जास्तीच वीज बिल कमी करुन देण्याचं दाखवलं
होतं आमिष : पालघर लाचलूचपत विभागाच्या पथकाची धडक कारवाई
विनाश काली विपरीत बुद्धी….??
महाजन यांच्या विरोधात लाच स्वीकारल्याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे
तर विशेष बाब अशी की, प्रदीप ला ही नोकरीं त्याच्या वडिलांच्या जागी मिळाली होती असे ही समजते आहे.
पालघर :- विशेष प्रतिनिधी…✍️🚔
पालघरच्या महावितरण विभागातील वायरमन याला आठ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे. प्रदीप सुभाष महाजन (38,रा. उमरोळी) असे या वायरमनचे नाव आहे.
वीज ग्राहकाला जास्तीचे येणारे बिल कमी करण्यासाठी ही लाच महाजन याने स्वीकारली आहे. पालघर तालुक्यातील खारेकुरण दांडी पाडा येथे राहणारे एक वीज ग्राहक यांनी बिल जास्त येत असल्या प्रकरणी तक्रार केली होती.

मात्र तक्रार सोडविण्या ऐवजी जास्तीचे बिल सेटल करून देतो, त्या बदल्यात तुम्ही मला आठ हजार रुपये द्या,असे महाजन यांनी या वीज ग्राहकाला सांगितले होते. लाच मागितल्यानंतर वीज ग्राहकाने तशी तक्रार पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे बुधवारी केली होती.
लाचलूचपात विभागाच्या पथकाने या तक्रारीची शहानिशा किंबहुना पडताळणी केली असता वायरमन महाजन याने वीज ग्राहकाकडून लाच मागितल्याचे तथ्य आढळल.

दरम्यान गुरुवारी खारेकुरण येथील मिठागर रोड परिसरात लाच लुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला आणि वायरमन महाजन याने तक्रारदार वीज ग्राहकाकडून आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताचं या पथकाने त्याला रंगेहात पकडले.
महाजन यांच्या विरोधात लाच स्वीकारल्याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे
तर विशेष बाब अशी की, प्रदीप ला ही नोकरीं त्याच्या वडिलांच्या जागी मिळाली होती असे ही समजते आहे.

सदरची ही कारवाई पोलीस उपअधीक्षक दादा राम करांडे यांच्या नेतृत्वातील राकेश डांगे विलास भोई जितेंद्र गवळी गवळी प्रकाश दळवी आकाश लोहारे यांच्या पथकाने केली आहे.
——————————————————————-✅⚠️महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal वर संपर्क साधा !
Www.Mymarathi7.com
———————————————————————-
![]()
