महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरण अध्यक्षपदी आ.प्रवीण दरेकर यांची वर्णी : मिळाला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा

 

हे तर मुख्यमंत्री फडवणीस यांचे दरेकरांना बक्षीस…
दरेकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली : राज्य शासनाची
अत्यंत जबाबदार व महत्वाकांक्षी योजना…!
राज्यातील स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आ. प्रवीण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वसई/मुंबई :- आशिष राणे
राज्यातील स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आ. प्रवीण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला असून याबाबतचा शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला आहे.

सन २०१९ मध्ये राज्य शासनाने स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना विविध सवलती दिल्या. मात्र, त्यांची अंमलबजावणी झाली नव्हती.
किंबहुना सुरुवातीला त्यावेळी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या परिषदांच्या मागण्यांवर उपाययोजना शोधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम.दरेकरांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र अभ्यासगट स्थापन केला.

अर्थात या अभ्यासगटाने शासनाला प्राधिकरण स्थापन करण्याची शिफारस देखील केली होती. त्यानुसारच अखेर उशिरा कां होईना मात्र ही नियुक्ती आता करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल आम.दरेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

राज्यातील विशेषतः मुंबई उपनगरे, पुणे, नाशिक व नवी मुंबईतील स्वयंपुनर्विकासाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. प्राधिकरणामुळे येथे सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळवून देणे शक्य होणार आहे. शासनाने मोठी जबाबदारी दिली असून, स्वयंपुनर्विकास क्षेत्रात मोठे काम झाल्याचे आगामी काळात दिसून येईल, असे ही त्यांनी सांगितले.

 

प्राधिकरण अध्यक्ष आ. दरेकर यांची नियुक्ती पुढील शासन आदेश होईपर्यंत करण्यात येत आहे. मंत्रीपदाच्या दर्जासाठी देण्यात येणारे भत्ते व सुविधा तसेच त्यांच्या कार्यालयासाठी जागा, आवश्यक कर्मचाऱ्यांची नेमणूक, त्यांचे भत्ते हे म्हाडा प्राधिकरणातर्फे देण्यात यावे, असे ही शासन निर्णयात म्हटले आहे.

काय आहे नेमका शासन आदेश…

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!