बहुजनांच्या उद्धारासाठी बविआ पक्ष व त्यांचे सर्वेसर्वा लोकनेते मा.आम.हितेंद्र ठाकूर उर्फ आप्पा यांनी वसई-विरार मध्ये आतापर्यंत उभा केलेला विकासाचा डोंगर निश्चितच कौतुकास्पद आहे.
दरवर्षी असो अथवा आज ही दि 3 ऑक्टोबर 2025 रोजी आप्पांचा 64 वा वाढदिवस विरार मध्ये खूप थाटामाटात व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या स्वरूपात सामजिक,शैक्षणिक, धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे उपक्रम राबवित साजरा केला जातोय
अर्थातच सर्वांना सोबत घेऊन सर्वधर्मसमभाव जपणारा आणि केवळ आणि केवळ वसई- विरारच्या विकासाचा ध्यास अंगी बाळगणारा एक लढवय्या व सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या या लोकनेत्याच्या विविध पैलूंचा घेतलेला हा वेध !

आशिष राणे,वसई
सगळ्यांची जबाबदारी आम्ही घेतो आणि थांबत असताना एकच सांगतो : “वसईचा आमदार मी”च…!..फक्त ऐका…(प्रचंड व्हायरल )
मागील 40 वर्षे वसई तालुक्यातील जनतेवर आरूढ होऊन त्यांचे प्रेम मिळणे ही गोष्ट हल्लीच्या राजकारणात फारच कमी पाहायला मिळते तर दल बदलाच्या गर्तेत किती नेते आले व रसातळाला गेले मात्र आज अशा नावाचा उल्लेख दिसत नाही मात्र
इथे लोकनेते मा.आम.हितेंद्र ठाकूर हे एक वेगळंच रसायन असून अवघ्या 24 व्या वर्षी लोकसेवेचे व्रत घेऊन ते गेली 40 वर्षे विरार शहरात राहून ते अव्यहतपणे त्याचे समाजकार्य आजही त्यांच्या सहकाऱ्यांच्या साथीने सुरू आहे.

आज हितेश आप्पा आपल्या 64 व्या वयातही त्यांचा तरुणाईला ही लाजवेल असा उत्साह पाहिला तर जाणवते की वसई-विरारच्या विकासाचे उर्वरित स्वप्न त्यांच्या दृष्टीने अजूनही पूर्ण व्हायचे आहे
अर्थातच त्यांच्या या संपूर्ण यशाचे सर्व श्रेय ते बहुजन विकास आघाडीच्या तमाम कार्यकर्त्यांना देतात किंबहुना ते असे ही म्हणतात की,जर माझा पराभव कुणी करू शकेल तर तो विरोधक नाही तर तो माझा कार्यकर्ता असेल, त्यामुळे माझा कार्यकर्ता हीच माझी खरी ताकद असल्याचे ते अभिमानाने छातीठोकपणे सांगतात असे जरी असले तरी गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा निसटतां पराभव झाला आणि तो मोठ्या मनाने त्यांनी मान्य ही केला.

किंबहुना त्यांचं काम आजही त्याच हिरहीरीने सुरूच आहे
बविआ पक्षाचा आज पालघर जिल्ह्यात एकही आमदार खासदार नाही मात्र मागील वर्षी 2024 पर्यंत म्हणजे यापूर्वी बोईसर, नालासोपारा व वसई असे तीन आमदार एक माजी खासदार व स्वतः पाच वेळा आमदार व शेकडो विविध सामाजिक संस्था,सहकारी बँका, त्यात तालुक्यातील ग्रामपंचायती, जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि नगरपरिषद ,नगरपालिका आणि सन 2009 ला स्थापन झालेली वसई विरार शहर महानगरपालिका असेल अशा राजकीय शक्ती वर कार्यरत राहून समाजकार्य सुरु ठेवले मात्र आज एकही आमदार खासदार नसला तरी बाविआ ला काहीही फरक पडला नाही आता मागील पाच वर्षे झाली वसई विरार महापालिकेवर प्रशासक आहे.

