वसई तहसीलदार कार्यालयातील महसूल अधिकारी नितीन थिटे यांचे निधन : अखेर वेदनांची झाली समाप्ती…!

एका मनमिळाऊ महसूल अधिकाऱ्याच्या वेदनांची झाली अखेर….समाप्ती..!


आजाराने मृत्यू आलेल्या व्यक्तीच्या दुःखाला शब्दांत मांडणारी ही एक भावूक कविता आहे. यात आजाराशी दिलेली झुंज आणि अखेर मिळालेली मुक्ती…!  यांचे वर्णन आहे.

आणि त्या…वेदनांची झाली समाप्ती..!


त्या शांत डोळ्यांत आता, कसलीच उरली नाही भीती, अनेक दिवसांच्या आजारातून, आज मिळाली त्याला मुक्ती….
लढला तो शर्थीने, वेदनेच्या प्रत्येक कठीण क्षणांशी,पण नियतीचा खेळ होता वेगळा,
शेवटी गाठ पडली मृत्यूशी…शरीर थकले होते आता, वेदनांचे ओझे वाहून,… तो पवित्र आत्मा मात्र निघून गेला,

त्या देहाची सीमा तोडून.औषधांचा तो कडू डोस, आणि सुयांचे टोचणे आता बंद, झाले होते…

सुटले सर्व आजार त्याचे, निजला तो आता शांत आणि निर्द्वंद्व.
आठवतील फक्त आता, त्याच्या महसूलातील चांगुलपणाच्या गोष्टी,

त्याच्या आत्म्याला मिळो शांती, हीच देवाला प्रार्थना आमची…
दुःखाचा हा डोंगर फार मोठा, कसा सांगावा मनाला..

पण आता तो…. मुक्त झाला आहे,… त्या नकोशा वाटणाऱ्या आजाराला…!

वसई :- आशिष राणे✍️

वसईच्या महसूल विभागात कार्यरत एक अभ्यासू आणि मनमिळाऊ व्यतिमत्व असलेल्या महसूल अधिकारी नितीन थिटे (३४) यांचे बुधवारी मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पालघर आणि वसई महसूल वर्तुळात आणि तें वास्तव्य करत असलेल्या पापडी परिसरात मोठी पोकळी निर्माण झाली तसेच त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मागील तीन वर्षे पासून नितीन भाऊसाहेब हे वसई तहसीलदार कार्यालयात सेवा देत होते, तर वसईत येण्यापूर्वी तें पालघर येथे कार्यरत होते.

सुरुवातीला दोन वर्षे त्यांनी पुरवठा विभागात काम केलं तर मागील वर्षीचं तें महसूल विभागात बदली होऊन आले होते,

Adv

मात्र काळाचा महिमा बघा, अत्यंत लहान वयात आपली नोकरी सांभाळून आपला संसाराचा गाडा पुढे नेताना अचानक नितीन भाऊसाहेब यांना एका जर्जर आजाराने ग्रासलं आणि वैद्यकीय उपचारासाठी त्यांना वारंवार रुग्णालय गाठावे लागले,

दरम्यान मागील दोन महिन्यापासून तें मुंबईतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते, मंगळवारी त्यांची प्रकृती बिघडली आणि बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

एक सर्वसामान्य, मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख राहिली आहे, नितीन भाऊसाहेब यांच्या कुटूंबात आता त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी व दोन लहान मुले आहेत,


Adv

मागील पाच दिवस झाले संबंध पालघर जिल्ह्यात खास करुन वसई विरार मध्ये जोरदार मुसळधार पाऊस पडत होता,त्यातच वीज नाही, सर्वत्र पाणीचं पाणी, लोकल सेवा ठप्प, इंटरनेट, मोबाईल सेवा बंद,रस्ते बंद सर्वत्र बकाल व बेहाल परिस्थिती होती, त्यामुळे त्यांच्या निधनाचं वृत्त सर्वत्र समजून देखील अंत्यसंस्कारासाठी पालघर आणि वसई महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी असतील किंवा अन्य नातेवाईक यांना त्यांच्या निवासस्थानी वेळेवर पोहचणे खूप कठीण झाल्याचे वरिष्ठ महसूल अधिकारी यांनी सांगितले

या संदर्भात वसई तहसीलदार कार्यालयातील त्यांच्या सेवा काळातील अधिकारी- कर्मचारी वर्गास संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नितीन भाऊ यांच्या जाण्यावर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे,

Adv

कामसू वृत्ती, नेहमीच सक्रिय असलेल्या नितीन भाऊसाहेबाच्या आठवणी स्मृतीसुंगंधा सारख्या नेहमीच आमच्या सर्वांच्या मनांत जिवंत राहतील हीच त्यांना वसई महसूल विभागाची भावपूर्ण श्रद्धांजली असेल आणि त्यांच्या संपूर्ण कुटूंबास हे दुःख सहन करण्यासाठी शक्ती दे अशा भावुक प्रतिक्रिया त्यांच्या सहकाऱ्यांनी नोंदवल्या आहेत.

🙏🙏नितीनभाऊच्या या आतापर्यंतच्या सेवाकाळाला व पवित्र आत्म्यास मायमराठी7टीम ची भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

✅⚠️महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal वर संपर्क साधा !

Mymarathi7.com

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!