वसई-विरार शहरातील त्या ९५ पुनर्विकास प्रकल्पांची सुनावणी पूर्ण : आता लक्ष UD च्या निर्णयाकडे ..!

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या त्या ८० हुन अधिक साधारण ९५ पुनर्विकास प्रकल्पांच्या वाढीव अतिरिक्त चटई क्षेत्राच्या संदर्भातले “जैसे थे” प्रकरणे… उत्सुकता अजूनही लागूनच..?

मागील महिना भर झाले वसई विरार शहरातील त्या पुनर्विकास प्रकल्पा संदर्भातले वृत्त सर्वदूर पसरले असून याबाबत अदयाप ही महापालिका आयुक्त यांनी आपली चुप्पी कायम ठेवली आहे

किंबहुना त्यामुळे शहरात कुठे योग्य तर सर्वाधिक ठिकाणी चुकीचं वृत्त पसरले जातं आहे खास करुन पुनर्विकास योजना किंवा त्याच्या उंबरठ्यावर असलेल्या गृहनिर्माण संस्था सदस्यांमध्ये उलट सुलट चर्चेला उधाण आलं आहे, याबाबत पालिका प्रशासन असो की सत्ताधारी पक्ष व  विरोधी बाकावर बसलेले केंद्र व राज्यांतील सत्ताधारी पक्षांचे नेतृत्व देखील फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने नेमकं आता या प्रकरणाचा तिढा कसा काय सुटेल ही चिंता आता वसईकरांना लागली आहे.

 

या संदर्भात आपण नुकतेच वसई विरार शहरातील पुनर्विकासाचे ९५ हुन अधिक गृहनिर्माण प्रकल्प “जैसे थे ” असे दणकेबाज वृत्त दै. सागर मध्ये 12 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलं होतं…त्याचाच पुढील पाठपुरावा म्हणून हे डिजिटल वृत्त आहे..

वसई :- आशिष राणे✍️

वसई-विरार शहर महानगरपालिकेने (VVCMC) स्थगिती दिलेल्या त्या ९५ पुनर्विकास प्रकल्पांच्या विकासकांसाठीची सुनावणी पूर्ण झाली  असल्याचे वृत्त असून या संदर्भात वसईतील काही विकासकांनी आपली बाजू मांडण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला आहे.

विशेष म्हणजे या सुनावणी दरम्यान, विकासकांनी असा दावा केला आहे की त्यांची बांधकामे अनधिकृत नव्हती आणि ती
महानगरपालिकेने दिलेल्या परवानगीनुसारच करण्यात आली होती.

अधिक माहितीनुसार, सन २०२३ मध्ये, तत्कालीन आयुक्त अनिलकुमार पवार आणि तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांनी ‘युनिफाइड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्स’ (UDCPR) मधील तरतुदींचा हवाला देत, पुनर्विकास प्रकल्पांमधील भाडेकरूंसाठी अतिरिक्त एफएसआय (FSI) वापरण्याची परवानगी विकासकांना दिली होती.

मात्र, पदभार स्वीकारल्यानंतर महापलिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी ‘ऑक्युपन्सी सर्टिफिकेट’ (OC) देणे आणि अतिरिक्त बांधकाम थांबवले; त्यांचे म्हणणे असे होते की, १५ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या भाडेकरूंसाठीची एफएसआय तरतूद या प्रकल्पांना लागू होत नाही.आणि तिथेच माशी शिंकली.

 

त्यामुळे ज्यांनी ज्यांनी या नियमांचे उल्लंघन केले त्या विकासकांना व त्याच्या वास्तुविशारदांना नोटिसा बजावण्यात आल्या, त्यापैकी  ८८ जणांनी आतापर्यंत आपली बाजू सुनावणी वेळी मांडली आहे,

तर काहींनी अधिक वेळ मागितला आहे. “तत्कालीन आयुक्तांनी आम्हाला बांधकामाची परवानगी दिली होती आणि आम्ही त्यानुसारचं काम केले. केवळ आयुक्त बदलले म्हणून नियम बदलतील का?” असा  स्पष्ट व बोलका सवाल विकासक गंगाराम मुकुंद यांनी केला. “आम्ही बँकेकडून कर्ज घेऊन या प्रकल्पात गुंतवणूक केली आहे

आणि गेल्या सात -आठ महिन्यांपासून ओसीची (OC) वाट पाहत आहोत. ग्राहक आता घरांचा ताबा देण्याबाबत आम्हाला वारंवार विचारणा करत आहेत,” असे विकासक हितेश जैन यांनी सांगितले.

विकासक जैन यांनी असे ही सांगितले की, महापालिकेच्या या निर्णयाचा फटका केवळ त्यांनाच नाही, तर या प्रकल्पांमध्ये आपली बचत गुंतवणाऱ्या शेकडो सर्व सामान्य घरखरेदीदारांनाही बसला आहे.

या दीर्घ विलंबामुळे अनेक घरखरेदीदार घराच्या ताब्याची वाट पाहत आहेत. “जर प्रकल्पांवरील स्थगिती उठवली नाही, तर आम्ही न्यायालयात दाद मागू,” असे विकासकांचे वकील निमेश वसा यांनी सांगितले. अतिरिक्त बांधकामाला परवानगी देण्यासाठी महापालिका आयुक्त आपल्या विशेष अधिकारांचा वापर करू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

नगररचना विभागाकडून समजलेल्या माहितीनुसार , ज्या विकासकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, त्यापैकी साधारण ८८ जणांची सुनावणी पूर्ण झाली आहे. “आम्ही ओसी (OC) देण्याबाबत राज्य सरकारचे मत मागवले आहे, परंतु अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. हा प्रश्न लवकरच सोडवला जाईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या संदर्भात वसईतील सुप्रसिद्ध एका जेष्ठ वास्तूविशारद (आर्किटेक) यांनी सांगितले की, वाढीव अतिरिक्त चटई क्षेत्र अर्थात या प्रकरणाचा तिढा लवकरच सुटणे आवश्यक आहे, ठाणे मनपा, मीरा भाईंदर या ठिकाणी हा विषय सुटण्यास मदत झाली आहे त्यामुळे  पालिका प्रशासनाने नगरविकास खाते यांच्याकडून योग्य पाठपुरावा केल्यास यातून सकांरात्मक निर्णय होउ शकेल फक्त इच्छा असायला हवी अन्यथा जास्त ताणायला गेलो तर हा तुटेल बस्स…बाकी जास्त बोलणार नाही.. मात्र होईल…

——————————————————————-✅⚠️महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal वर संपर्क साधा !

Mymarathi7.com

 

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!