वसई-विरार शहराच्या सुनियोजित विकासांत वास्तुविशारद ( Architect ),अभियंते (engineer’s) यांची अभ्यासू भूमिका अत्यंत महत्त्वाची — महापौर अजीव पाटील
विरारच्या आई जीवदानी गडावर उभारली १५०० फूट उंचीची अद्भुत ‘ग्लास गॅलरी’ ; भक्तांना दिसणार सफाळे ते उत्तन परिसरातील अरबी समुद्राचं विहंगम दृश्य एकाच दृष्टिक्षेपात…
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.(भा.प्रा.से ) यांची नियुक्ती : पुणे शहराचे शिलेदार वसई विरार शहरात..
वसई पोलिसांनी काढलेला जमावबंदीचा आदेश मोडीत काढत वसईकर नागरिकांचा डीसीपी -झोन २ कार्यालयावर धडक मोर्चा
विरार मध्ये “शारदा हाईट्स” इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग ; 9 जणांची केली सुखरूप सुटका

मोठी बातमी : वसईच्या सनसिटीत सूर्या योजनेची जलवहिनी फुटली : नवघर माणिकपूर विभागांस फटका

 

एच प्रभागात आज घागर उताणी… आहें

वसईत एच प्रभाग अंतर्गत सनसिटी भागात नवीन टाकीच्या पायलिंगचं काम सुरु असताना शनिवार दि.२७ डिसेंबर रोजी दुपारी अचानक सूर्याची जलवाहिनी (लिकेज ) फुटल्यानं ऐन निवडणूकिची आणि नाताळ सणाची सर्वत्र धूम असताना शहरातील नागरिकांची घागर काहीं काळ उतांणी राहिली… त्यामुळे पाणी जपून वापरा.. आम्ही आपणास पाणीपुरवठा सुरळीत झालाय कीं होणार आहें असा  update देऊच…

Adv

वसई :- आशिष राणे

वसई रोड पश्चिम भागातील सनसिटीत वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत सूर्या योजनेची जलवहिनी शनिवारी दुपारच्या सुमारास नवीन टाकीच्या पायलिंगचं काम सुरु असताना अचानक (लिकेज ) फुटल्यानं ऐन निवडणूकिची आणि नाताळ सणाची सर्वत्र धूम असताना शहरातील नागरिकांची घागर काहीं काळ उतांणी राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहें
त्यामुळे महापालिकेच्या (एच प्रभाग ) मोडणाऱ्या नवघर माणिकपूर विभागांस याचा मोठा फटका बसला आहें.

पाणीपुरवठा विभागाने माहिती दिल्यानुसार वसई विरार शहर महापालिकेच्या प्रभाग समिती “एच” नवघर मणिकपूर विभागास पाणी पुरवठा करणारी ६०० मि.मी व्यासाची सूर्या योजनेची जलवाहिनी शनिवार दि.२७ डिसेंबर रोजी दु.१.३० वाजता सनसिटी भागात नवीन टाकीचे पायलिंगचे काम चालू असताना नादुरुस्त (लिकेज) झाली.

दरम्यान पाणीपुरवठा विभागाने तात्काळ त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु केलं आहे, किंबहुना यां दुरुस्तीच्या कामास अंदाजे पाच ते सहा तास लागतील असे स्पष्ट केलं होत.

Adv

मात्र अजूनही हे काम सुरु असल्याचे समजते अर्थात या दुरुस्तीच्या काळात काही काळ नवघर मणिकपूर विभागास होणारा पाणीपुरवठा पूर्ण बंद राहील असे हीं सांगितले आहें.

एकूणच या दुरुस्ती नंतर टप्प्याटप्प्याने “एच” प्रभागातील विविध विभागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे हीं पाणीपुरवठा विभाग नियंत्रकांनी सांगितले,

परिणामी एच प्रभाग अंतर्गत शहरातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी व पालिकेला सहकार्य करावे तसेच शहरात दुपारनंतर होणारा पाणीपुरवठा अनियमित आणि कमी प्रमाणात होणार असल्याचे हीं महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सांगितले.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!