किंबहुना दि.27 जून 2020 पर्यंत वसई-विरार महानगरपालिकेवर मागील दोन दशके सातत्याने असलेली एक हाती सत्ता हे यश आजवर त्यांना मिळाले ते केवळ आणि केवळ त्यांच्या कार्यकर्त्यांमुळेच ! असे म्हणणारे आप्पा कार्यकर्त्यांना कधीही कुठलाही आदेश देत नाहीत पण तरीही लोकनेते मा. आम.हितेंद्र ठाकूर या नावाचं गारूड या वसई तालुक्यातच काय तर सबंध पालघर – ठाणे किंवा मुंबई व उपनगर जिल्हा असो !
अवघ्या महाराष्ट्र राज्यात व दिल्लीतल्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय व सामान्य माणसालाही हितेंद्र ठाकूर आप्पा हे नाव माहित झालं आहे.

लाखाच्या त्यांच्या सभा झाल्या नसल्या तरी ते काय बोलतात याकडे सगळ्यांचे बारीक लक्ष असते आप्पांच्या पुढच्या कृतीचा अंदाज लावणे कुणालाही आजवर शक्य नाही तर शहरी व ग्रामीण भागातल्या एखादा कार्यकर्त्यांपासून सर्वच कार्यकर्त्यांवर त्यांचे अफाट प्रेम आहे.

विशेष म्हणजे साहित्य, संस्कृती, शैक्षणिक, वैद्यकीय किंवा सामाजिक, धार्मिक अथवा कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवरा पर्यंत व स्व:पक्षापासून अगदी थेट राज्याच्या विरोधीपक्ष नेत्या पर्यंत ठाकुरांच्या मैत्रीचे वलय राजकारण व समाजकारणात पर्यंत पोहचलेले आहे. त्यात प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी उत्तुंग भरारी घेत शिक्षणाची गंगा जणू वसई तालुक्यात वाहत आहे दुसरीकडे त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा निर्माण केली आणि अलीकडच्या काळात त्यांनी आरोग्यासाठी मोठे रुग्णालय देखील निर्माण केले आहे.

नेहमी स्वतः साठी काहिही न मागता केवळ मतदारसंघाच्या प्रगतिशील वाटचालीसाठी व वसईच्या विकासासाठी समाजकार्याचा ध्यास व मेहनत घेणारा व पाठपुरावा करणारा एक लढवय्या नेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे लोकनेते मा.आम. हितेंद्र ठाकूर (आप्पा ) होय !

एखाद्या माणसाचे इतके पैलू असू शकतात की त्यांचे एक दुसरे ही वेगळपण समोर आलं आहे की ,त्यांची स्मरणशक्ती हा एक अफलातून गुण आहे, आयुष्यात त्यांना एकदा भेटलेली माणसे या पुढे मग ती त्यांना दहा ते वीस वर्षांनी जरी पुन्हा भेटली तरी त्यांच्या ती बरोबर लक्षात राहतात.
एकंदरीत ग्रामीण-शहरी विभागाच्या दौऱ्यावर किंवा बाहेर सभेला गेल्यानंतर तेथील नेत्यांना ,कार्यकर्त्यांना जुन्या जाणत्यांना ते अगदी सरळ नावानिशी किंवा टोपण नावानं हाक मारून त्यांच्याशी ते आदराने बोलतात त्यावेळी समोरची व्यक्ती आपल्याला हितेश आप्पा अगदी जवळून ओळखतात एवढ्या आनंदातच त्यांची ती होऊन कधी जातात ते कळतही नाही.

