मांडवी पोलीस ठाणे मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात तिसऱ्या स्थानी

विरार-खानिवडे :-
वसई पूर्वेतील दुर्गम भागाशी संलग्न असलेल्या मांडवी पोलीस ठाण्याला मीरा भाईंदर -वसई विरार पोलीस आयुक्तालयाचा तिसरा क्रमांक मिळाला आहे .महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम अंतर्गत आयुक्तालयातील  तिसऱ्या क्रमांकाचे प्रमाणपत्र मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या हस्ते स्वीकारल्यानंतर पोलीस ठाण्यात जल्लोष करण्यात आला .या आयुक्तालयात एकूण १९ पोलीस ठाणे आहेत, ज्यामध्ये एक सायबर पोलीस ठाणेही समाविष्ट आहे.  मांडवी पोलीस ठाण्याचा कार्यभार हाती घेतल्यानंतर पो नि हजारे यांनी या पोलीस ठाण्याला नवी झळाळी दिली आहे .त्यामुळे हे पोलीस ठाणे म्हणजे जुन्या अडगळीच्या पोलीस ठाण्याच्या जागी स्वच्छ , सुंदर आणि सोयी सुविधांनी युक्त असे पोलीस ठाणे झाले आहे .याच बरोबर या भागात पोलिसांनी विविध प्रकरणी कारवाया करून   चांगली जरब बसविल्याने गुन्ह्याचा आलेख नियंत्रणात आणला आहे .

या आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर, ९४५ नवीन पोलीस कर्मचारी विविध पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्त करण्यात आले आहेत, ज्यामुळे अपुऱ्या पोलीस बळाची अडचण काही प्रमाणात दूर झाली आहे.
 मीरा भाईंदर वसई विरार पोलीस ठाण्यांची विभागवार यादी :-
परिमंडळ १ (मीरा-भाईंदर क्षेत्र) : काशिमिरा,मीरा रोड,काशीगाव (प्रस्तावित),भाईंदर,उत्तन,नवघर,नया नगर
 परिमंडळ २ आणि ३ (वसई-विरार क्षेत्र)वसई, माणिकपूर, नायगाव, तुळींज, वालीव, आचोळे, पेल्हार,विरार, मांडवी, नालासोपारा, बोळींज
  • या पोलीस ठाण्यांव्यतिरिक्त, एक सायबर पोलीस ठाणेही कार्यरत आहे, ज्यामुळे एकूण संख्या १९ होते.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!