श्रमजीवी संघटनेने वेठबिगारीतून मुक्त केलेल्या ७७ वर्षीय जयराम वळवींचा आणखी एक संघर्ष ठरला यशस्वी..!

 

दोन वर्षे आधार कार्डासाठी चकरा ; ठिय्याच्या निर्धारानंतर काही तासांत आधार कार्ड सक्रिय…! “लढल्याशिवाय हक्क मिळत नाही”

जयराम वळवी यांची ही कहाणी केवळ एका आधार कार्डाची नाही. कधीकाळी वेठबिगारीतून मुक्त झालेल्या एका आदिवासी माणसाला वयाच्या ७७ व्या वर्षीदेखील आपल्या साध्या प्रशासकीय हक्कासाठी दोन वर्षे संघर्ष करावा लागतो, ही व्यवस्थेसाठी गंभीर बाब आहे.
दोन वर्षांच्या चकरांनंतर जे काम झाले नाही, ते जयराम वळवी यांनी ठाम भूमिका घेतल्यानंतर काही तासांत झाले. त्यामुळे “लढल्याशिवाय काम होत नाही आणि आपल्या हक्कासाठी ठामपणे उभे राहिल्याशिवाय न्याय मिळत नाही,” हा संदेश या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

वसई :- आशिष राणे, ✍️

कधीकाळी वेठबिगारीच्या जोखडात अडकलेले आणि श्रमजीवी संघटनेच्या संघर्षातून मुक्त झालेले ७७ वर्षीय आदिवासी जयराम वळवी यांनी पुन्हा एकदा आपल्या हक्कासाठी संघर्ष केला. गेली दोन वर्षे आधार कार्ड सक्रिय करण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही काम होत नसल्याने अखेर त्यांनी हातात राजदंड घेत आपल्या दोन मुलांसह तहसील कार्यालय गाठले. “आधार कार्ड सक्रिय झाल्याशिवाय येथून उठणार नाही,” असा निर्धार केल्यानंतर प्रशासनाची यंत्रणा हलली आणि आज सकाळी दहा वाजण्याच्या आत त्यांचे आधार कार्ड सक्रिय झाले.


Adv✅☝️वसई तालुक्यातील मेढे येथील जयराम वळवी यांचे आधार कार्ड गेल्या दोन वर्षांपासून स्वीकारले जात नव्हते. यासाठी त्यांनी तहसील कार्यालयापासून पालघर जिल्हा कार्यालयापर्यंत वारंवार चकरा मारल्या. मात्र त्यांच्या समस्येचे निराकरण होत नव्हते.
अखेर सोमवारी ७७ वर्षीय जयराम वळवी यांनी आपल्या दोन मुलांना सोबत घेतले आणि हातात राजदंड घेऊन तहसील कार्यालय गाठले. काम झाल्याशिवाय कार्यालयातून परत जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.

वसई तहसीलदार दिपक गायकवाड यांची तत्परता…!

यानंतर त्यांच्या आधार कार्डाचा प्रश्न सोडविण्यासाठी वसईचे तहसीलदार दीपक गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले. दीपक गायकवाड यांनी राज्यस्तरीय आधार यंत्रणेशी संपर्क साधून प्रकरणाचा पाठपुरावा केला. प्रशासनाच्या समन्वयातून मंगळवार दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या आत जयराम वळवी यांचे आधार कार्ड अखेर सक्रिय करण्यात आले.

 

Adv✅☝️“लढल्याशिवाय हक्क मिळत नाही”हेच सत्य…..! 


जयराम वळवी यांची ही कहाणी केवळ एका आधार कार्डाची नाही. कधीकाळी वेठबिगारीतून मुक्त झालेल्या एका आदिवासी माणसाला वयाच्या ७७ व्या वर्षीदेखील आपल्या साध्या प्रशासकीय हक्कासाठी दोन वर्षे संघर्ष करावा लागतो, ही व्यवस्थेसाठी गंभीर बाब आहे.

दोन वर्षांच्या चकरांनंतर जे काम झाले नाही, ते जयराम वळवी यांनी ठाम भूमिका घेतल्यानंतर काही तासांत झाले. त्यामुळे “लढल्याशिवाय काम होत नाही आणि आपल्या हक्कासाठी ठामपणे उभे राहिल्याशिवाय न्याय मिळत नाही,” हा संदेश या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाला आहे.

श्रमजीवी संघटनेचे कैवारी विवेक भाऊं कडून तहसीलदारांचे आभार….!

दरम्यान, जयराम वळवी यांचे आधार कार्ड सक्रिय करण्यासाठी राज्यस्तरीय यंत्रणेशी संपर्क साधून विशेष प्रयत्न केल्याबद्दल आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी वसईचे तहसीलदार दीपक गायकवाड यांचे आभार मानले.

वेठबिगारीविरुद्धच्या लढ्यातून मुक्त झालेला जयराम आज वयाच्या ७७ व्या वर्षीही आपल्या हक्कासाठी लढतो आहे. त्याचा संघर्ष एकच सांगतो — हक्क कुणी सहज देत नसेल, तर लोकशाही आणि अहिंसक मार्गाने त्यासाठी लढावे लागते अशी प्रतिकिया वजा माहिती श्रमजीवी च्या प्रवक्ता चंद्राताई जाधव यांनी दिली.

Adv☝️✅⚠️महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal : @Mymarathi7.कॉम वर संपर्क साधावा.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!