अगदी तालुकाच नव्हे राज्यस्तरावरच्या नेत्यांची नावे ही हितेश आप्पाच्या डोक्यात असतात तर कित्येकदा सभेला समोरच्या सभाजनामधील एखाद्या शाळू सोबतीला आप्पानी हाक मारून बोलावल्याचा किस्सा मधल्या काळात खूप प्रसिद्ध झाला होता
एकुणच नेहमीच विकासाचा ध्यास घेतलेला हा लोकनेता म्हणजे आधी केले मग सांगितले असे आजवर केलेल्या कामातून अनेकदा स्पष्ट झालेले आहे.
आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आजही कार्यकर्त्यांच्या सहकार्याने अविरत सुरु आहे यासाठी आयुष्यातील उमेदीची तब्बल 40 वर्षे लोकसेवेसाठी खर्ची घातली आहेत
मग खास करून वसई विरार शहराचा ग्रामीण भागाचा पाणी प्रश्न असो त्यांनी तो मार्गी लावण्यासाठी व वाढीव पाणीपुरवठा होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले आहेत,
तर केंद्र व राज्य सरकार जिल्हा परिषद व महापालिकेच्या माध्यमातून मग त्या भागातील मुख्य रस्ते असतील किंवा ग्रामीण भागातील रस्ते ,उड्डाणपूल ,पादचारी पूल,पथदिवे, वाहतूक नियंत्रण यंत्रणा, सक्षम अग्निशमन दल ,आदी मूलभूत सुविधा देणारी विविध प्रकारची कामे पाहिली की त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख सहजपणे समजतो
पण आज शहराची वाढती लोकसंख्या व त्यामुळे शहरावर व त्या नागरिकांच्या सोयीसुविधांवर पडणारा ताण लक्षात घेऊन भविष्यात रिंगरुट रोड, कोस्टल जलवाहतूक सेवा ,परिवहन सेवेसाठी आणि खासकरून मेट्रो साठी त्यांचे प्रयत्न सर्वश्रुतच आहेत 20 हुन अधिक अग्निशमन दल व सर्व उपकेंद्रे आणि त्यातील अत्याधुनिक उपकरणांचे संच 40 व 70 मीटर उंचीचे लेडर ( उचं शिडी) या आधुनिक सोयीसुविधां युक्त योजना कार्यरत असून वसई विरारचा विकास आज बऱ्यापैकी परिपूर्ण होत आहे.

तर घनकचरा हा प्रश्न हल्लीच्या काळातील सर्वात मोठी डोकेदुखी बनला आहे मात्र घनकचरा व्यवस्थापन करताना ही मोठ्या शहरांना घाम फुटतो परंतु महापालिकेने त्यासाठी प्रयत्न केले आहेत शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन यापुढे घनकचरा, जल व मलनिस्सारण विकास करण्यासाठी जलवाहिन्यांची जाळे व प्रक्रिया केंद्रांसाठी हजारो कोटी रुपयांची योजना राबवून भविष्यातील संकटाचा वेध त्यांनी आधीच जाणून घेतला आहे.
अर्थातच कला -क्रीडा ,साहित्य ,शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक ,आरोग्य तसेच महिला व बालकल्याण अशा नानाविध क्षेत्रात उल्लेखनीय भरारी घेत एक सकारात्मक दृष्टीकोण घेता केवळ विकासाचे राजकारण करायचे असे अविरत कार्य आजही आप्पा मार्फत सुरू आहे
80 टक्के समाजकारण व फक्त 20 टक्के राजकारण आणि कार्यकर्ता हेच प्रमाण अशा त्रिसूत्री धोरणावर अवलंबून आप्पांचे कार्य सुरू आहे आणि पुढे ही अविरत राहील यात अजिबात शंकाच नाही.

करोना काळात बहुजन विकास आघाडी पक्ष प्रमुखांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी दिवस-रात्र गरजू वसईकरांना अन्न वस्त्र निवारा सारख्या मूलभूत गोष्टीची सर्वतोपरी मदत देऊ केली हे फार न थोडे आणि थोडके होते,आज कार्यकर्ता आहे म्हणुन मी आहे व हीच माझी ताकद मला नेहमी बळ देत विजयी करते.

आप्पाच्या या जनसामान्यांच्या प्रश्नांची नेहमीच दखल घेत त्यांनी वसईत विकासाचे काम केले आणि ते लोकनेते आजही बनून राहिलेत, अर्थात लोकसेवेमुळे त्यांची 40 वर्षांची वाटचाल वसई विरारला नक्कीच प्रेरणादायी व भूषणावह आहे.
अशा या कार्यसम्राट लोकनेते मा.आम हितेंद्रजी ठाकूर उपाख्य हितेश आप्पाना दि. 3 ऑक्टोबर 2025 या त्यांच्या 64 व्या वाढदिवसाच्या मंगलमय व आरोग्यदायी हार्दिक शुभेच्छा !
![]()
