यात धरण व जंगल पट्टी भागात महावितरण कं. चा विजेचा लपंडाव देखील सुरूच असतो अर्थातच याचा विपरीत परिणाम शहरांतील व ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावर नेहमीच होत आहे.
अवकाळी पावसाचा जिल्ह्यात धुमाकूळ आणि नुकसान ?
दुसरीकडे एप्रिल मे महिना उगवला की पाणी संकट उभे राहतेच त्यात यंदा दोन्ही ही महिन्यात अवकाळी पावसामुळे एप्रिल व मे महिन्यात कशीबशी वसईकरांची तहान काही अंशी भागवली आहे
म्हणजे मुळातच पाणीकपातीचे दिवस असतात व त्यात येथील दोन्ही ही धरणात पाणीसाठा अतिशय कमी आहे .
मात्र सूर्या धामणी येथील धरणांतील पाणीसाठ्याचा विचार केला तर वर्षे भर जरी पाणी पुरेल इतका साठा असला तरी आता महापालिका प्रशासन पाणीकपाती बाबतीत गंभीर आहे का ? अथवा आकडेवारी पाहून विचार करून कपात होणार की नाही हे मात्र पाणीपुरवठा विभागाने अद्यप स्पष्ट केले नसले तरीही पालिकेला जून महिन्यात धरणक्षेत्रात पाऊस पडेपर्यंत अगदी काटेकोरपणे पाण्याचे नियोजन करावे लागणार हे मात्र नक्की आहेच !

फिरते पथक वसई विरार शहरात फिरवण्याची मागणी !
फिरते पथक वसई विरार शहरात फिरवण्याची मागणी महापालिकेने धरणातील पाण्याच्या पातळीचे निरीक्षण करून आणि शहरात होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी अभ्यासपूर्ण नियोजन करणे आवश्यक आहे.
अन्यथा प्रतिदिन लाखो लिटर पाणी वाया ही जाईल व जाते देखील तरीही महापालिकेने बेकायदा व गळती प्रतिबंधक नियंत्रण पथके कारवाईसाठी लागलीच तयार करून ती शहरी व ग्रामीण भागात फिरती ठेवली पाहिजेत अशी मागणी नागरिक सातत्याने करीत आहेत
तर वसई-विरारमध्ये पाणीकपात होणार का ? याबाबत महापालिका आयुक्त तसेच पाणीपुरवठा शहर अभियंता यांना संपर्क केला मात्र तो होऊ शकला नाही
२६ मे २०२५ पर्यंतच्या तिन्ही धरणांतील शिल्लक आकडेवारीनुसार पाणीसाठा !
सूर्या धामणी धरणात २७६.३५ घन मीटर दशलक्ष लिटर एकूण पाणीसाठा क्षमते पैकी ९५.४२३ घनमीटर म्हणजेच ३४.५३ टक्के पाणी साठा आहे जो वर्षभर पुरेल इतका आहे
वसईच्या उसगाव मध्ये ४.९६ घनमीटर ३ दशलक्ष लिटर क्षमते पैकी १.१०५ ३.१९६ म्हणजे २२.२३ टक्के पाणीसाठा जो फक्त ३७ दिवस शिल्लक आहे
आणि पेल्हार धरणात ३.५६ दशलक्ष घनमीटर क्षमते पैकी ०.९०७ म्हणजे केवळ २५.४८ टक्के पाणी साठा हा केवळ ४४ दिवस पुरेल इतका शिल्लक असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अभियंतानी स्पष्ट केले
![]()
